Monday, December 17, 2007

गव्हाची खीर (Gavhachi kheer)

GavhachI kheer

हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा त्यातल्या त्यात माझ्या आज्जीच्या हातचा. आता आज्जी नाही त्यामुळे मग ती खास मायेची चव नाही पण तरीही कधीही केली तरी तिची आठवण करूनच खाल्ली जाते.

ह्या खिरीसाठी गहू कांडून दलिया सारखा करतात. त्यासाठी गहू पाणी लावून थोडे ओलसर करायचे म्हणजे कोंडा पट्कन सुटून येतो. असे पाणी लावून एक अर्धा तास ते गहू ठेवतात. मग उखळात कांडतात. असे केल्याने कोंडा निघून येतो. तो पाखडून काढतात. कांडताना  गव्हाचे तुकडे होतात, साधारण दलियाहुन थोडे मोठे असे. मग ते गहू हुग्गी (कानडी शब्द) म्हणजेच खीर करायला वापरतात. सहसा ही खीर खपली गव्हाची करतात. जर खपली गहू मिळत नसेल तर सध्या गव्हाचे पण केले जाते. पण मग ते शिजायला घालताना थोडे तांदूळ घालतात म्हणजे खीर मिळून येते. मी आज्जी आणि मम्मी बरोबर गहू कांडलेले आहेत एकेकाळी. कष्ट असतात खूप - पण चव अप्रतीम अर्थात!!

इथे भारतातल्या सारखे खपली गहू, सडण्यासाठी उखळ वगैरे काहीही नाही आणि करायला वेळही नाही (!) म्हणून मी ही खीर आजकाल दलीयाची करते.

Gavhachi Kheer


1 कप मध्यम जाड गव्हाचा रवा (दलीया किंवा Cracked wheat)
2 कप चिरलेला गुळ
3 कॅन नारळाचे दूध
3-4 वेलदोडे
3-4 केशर काड्या
छोटा तुकडा जायफळ
1/4 वाटी खसखस
1/4 वाटी सुके खोबरे
2-3 चमचे तूप
1 कप पाणी
1/4 वाटी बदाम, पिस्ते, काजूचे काप
10-15 बेदाणे

कृती -
गव्हाच्या रव्याला 1/4 चमचा तेल आणि चिमुटभर हळद चोळुन घ्यावी. 10 मिनीटे तसेच ठेवून पाण्याने एकदा रवा धुवून घ्यावा. त्यात एक कप पाणी घालून कुकर्मधे ठेवून 1 शिट्टी करून घ्यावी. कुकर गार होईपर्यंत खसखस वा खोबरे वेगवेगळे भाजून वेगवेगळे बारीक करून बाजूला ठेवावे. गुळ चिरून घ्यावा. कुकर गार झाला की शिजलेला रवा चमच्याने उपसून किंचीत मोकळा करून घ्यावा. एका जाड बुडाअच्या पाटेल्यात चिरलेला गुळ घालून त्यावर 2 चमचे तूप घालावे आणि मध्यम आचेवर पाक करायला ठेवावा. तूप वापरायचे नसेल तर 3-4 चमचे पाणी घातले तरी चालते. साअधरण कच्चा पाक तयार झाला की त्यात शिजलेला गव्हाचा रवा घालून ढवळावे आणि जर गातही असतील तर त्या मोडून घ्याव्यात. त्यावर नारळाच्या दुधाचे कॅन उघडुन एकेक करून ओटावा. खसखस वा खोबर्याचे कूट घालावे. एका वेगळ्या कढईत साधारण 1 चमचा तूप घालून त्यावर काजू-बदामाचे काप गुलाबी रंगावर भाजून ते खिरीमधे घालावेत. बेदाणे, वेळची, जायफळ आणि केशर थोडे जाडसर बारीक करून त्यावर घालावे. गॅस बारीक करून खीर उकळु द्यावी. मधून मधून ढवळत राहावे नाहीतर खाली लागण्याचा संभव असतो. साधारण 5 मिनीटानी गॅस बंद करावा.


टीप - 
  1. नारळाच्या दुधाऐवजी साधे दूध (fat free, 1% वगैरे) घातले तरी चालते. 1 कप रव्याला साधारणपणे 4 कप दूध लागते.
  2. नारळाचे दूध घरी काढून मी कधी खीर केली नाहीए त्यामुळे ते प्रमाण देऊ शकत नाही.
  3. नारळाचे दूध आजकाल lite प्रकारचे पण मिळते ते वापरले तरी चालेल.
  4. ह्या खिरीसाठी गुळच चाMगला लागतो साखर घातलेली खीर चांगली लागत नाही

Tuesday, November 27, 2007

लेट्युस रॅप्स (Lettuce Wraps)

P. F. Changs ह्या चायनीज बिस्ट्रो मधे मिळणारा हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा! मी reproduce करायचा केलेला प्रयत्न बराच साध्य झालाय असे मला वाटते.

साहित्य -
१ मध्यम आकाराचा आईसबर्ग लेट्युस - शक्यतो न कापता प्रत्येक पान वेगळे करुन धुवुन फ़्रीज्मधे ठेवावा.
१ पॅकेट बेक्ड टोफ़ु (Savory Baked Tofu)
१ जुडी कांद्याची पात - बारीक कापुन
२-३ काड्या बेझील - बारीक कापुन
२-३ बोटभर लांबीचे लेमनग्रास चे तुकडे - उभे कापुन
१-२ इंच आले बारीक कापुन
१ इंच गलंगल (थाई आले) - सहजी मिळत असेल तर बारीक कापुन
१/४ कप भाजलेले शेंगदाणे

खालील सामान लागेल तसे चवीप्रमाणे -
लाल मिरची पेस्ट
सोयासॉस
राईस व्हिनेगर
२-३ चमचे तेल

कृती -
बेक्क्ड टोफ़ुचे १/२ इंचाचे तुकडे करुन घ्यावेत. त्याला थोडी मिरची पेस्ट, सोयासॉस, आणि चमचाभर व्हिनेगर लावुन १५ मिनिटे ठेवुन द्यावे. ओव्हन ३५० फ़रेन्हाईट वर तापवुन टोफ़ुचे तुकडे एका तेल लावलेल्या ट्रेमधे ठेवुन १५ मिनिटे बेक करावेत. ते जरा हलवुन परत दुसर्या बाजुने १० मिनिटे बेक करावेत. दरम्यान पात, बेझील, आले वगैरे कापुन घ्यावे.

ट्रेय बाहेर काढुन ५-७ मिनिटे थंड होऊ द्यावा. एका मोठ्या कढईमधे तेल घालुन ते मोठ्या आचेवर तापायला ठेवावे. तेलातुन धूर येईपर्यंत तापवावे. त्यात प्रथम लेमनग्रास, त्यावर पात, दाणे, टोफ़ु घालावे. प्रत्येक जिन्नस घालताना हलवत रहावे. आच कमी करू नये. त्यावर चविप्रमाणे सोया सॉस, व्हिनेगर, चिलीपेस्ट घालुन परतावे. अगदी शेवटी बेझील घालुन गॅस बंद करावा.

खाण्याआधी फ्रीजमधुन लेट्युस बाहेर काढुन घ्यावा. एका वाटीमधे सोयासॉस, चिलीपेस्ट आणि व्हिनेगर एकत्र करुन खाण्यासाठी बाजुला ठेवावे. लेट्युसच्या पानाचा कप घेउन त्यात टोफ़ुचे मिश्रण घालावे आणि बर बनवलेला सॉस घालुन गुंडाळि करुन खावे.

टीप -
१. टोफ़ुचे मिश्रण आधि बनवुन ठेवता येते. ऐनवेळी थोडे गरम करुन वपरु शकता.
२. लेट्युसची पाने मिळणे शक्य नसेल तर कोवळ्या कोबीची पाने वापरता येतात.
३. यामधे water chestnut च्या चकत्या घाल्तात. सहजी मिळत असेल तर घालायला हरकत नाही.

Wednesday, October 31, 2007

Corn Flakes चिवडा

दिवाळी आली घरोघरी पदार्थांचे नमुने बनायला लागतात. दूरदेशी राहील्याने आमच्यासारख्या नोकरी करणा-याना दिवाळीची सुट्टी नसते त्यामुळे नमुन्यापुरते का होईना एखादा पदार्थ करुन पहाण्याएवढा वेळही मिळत नाही. मग बरेचसे पदार्थ घरात असणा-या सामुग्रीपासुन झटपट कसे करता येतील याचे प्रयोग चालु असतात. माझा त्यातलाच हा ६ एक वर्षापुर्वीचा प्रयोग--


५ कप Kellogg's corn flakes
फोडणी साठी जरा जास्ती तेल (५ ते ६ Tbsp )
फोडणीसाठी कढिपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, तिळ, खसखस, हळद
डाळं, भुईमुगाचे दाणे, काजुचे काप प्रत्येकी अर्धा कप
काळे बेदाणे पाव कप
जिरे पावडर, धणे पावडर प्रत्येकी २ tsp
साखर १ चमचा,
लाल तिखट, मिठ चवीप्रमाणे

सर्व साहित्य काढुन ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हळद सोडुन बाकी सर्व फोडणीचे साहित्य घालुन मंद गॅस वर फोडणी करावी. त्यात दाणे, काजु घालुन थोडावेळ परतावे. ते लालसर रंगावर भाजले की त्यात हळद, डाळे, व बेदाणे घालावेत. बेडाणे फुलुन येईपर्यन्त चांगले परतावे.
गॅस वरुन पातेले बाजुला घेउन त्यात २ ते २.५ कप corn flakes घालावेत. त्यावर मीठ, तिखट, जिरे, धणे पावडर घालावी. वर राहिलेले flakes घालावेत. गॅस वर न ठेवता सर्व मिश्रण व्यवस्थित हलवावे. आता पातेले मंद गॅस वर ठेवुन चांगले ५ ते ७ मि. हलवावे. गॅस बंद करुन पातेले बजुला काढुन ठेवावे. ५-१० मिनीटे सतत हलवत रहावे. पातेले गरम असल्याने चिवडा करपण्याची शक्यता असते. तोपर्यन्त चिवडा थोडा थंड होईल त्यावर साखर घालुन एकदा नीट हलवावे.
मक्याचा झटपट चिवडा तयार!!!

टीप -
१. कोणत्याही अगोड cereal चा ह्याप्रकारे चिवडा करता येईल.
२. अर्धे लिम्बु फ़ोडणीमधे पिळुन ते पूर्ण तडतडू द्यावे. त्याचा अंबटपणाही अतिशय छान लागतो. पण लिंबुरस जर नीट तडतडला नाही तर चिवडा मऊ पडु शकेल.

Saturday, October 13, 2007

किनवा पुलाव (Quinoa Pulav)

Quinoa (किनवा) हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.
हे धान्य असे दिसते -Quinoa


मी केलेला पुलाव असा दिसत होता -
किनवा पुलाव


१ कप किनवा
२ कप पाणी
३-४ हिरव्या मिरच्या चिरुन
१ चमचा तेल
फोडणीचे साहित्य
चवीपुरते मीठ
१/२ चमचा गरम मसाला

कृती - किनवा पाण्यात धुवु्न घ्यावा. तेलाची फोडणी करुन मिरच्या घालाव्यात. त्यात किनवा घालुन २ ते ३ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात पाणी, मीठ, गरम मसाला घालावा. साधारण ५ मिनिटे ते मोठ्या आचेवर उकळावे. त्यावर गॅस बारीक करुन झाकण लावावे आणि पूर्ण शिजु द्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.


टीप -
१. हे धान्य साधारण ज्वारीसारखे दिसते दाणा बारीक असतो.
२. शिजलेल्या किनवा साधारण शिजलेल्या गव्हाच्या रव्यासारखा दिसतो.
३. किनवा भिजवुन साधारण ५-६ तास ठेवला तर त्याला मोड येतात.
४. ह्या धान्याचे भारतीय नाव काय आहे ते माहीती नाही.

Thursday, October 11, 2007

फोडणीचे आंबट वरण (ambat Varan)

ambat Varan


श्रावण सोमवारी घरी लवकर यायला मिळे आणि घरी स्वयंपाकही पूर्ण तयार असे. त्यातले हे फोडणीचे वरण म्हणजे माझा जीव की प्राण. सकाळी जाताना साबुदाणा खिचडीपेक्षा संध्याकाळच्या ह्या वरणाचे जास्ती अप्रुप असे.

१ वाटी तुर डाळ - कुकरला मऊ शिजवुन घेतलेली
३-४ टेबलस्पून ओले खोबरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ पाकळ्या लसुण
छोटा आल्याचा तुकडा
लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
१ छोटा तुकडा गूळ
मुठभर कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ टेबलस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद

कृती -
मिरची, आले, लसुण, खोबरे आणि थोडी कोथिंबीर बारीक वाटुन घ्यावी. तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन घ्यावी. त्यात शिजवलेली डाळ चमच्याने घाटुन घालावी. त्यात मीठ, चिंचेचा कोळ, खोब-याचे वाटण, मसाला, आणि गुळ घालावे. वरण जितके कमी जास्त घट्ट पाहिजे त्याप्रमाणात पाणी घालुन नीट उकळी आणावी. वरुन कोथिंबीर घालावी. गरम गरम भाताबरोबर खावा.

टीप -
उन्हाळ्यात चिंचेच्या कोळाऐवजी एखादी कैरी खिसुन घातली तरी अप्रतीम होते.

Saturday, October 06, 2007

भारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड (Falafel and Salad - Indian Style)

ही रेसिपी मी मायबोलीच्या २००७ च्या गणेशोत्सवातील पाककला स्पर्धेमधे दिली होती. (३० मिनिट मील अशी स्पर्धा होती)

तयारीसाठी वेळ - साधारण १०-१५ मिनीटे
वाफ़वण्यास लागणारा वेळ - १५ मिनीटे
फलाफल -
साहित्य -
१ जुडी मेथी (बारिक चिरुन) किंवा फोझन मेथी २ वाट्या
१/२ वाटी कणिक (चपातीचे पीठ)
१/२ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ चमचा जिरे
१/२ चमचा हळद
१/२ वाटी दही
चविप्रमाणे मीठ

कृती -

* गॅसवर चाळणी ठेवता येईल इतक्या पातेल्यात साधारण १ ते दीड लिटर पाणी तापायला ठेवावे.
* मिरची, लसुण, मीठ, आणि जिरे एकत्र बारीक करुन घ्यावेत.
* परातीमधे किंवा मोठ्या बाउलमधे मेथी मधे दही घालुन बारीक केलेले वाटण घालुन नीट मिसळुन घ्यावे.
* त्यात हळद आणि तांदुळाचे पीठ घालावे.
* थोडी थोडी कणिक घालत मळावे. भाजी फ़क्त एकत्र मिळुन यावी इतपत घट्ट असावे. खुप पीठ घालु नये.
* शेवटी हाताला थोडे पाणी लावुन ते नीट गोळा करावे.
* ह्या पीठाचे छोटे छोटे मुटके करुन तेल लावलेल्या चाळणीत घालुन ती चाळण उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी.
* त्यावर झाकण ठेवुन १५ मिनीटे वाफवुन घ्यावेत.

इतर साहित्य -
१ काकडी चकत्या करुन
१-२ टोमॅटो चकत्या करुन
१ वाटी चिरलेला लेट्युस (असेल तर)
१ वाटी दही
१ काकडी खिसुन पाणी पिळुन काढुन फक्त खीस घ्यावा
१/२ चमचा जिरेपुड
चविप्रमाणे मीठ, साखर
टोमॅटो केचप जरुरीप्रमाणे
३ पीटा ब्रेड (शक्यतो whole wheat) किंवा ३ पोळ्या अगर टॉर्टीया

Assembly -
(हे अगदी खाण्याच्या वेळेला करावे)

* वाफवलेल्या मुटक्यांच्या १ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात
* दही, काकडीचा खीस, मीठ, जीरेपूड, साखर एकत्र करुन नीट मिसळुन घ्यावे
* पीटा ब्रेडला मधे कापुन अर्धा भाग पोकळ करुन त्यात मेथीच्या मुटक्याच्या ३-४ चकत्या घालाव्यात.
* त्याच्या कडेने २-२ काकडीच्या चकत्या, १-१ टोमॅटोच्या चकत्या घालाव्यात.
* त्यात थोडे केचप आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर घालावी
* वरुन चिरलेला लेट्युस घालावा आणि सर्व्ह करावे.

काकडीची कोशिंबीर सोबत असेल तर पूर्ण मील होते. उरलेले मुटके पण नुसते खाता येता.

टीप -

* मेथी निवडायला वेळ लागतो तो या रेसीपी मधे धरलेला नाही.
* फ्रोझन मेथीमुळे तो वेळ वाचतो. फ्रोझन मेथी घेताना रूम टेंपरेचरला आल्यावर पिळुन घ्यावी. ते पाणी टाकुन द्यावे.
* काकडीचे पाणी टाकुन न देता मीठ, जिरेपुड घालुन पिण्यास वापरावे.
* मेथीच्या ऐवजी पालक वापरला तरी हरकत नाही.
* पीटा ब्रेड मिळत नसेल तर टॉर्टीया किंवा पोळ्या वापरुन wrap करता येतो. त्यासाठी पोळी पसरुन त्यावर मुटक्याच्या चकत्या टोमॅटो, काकडी, लेट्युस, केचप, कापडीची कोशिंबीर घालुन गुंडाळावी.

सॅलड
१ टोमॅटो - मोठे तुकडे करुन
१ काकडी - मोठे तुकडे करुन
२ वाट्या - लेट्युस मोठा कापुन
२ चमचे ऑलिव्ह ऑईल
१ चमचा लिंबाचा रस
चिमुट्भर मीठ, साखर, मिरीपुड

कृती - लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरीपुड, तेल एकत्र करुन फोर्क ने १-२ मिनिटे फेटुन ठेवावे.
काकडी, टोमॅटो, लेट्युस एकत्र करुन एका पसरट बाऊल मधे ठेवावे.
वाढण्यापुर्वी त्यावर एकत्र केलेले सॅलड ड्रेसिंग घालुन हलक्या हाताने मिसळावे.

टीप - ह्या सॅलडमधे ढबु मिरची, शिजलेल्या बीटचे तुकडे, खिसलेले गाजर घालता येते.

Tuesday, September 18, 2007

शेपुची भाजी (Shepuchi bhaaji)

(Link to English Recipe)

आज गौरी येणार. आज तिला भाजी भाकरीचा नैवेद्य तिन्हीसांजेला. माझ्या मम्मीची ही शेपुच्या भाजीची रेसीपी गौरीनिमित्त तुम्हा सर्वांसाठी.

Shepuchi Bhaji

१ जुडी शेपुची भाजी निवडुन बारीक चिरुन
१ मुठ तुरडाळ
१ मुठ तांदुळ
१ चमचा जीरे
चवीप्रमाणे मीठ
२-३ हिरव्या मिरच्या बरीक चिरुन किंवा पेस्ट करुन
१ टी. स्पू. तेल

कृती -
कुकरच्या भांड्यात तांदुळ आणि डाळ धुवुन घ्यावे. त्यात थोडे पाणी घालावे (साधारण १/२ वाटी). त्यावर चिरलेल्या भाजीतली अर्धी भाजी घालावी. त्यावर मीठ, मिरची, जिरे आणि तेल घालावे. वर उरलेली भाजी घालुन कुकरमधे ठेवुन साधारण २-३ शिट्ट्या कराव्यात. कुकरचे प्रेशर उतरले की भांडे खाली काढुन भाजी रवीने किंवा पळीने घाटुन घ्यावी. त्यात हवे असेल तर एखादा चमचा तेल घालुन गॅसवर ठेवुन एक उकळी आणावी. झाली भाजी तयार.
वाढताना त्यावर थोडेसे तुप घालुन वाढावे.

टीप -
१. मम्मी ह्या भाजीला फोडणी वगैरे काही घालत नाही.
२. गरम भाकरी भाजी आणि तुप मस्त लागते!
३. सहजी मिळणे शक्य असेल तर त्यात लाल भोपळ्याची पाने चिरुन घालावीत. त्याने भाजी चांगली मिळुन येते. साधारण १ जुडीसाठी ४-५ पाने घालावीत. बरेचदा भाजी विकताना भाजीवाले हे दोन्ही एकत्र विकताना पाहीले आहे.

Wednesday, September 12, 2007

पंचखाद्य (Panchakhadya)


गणपती जवळ आले की घरोघरी प्रसादाची, पुजेची तयारी अगदी जोरदार चालु होते. हा पंचखाद्याचा प्रकार आमच्या घरी म्हणे परंपरागत चालु आहे. त्यात परिस्थिती आणि काळानुसार नक्कीच बदल झाले असतील. पंचखाद्य म्हणजे कमीत कमी पाच पदार्थ असावेत आणि मग आवडीनुसार त्यात काही जास्तीचे जिन्नस घातले तरी हरकत नाही.१ वाटी किसलेले खोबरे
४-५ चमचे साखर
४-५ खारका
५-६ बदाम
४-५ काजु
२ टी.स्पू. खसखस
१-२ वेलचीचे दाणे
चिमुटभर जायफळाची पावडर

कृती - खिसलेले खोबरे कोरडे भाजुन घ्यावे. खसखस भाजुन ओबडधोबड पूड करुन घ्यावी. साखर, वेलची, जायफ़ळ एकत्र करुन पूड करावी. खारकेच्या बिया काढुन टाकुन बारीक तुकडे करुन जेवढी बारीक करता येईल तितकी बारीक पूड करुन घ्यावी. काजु,बदाम बारीक चिरावेत अथवा ओबड्धोबड पूड करुन घ्यावी. आता ही सगळी सामुग्री एकत्र करावि. झाले पंचखाद्य तयार.

Wednesday, August 29, 2007

लज्जतदार पराठे (Lajjatdar paratha)

घरी जावे आणि फ्रीझ उघडुन पहावा आणि कोणतीही भाजी शिल्लक नसावी. बाहेर जाऊन काही आणण्याची इच्छा नसावी आणि भुकही लागलेली असावी. अशाच एकदा भुकेपोटी लागलेला हा शोध आहे!

१ गाजर साल काढुन
१ टोमॅटो
१ कप कोबी किंवा फ़्लॉवर यापैकी जी काही भाजी शिल्लक असेल ती
२-३ हिरव्या मिरच्या
मुठ्भर कोथिंबीर
१ चमचा जिरे
१ लिम्बाचा रस
चवीप्रमाणे मीठ
१ चमचाभर साखर
लागेल तितके गव्हाचे पीठ

कृती -
टोमॅटो, गाजराचे तुकडे, कोबी/फ्लॉवर, मिरच्या, कोथिंबीर, जीरे, मीठ, लिंबाचा रस, साखर सगळे फ़ूड्प्रोसेसर मधे घालावे आणी मध्यम बारीक करुन घ्यावे. फूडप्रोसेसरचे पाते बदलुन पीठ मळायचे पाते घालावे आणि त्यात थोडे गव्हाचे पीठ घालावे. आणि मळायला घ्यावे. लागेल तसे पीठ घालुन चपातीच्या पीठाप्रमाणे मळुन घ्यावे. पा्णी शक्यतो घालु नये. पीठ मळुन झाल्यावर लगेचच पराठे लाटायला घ्यावे. कारण पीठ ठेवले की त्याला पाणी सुटायला लागते.
तयार झालेले पराठे दह्याबरोबर किंवा कोशींबीरीबरोबर खायला द्यावेत.

टीप -
१. कोबी किंवा फ़्लॉवर काहीही नसेल तर नुसतेच गजर टोमॅटो घातले तरी चालते.
२. फूडप्रोसेसर नसेल तर सगळ्या भाज्या नीट खिसुन घ्याव्यात आणि मिरची बारीक करुन त्यात घालुन हाताने पीठ मळावे.

Tuesday, August 28, 2007

डाळ मेथी (Daal Methi)

(Link to English Recipe)
साहित्य -
१ जुडी मेथी - निवडुन, धुवुन बारीक चिरुन
१/२ वाटी मुगडाळ किंवा तुरडाळ
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
लाल तिखट, काळा मसाला, मीठ - चवीप्रमाणॆ
५-६ लसूण पाकळ्या - ठेचुन
१/२ चमचा साखर
२ टे.स्पू. तेल
जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग

कृती -
भाजीसाठी तुरडाळ वापरायची असेल तर ती आधी थोडीफ़ार शिजवुन घ्यावी. मुगाची डाळ वापरायची असेल तर १५-२० मिनीटे भिजवुन घेतली तरी पुरेशी होते. कढईत तेल तापत ठेवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करुन घ्यावी. त्यात ठेचलेला लसुण आणि कांदा घालुन नीट परतुन घ्यावे. त्यावर भिजलेली/शिजवलेली डाळ घालावी. त्यातच तिखट, मीठ, मसाला घालुन नीट परतून घ्यावे. वरुन धुवुन चिरलेली मेथी घालावी. आणि गॅस बारीक करुन झाकण ठेवावे. ३-४ मिनीटानी झाकण काढुन भाजी नीट परतावी. किंचीत साखर घालुन एकदा परतुन गॅस बंद करावा.

टिपा -
ताजी मेथी मिळत नसेल तर फ़्रोझन मेथीची पण ही भाजी चांगली लागते पण त्यात मेथीचे दांडे खुप असतात त्यामुळे भाजी खुप शिजवावी लागते. पण अगदीच न मिळण्यापेक्षा कधीतरी करायला हा प्रकार चांगला वाटतो.

डाळ कांदा (Daal Kanda)

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/10/daal-kanda.html

हा एक पदार्थ सातारा भागात जास्त केला असे वाटते कारण माझ्या ब~याच मैत्रीणीना हा पदार्थ माहीती नव्हता! ऐनवेळी भाजी शिल्लक नसेल, अचानक पाहुणे आले तर करण्यासाठी झट्पट भाजी आहे ही. तुरडाळ, मसूरडाळ आणि मूगडाळ यांचा डाळ्कांदा केला जातो.

Picture of Masoor Daal


Masoor Daal Kanda

साहित्य -
१ वाटी तुरडाळ
१ मोठा कांदा
कांदा लसुण मसाला, मीठ - चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल आणि इतर साहित्य

कृती -
तुरडाळ धुवुन अगदी कमी पाणी घालुन कमी शिट्य्या करुन शिजवुन घ्यावी. फ़क्त अर्धवट शिजली पाहीजे. एकदम मऊ शिजता कामा नये. कांदा मोठा चिरुन घ्यावा आणि तेलाची फोडणी करुन त्यात परतावा. सोनेरी रंगावर परतला गेला की त्यावर डाळ, कांदा लसुण मसाला, मीठ घालावे. डाळ खुपच कच्ची असेल तर पाण्याचा हबका मारुन मारुन बोटचेपी शिजवावी. नेहेमीप्रमाणे पाणी ओतुन शिजवु नये. असेल तर वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप -
१. मसुरडाळ, मूगडाळ पटकन शिजते त्यामुळे ह्या डाळी वेगळ्या न शिजवता २०-२५ मिनीटे भिजवुन फोडणीला टाकाव्यात. बाकीची पद्धत वरीलप्रमाणेच.
२. कांदा-लसूण मसाला नसेल तर लाल तिखट, काळा मसाला असे एकत्र घातले तरी चालु शकते.

Friday, August 24, 2007

बटाटेवडे (Batata Vada)

कराडमधे दिवेकर बेकरी नावाची एक बेकरी आहे. मुळ ठिकाणाहुन आता ती दुसरीकडे हलवली गेलीय. त्यामुळे त्या दुकानात जाणे तितकेसे जाणे होत नाही. तसे नवीन ठिकाणही जुन्या दुकानापासुन खुप काही लांब आहे असे अज्जीबात नाहीये. पण जाणे होत नाही हेच खरे. आता त्यांची आठवण येण्याचे कारण काय असे डोक्यात येणे अगदीच साहजीक आहे. तर मला आठवतात त्यांचे बटाटेवडे. बाहेर जाउन काही खाणे ही त्याकाळात चैन होती आणि फ़ारसे प्रसिद्ध नव्ह्ते त्याकाळातली ही गोष्ट आहे :). एकदा पप्पा सहज सांगत आले घरी की आज लायब्ररीमधे कुणीतरी कार्यक्रमाला दिवेकरांचे बटाटेवडे आणलेले. मग असेच कधितरी मम्मी मंडईतुन येताना ते घेउन घरी आली. प्रचंड मोठा होता एकेक वडा आणि तिखट पण.
पुढे कधीतरी स्वयंपाक करायची गोडी लागल्यावर मम्मीकडुन रीतसर बटाटावडा शिकले. आणि मग त्यात माझ्या आवडीनुसार बदल करत गेले. मी करते तो बटाटेवडा खालीलप्रमाणे -

सारण -
४ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन घ्यावेत.
१ मोठा लाल कांदा बारीक चिरुन
३-४ हिरव्या मिरच्या (चवीनुसार कमीजास्त कराव्यात)
३-४ लसुण पाकळ्या
२ मुठी चिरलेली कोथिंबीर
१ लहान तुकडा आले
चवीप्रमाणे मीठ
५-६ पाने कढीपत्ता
२-३ टेबल्स्पून फोडणीसाठी तेल
जिरे, मोहरी, हिंग, हळद - फोडणीसाठी

कृती - आले, लसुण, मिरची आणि मीठ एकत्र वाटुन घ्यावे. खुप बारीक करु नये आणी फ़ार ओबड्धोबडही नसावे. बटाटे कुस्करुन ठेवावेत. फोडणीचे तेल कढईत तापायला ठेवावे. कढिपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळ्द घालुन तडतडल्यावर त्यात कांदा घालावा. कांदा साधारण परतत आला की त्यात हिरव्या मिरचीचे वाटण घालुन नीट परतुन घ्यावे. त्यात कुस्करलेला बटाटा घालावा. सारण नीट एकत्र करुन त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनीटे मंद गॅसवर वाफ़ येउ द्यावी. त्यानंतर सारणात कोथिंबीर घालुन सारण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर साधारण टेबलटेनीसच्या बॉलईतके गोळे करावेत. साधारण १२ गोळे होतील.

आवरण -
१ कप बेसन
२-३ टेबलस्पून तांदुळपीठ
लाल तिखट, मीठ - चवीप्रमाणे
हळद
चिरलेली कोथिंबीर
चिमुटभर ओव्याची भरडपूड
पाणी लागेल तसे
२-३ टेबल्स्पून कडकडीत तापवलेले तेल

कृती - बेसन, तांदुळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओव्याची पुड, कोथिंबीर एकत्र करावे. त्यात लागेल तसे पाणी घालत थलथलीत भिजवावे. बोटाने पीठ उचलले तर पट्कन भांड्यात पडणार नाही असे असावे. साधारण डोस्याच्या पिठासारखे सरसरीत असावे. त्यात तापवलेले तेल घालुन नीट मिसळुन घ्यावे.

बटाटावडा -
तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. सारणाचा एक एक गोळा आवरणाच्या पीठात बुडवुन तापलेल्या तेलात सोडावा. दोन्ही बाजुने नीट तळुन घ्यावा.

लसणीची चटणी, खोब~याची हिरवी चटणी या बरोबर गरम गरम खायला द्यावा.

टीप -
१. बटाटावड्याच्या आवरणात खायचा सोडा अज्जीबात घालु नये. तसा वडा खुप तेल शोषुन घेतो.
२. मसाला डोसासाठी भाजी कराताना वरील पद्धतीनेच करावी म्हणजे राहीलेल्या भाजीचे वडे करुन पहाता येतील :)

Tuesday, August 21, 2007

शेवयाची खीर (Shevai kheer)

मी साधारण ७वी मधे असेपर्यंत परवीनमावशीच्या घरुन खीरखुर्मा आणि वेज बिर्याणीचा डबा प्रत्येक ईदच्या दिवशी घरी यायचा. शकीलमामा किंवा अजुन घरचे कोणीतरी पोचवुन जात असे. त्या आज्जी अगदी आठवणीने आमच्यासाठी हा खाउ पाठवत असत. त्यानंतर आम्ही लांब रहायला गेल्याने ते बंद झाले. पण नंतर कलमाडेकाका आणुन द्यायचे डबा. पण आज्जीच्या हातची चव ती वेगळीच! पुढे मग रझिया खीर नक्की आणुन द्यायची कारण मला तिच एक शेवयाची खीर आवडते म्हणुन! एकदा तिला विचारले की यात काय काय घालतात. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काही ल्क्शात नाही राहिल्या पण खजुर किंवा खारिक घालतात ते मात्र लक्षात राहीले चांगले. त्या खरीचे मी केलेले एक light version!

१ वाटी बारीक शेवया
२-३ चमचे तुप
१०-१२ बिया प्रत्येकी बदाम, पिस्ते, काजु, अक्रोड - एकत्र पूड करुन
३-४ वेलच्या, ५-६ केर काड्या, बारीक तुकडा जायफळ - एकत्र पूड करुन
५-६ मोठ्या खजुर (US मधे असाल तर Medjol प्रकारचे खजुर वापरा California नको)
४ कप दूध (मी १% मिल्क फ़ॅटवाले वापरते)
६-८ टेबल्स्पून साखर (आवडीप्रमाणे कमीजास्त करावी)

कृती - शेवया जर अख्या असतील तर चुरुन १ वाटी चुरा घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर तुप घालुनशेवया हलक्या गुलाबी रंगावर भाजुन घेउन बाजुला ठेवा. त्याच पातेल्यात दूध तापायला ठेवावे. त्यात खजुराच्या बिया काढुन गर घालावा. आता हे दूध व्यवस्थीत उकळुन घ्यावे. जरा थंड झाले की मग त्यातला खजुन मिक्सरमधे बारिक करुन त्या दुधात ती पेस्ट घालावी. ते दूध परत उकळायला ठेवावे. त्यात शेवया घालाव्यात आणि बारीक गॅसवर अर्धवट शिजु द्याव्यात. त्यात आता वेलचीची पूड, बदाम पिस्त्यांची पूड घालावी आणि १-२ उकळ्या आणाव्यात. शेवटी साखर घालुन एक उकळी आणुन गॅस बंद करावा. थंड करुन खायला द्यावे.

टीप - खीरचा दाटपणा आपल्या इच्छेनुसार कमीजास्त करता येतो त्यासाठी दुधाचे प्रमाण कमीजास्त करावे लागेल.

Thursday, August 09, 2007

मुगाचा डोसा (Pasarattu)

एका तमीळ मैत्रीणीने दिलेल्या रेसीपीचे माझ्या पद्धतीने केलेले मॉडीफिकेशन.


From वदनी कवळ घेता ...


२ वाट्या सालीची मुगडाळ
१ वाटी उडीदडाळ (सालीसहीत असेल तर चांगले)

४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा तुकडा आले
३-४ टीस्पून मीठ (चवीप्रमाणे)

बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर वरुन घालण्यासाठी (ऎच्छीक)
कृती - डाळी धुवुन कमीत कमी ५ ते ६ तास भिजवाव्यात. त्यानंतर त्यात मिरच्या, आले, मीठ घालुन नीट वाटुन घ्यावे. अगदी बारीकच झाले पाहीजे असे नाही. पण खुप जाडसर असु नये. वाटलेले पीठ साधारण ६-७ तास झाकुन ठेवावे. हवामानानुसार कमीजास्ती अंबते ते गरजेपुरते पुरेसे होते. करतेवेळी शक्यतो non stick तव्यावर करावे. साधारण २ डाव पीठ नीट पसरवुन घ्यावे खुप पातळ असु नये. वरुन कांदा कोथिंबीर पसरावी आणि झाकण घालावे. साधारण २ मिनीटानी उलटावे ती बाजु भाजुन झाली की नारळाच्या ओल्या चटणीबरोबर खायला द्यावे.

Friday, August 03, 2007

भरल्या वांग्याचा मसाले भात (Stuffed Brinjal Pulav)

मायबोलीवर २००५ मधे गणेशोत्सवात पाककला स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या तेव्हा मी सहज गंमत म्हणुन भाग घेतला होता. दिलेल्या यादीमधील जिन्नस घेऊन एक पदार्थ बनवायचा होता. आणि फ़ोडणीचे साहित्य वगैरे वापरले तर चालणार होते. स्पर्धेच्या शेवटी मतदान होऊन मला पहिला पुरस्कार मिळाला असे घोषीत करण्यात आले होते.

माझ्या पप्पांच्या आजोळी असले वेगवेगळे पदार्थ नेहेमी केले जातात ही मूळ रेसीपी पण मामींचीच पण मला दिलेल्या घटक पदार्थानुसार थोडे बदल केलेली!

मसाला -
१/२ वाटी खोबरे भाजुन बारीक करुन
१/२ वाटी तीळ भाजुन बारीक करुन
२ चमचे गरम मसाला
लाल तिखट आणि मीठ चवीप्रमाणे
१/२ चमचा हळद

भाताचे इतर साहीत्य -
४ वांगी भरल्या वांग्याच्या भाजीसाठी कापतो तशी कापुन घ्यावित.
१ कप तांदुळ धुवुन कमीत कमी १/२ तास निथळत ठेवावेत.
मीठ, गरम मसाला, लाल तिखट चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल
१ वेलची, १ काडी दालचीनी, २ मीरे, १-२ पाने तमालपत्र (खडा मसाला)
फ़ोडणीसाठी २ चमचे तेल, हळद, जिरे, मोहरी, हिंग
२ कप गरम पाणी

कृती - मसाल्याचे साहित्य नीट भाजुन एकत्र करुन घ्यावे. ते चिरलेल्या वांग्यात भरता येईल तितका भरावा. राहीलेला मसाला बाजुला ठेवावा. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात खडा मसाला घालुन तो थोडावेळ तडतडु द्यावा. त्यात वांग्यासाठी बनवलेला मसाला उरला असेल तर तोही घालावा. त्यात तांदुळ घालुन ५ मिनीटे मंद आचेवर व्यवस्थीत परतुन घ्यावेत. त्यातच लाल तिखट, गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे घालावे. आता तांदळावर २ कप गरम पाणी घालुन एक उकळी आणावी. भात साधारण ५ मिनीटे झाकण लावुन शिजवुन घ्यावा. तो अर्धवट शिजला की त्यात मसाला भरलेली वांगी देठाकडचा भाग खालील बाजुला ठेवुन भातात खोचावीत. पातेल्यावर परत झाकण ठेवुन भात नीट शिजु द्यावा. शक्यतो चमच्याने ढवळु नये. भात शिजल्यावर गॅस बंद करुन वाफ़ कोंडु द्यावी त्याने वांगी नीट शिजतात. वरुन खोबरे कोथिंबीर घालुन तुपाबरोबर वाढावा.

टीप - मसाल्यात तीळ न घालता सगळे खोबरे वापरले तरी चालेल.

Saturday, July 21, 2007

कॅरट केक (Vegan Carrot Cake)

माझ्या काकुने मला दिलेली ही एक माझी आवडती रेसिपी. तिने जशी दिलि तशिच इथे लिहितेय. मी बरेचदा साधी कणिक घालुनच हा केक करते. अतिशय चविष्ट लागतो. एक दिवसाचा शिळा खाल्ला तर अतिशय छान!
Vegan Carrot Cake

1 cup Oil or Melted butter
2 cups Brown Sugar
¾ cup Water or Milk
4 cups All-purpose flour or atta
2 teaspoon Baking Powder
3 teaspoon Baking soda
1 tablespoon Vinegar
1 teaspoon salt
1 teaspoon Cinnamon powder
½ teaspoon Cardamom powder
¼ teaspoon Nutmeg
3 cups Shredded carrots
1 cup Chopped Nuts
½ cup Raisins

Preheat oven at 350F.
Blend oil, sugar, and water well. Add vinegar.
Mix thoroughly flour, salt, baking powder, baking soda and spices.
Fold in the both above mixes and stir vigorously.
Gently fold in carrots, nuts and raisins.
Bake in a well greased 13x9 pan or bundt pan for 35-40 minutes

Note - To make vegan version, use oil and water.

Thursday, July 19, 2007

साखरांबा (SakharAmba)

२ आंबे साल काढुन खिसलेले
१ कप साखर (आंब्याच्या गोडीवर कमी जास्ती घालावी)
१ चमचा बारीक केलेली वेलची
४-५ केशर काड्या

कृती - वरील सगळे जिन्नस एकत्र करुन साधारण एक तास जाड बुडाच्या पातेल्यात ठेवावेत. साखर आंब्यामधे विरघळायला लागेल. आता मध्यम गॅसवर हे मिश्रण उकळायला ठेवावे. साधारण दोनतारी पाक झाला की गॅसवरुन खली काढावे. थंड झाल्यावर बरणीमधे भरुन ठेवावे.

टीप - मम्मी लोणच्यासाठी कै~या आणल्या की त्यातल्या साधारण पिकायला लागलेल्या कैरीचा साखरांबा करायची. तोतापुरी आंब्यांचा साखरांबा पण छान होतो.

Friday, July 06, 2007

सात कप बर्फ़ी (Seven Cup Barfi)

एकदा बेळगावला गेले असताना आज्जीने एक वेगळी बर्फी खायला दिली. चव अप्रतीम होती. तेव्हा अगदी एक दिवसासाठीच गेले असल्याने शिकणे जमले नाही पण आठवणीने रेसीपी मात्र आणलेली होती. एक-दोन महीन्यात मम्मीकडे तिच्या मैत्रीणी येणार असल्याने हा पदार्थ करुन पाहिला. मम्मीला वड्यांचा चांगला सराव असल्याने पहिल्याच फ़टक्यात अप्रतीम झाल्या पण किंचीत गोड झाल्या. खाली आज्जीचे ओरीजिनल प्रमाण देतेय.
7 cup barfi with carrots

१ वाटी बेसन
१ वाटी खोवलेले ओले खोबरे
१ वाटी तुप (हो! एवढे घालावे लागते)
१ वाटी दूध
३ वाट्या साखर
बदाम काप, वेलची पावडर, केषर, जायफळ - हवे असेल तर घालावे

कृती - वरील सर्व पदार्थ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालुन मंद आचेवर शिजायला ठेवावे. सतत हलवत रहावे. मिश्रण पातेल्याच्या कडेने सुटत येईल. तेव्हा तुप लावलेल्या ताटात पसरावे. १०-१५ मिनीटे थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

टीप - १. हे करताना हात दुखुन येतात. पण हलवत राहाण्याशिवाय पर्याय नाही. जरा पसरट कढई घेतली तर मिश्रण लवकर आळते असा अनुभव आहे. वड्या मऊ झाल्यातर परत कढईत घालुन एक चटका देऊन ताटात पसरुन वड्या पाडता येतात.
२. तीन कप साखर जास्त होते (निदान भारतात तरी) तेव्हा १/२ ते १ कप कमी घातली तरी हरकत नाही.
३. तुप १ कप जास्त वाटले तरी तेवढे वापरावे लागते अन्यथा ती वडी खुप पिठुळ लागते.
४. खोबरे चालत नसेल तर १ कप खिसलेले गाजर घालुनही ही वडी अप्रतीम लागते.
५. माझी मैत्रीण क्षिप्रा हिने वरच्या मिश्रणात १ कप आंब्याचा रस घालुन १ वाटी साखर कमी केली होती. अतिशय छान लागले असे सांगत होती.
(Photo Courtesy: Priya)

लाल ढबु मिरचीचे सुप (Red Bell Pepper Soup)

१ लाल ढबु मिरची
२ पिकलेले मोठे टोमॅटो किंवा तयार टोमॅटो सुपचा १ कॅन
मीठ, साखर, लाल तिखट चवीप्रमाणे
हवा असेल तर थोडा गरम मसाला

कृती - ढबु मिरचीला तेल लावुन वांगे भाजतो तसे भाजुन घ्यावे. वरुन साल संपुर्ण काळी पडली पाहीजे. भाजुन झाल्यावर मिरची एका भांड्याखाली झाकुन ठेवावी. १० मिनीटानंतर त्यावरची जळालेली काळी साल काढुन टाकावी. मिरची कापुन त्यातल्या बिया काढुन टाकाव्यात. आता मिक्सरच्या भांड्यात मिरचीचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे किंवा कॅनमधले सुप, मीठ, तिखट, साखर, गरम मसाला घालुन बारीक वाटावे. साधारण एक ते दीड कप पाणी घालुन नीट बारीक करुन घ्यावे. बारीक केलेले मिश्रण जर गाळुन घेतले तर सुप खुपच छान एकजीव दिसते. आता हे सुप मंद आचेवर उकळायला ठेवावे. एक उकळी आल्यावर गरम गरम वाढावे. सजावटीसाठी Basil leaves बारीक चिरुन टाकावी.

टीप - १. सुप तुम्हाला हवे तसे पातळ किंवा घट्ट करता येते. शक्यतोवर गरम गरमच सर्व्ह करावे.
हिरव्या ढबु मिरची वापरुन हा प्रकार शक्यतोवर करु नये.

Wednesday, July 04, 2007

कोल्हापुरी मिसळ (Kolhapuri Misal)


कोल्हापुरी मिसळ हा एक प्रकार करायला मला प्रचंड आवडते. पप्पांचे अजोळ कोल्हापूर त्यामुळे माझे तिकडे जाणे-येणे पण खुप असायचे. असेच एकदा गेले असताना मामीनी मला हा प्रकार करायला शिकवला. कोल्हापूरला सगळे खुपच तिखट खातात असा एक सार्वत्रीक समज आहे. पण ते तितकेसे खरे नाही. जेवण मसालेदार असते पण जाळ काढेल असे तिखट क्वचितच. तर ही घ्या कोल्हापुरी मिसळ - माझ्या पद्ध्तीने! हॉटेलवाले घालतात तेवढे तेल, आणि तिखट आणि मसाला वापरुन जर मी कुणाला करुन घातली तर मला लोक वाळीतच टाकतील!!!

Assembled Misal - Ready to eat


मटकीची उसळ -
४ वाट्या मोड आलेली मटकी
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ टेबल्स्पून तेल - फोडणीसाठी
कढीपत्ता आणि इतर फोडणीचे साहित्य
२ लहान लसुण पाकळ्या (आवडत असतील तर)
कांदा-लसुण मसाला - २ चमचे (आवडीप्रमाणे कमी जास्त करावे)
चवीप्रमाणे मीठ
थोडेसे पाणी - मटकी शिजवण्यापुरते

कृती - तेलाची नेहेमीप्रमाणे कढिपत्ता घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यातच लसुण पाकळ्या ठेचुन टाकाव्यात. त्यावर चिरलेला कांदा मध्यम आचेवर परतवुन घ्यावा. त्यात मटकी घालुन ती पण नीट परतुन घ्यावी. त्यावर आता कांदा-लसुण मसाला, मीठ घालुन परतावे. साधरण १/२ कप पाणी घालुन झाकण ठेवुन मटकीची उसळ शिजवुन घ्यावी.

मिसळीचा कट -
२ मोठे लाल कांदे पातळ उभे चिरुन
२ चमचे लाल तिखट (लाल रंगाचे पण खुप तिखट नसलेले ब्याडगीचे वापरणार असाल तर २ चमचे अन्यथा चवीप्रमाणे कमी करावे)
चवीपमाणे मीठ
२ चमचे गरम मसाला
२ टेबल्स्पून कोरडे खोबरे
२ टेबलस्पून ओले खोबरे
३ टेबल्स्पून तेल
५-६ लसुण पाकळ्या
१/२ इंच आले
१/२ वाटी कोथिंबीर

कृती - १ चमचा तेल जाड बुडाच्या कढईत घालुन त्यावर कापलेल्यापैकी २/३ कांदा मंद आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतुन घ्यावा. त्यातच आल्याचे तुकडे, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, दोनही प्रकारचे खोबरे घालुन अजुन साधारण ३-४ मिनीटे परतुन घ्यावे. परतत असताना काहीही जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी. थोडावेळ थंड करुन कमीत कमी पाणी वापरुन मसाला वाटुन घ्यावा.
आता उरलेला कांदा २ चमचे तेलात फोडणी करुन परतुन घ्यावा. त्यावर लाल तिखट घालुन परतावे. तिखट घालुन परतताना घराच्या खिडक्या दारे उघडायला विसरु नये. त्यावर वाटलेला मसाला घालुन साधरण ५-७ मिनीटे व्यवस्थीत परतुन घ्यावे. त्यात गरम मसाला आणि मीठ घालुन साधरण ५-६ कप पाणी घालावे. गॅस बारीक करुन झाकण न ठेवता कट नीट उकळु द्यावा. असे केल्याने तेलाचा तवंग नीट येतो अगदी कमी तेल घातले तरी. उकळताना पाणी अटेल त्यापमाणे जस्ती घालावे. तयार कट ५-६ कप असावा.

मिसळीसाठी लागणारे इतर साहीत्य -
२ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन चिरुन
५-६ वाट्या फ़रसाण
१/२ वाटी कोथिंबीर
१ लाल कांदा बारीक चिरुन
२ लिंबु फोडी करुन
६-८ ब्रेड स्लाईसेस

वाढण्याची रीत -
एका पसरट बाऊल मधे साधरण १/२ कप उसळ घालावी. त्यावर १/२ कप फ़रसाण, त्यावर ५-६ बटाट्याच्या फोडी, साधारण १/२ कप कट, चमचाभर कांदा, चमचाभर कोथिंबीर घालावे. बरोबर २ ब्रेड स्लाईस आणि लिंबु द्यावे. खुप सारे Tissue papers द्यायला ही विसरु नये!!

टीप - हा पदार्थ खाउन कुणाला त्रास झाला तर मी जबाबदार नाही!!

Tuesday, July 03, 2007

स्ट्रॉबेरी लस्सी (Strawberry Lassi)

१० ते १२ मोठ्या गोड स्ट्रॉबेरीज
२ कप Fat free दही
चवीप्रमाणे साखर
१/२ कप पाणी

कृती - साखर वगळुन सगळे पदार्थ मिक्सरमधुन बारीक प्युरी करुन घ्यावी. चव बघावी व त्यानुसार साखर घालुन परत एकदा मिस्करमधुन नीट मिसळुन घ्यावे. लस्सी कमीत कमी २ तास फ्रीजमधे ठेवुन मग सर्व्ह करावी.

टीप - घट्ट आणि rich लस्सी हवी असेल तर पाणी न घालता दुध घालावे. Fat free दह्याऐवजी full fat, 1%, 2% दही वापरता येते.

सोयाबीन आणि गाजराची भाजी (Soybean and Carrot bhaaji)

Soybean and Carrot bhaaji
२ वाट्या फ्रोजन सोयाबीन्स (US मधे बरेच ठिकाणी मिळतात. भारतात ताज्या शेंगा मिळतात त्याचे दाणे काढुन घ्यावेत)
१ वाटी गाजराचे तुकडे (१/२ इंच लांबी रुंदीचे करावेत)
२-३ टेबलस्पुन ओले खोबरे
१-२ लसुण पाकळ्या
१ टीस्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जस्ती करायला हरकत नाही.)
२ टेबलस्पून तेल, फोडणीचे सामान
१ चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला
चवीप्रमाणे मीठ

कृती - जिरे, खोबरे, लसुण, मिक्सरवर बारीक वाटुन घावे. जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत तेलाची फ़ोडणी करुन घ्यावी. त्यावर सोयाबीन परतुन घ्यावेत. साधारण परतत आले की त्यावर गाजर घालुन थोडावेळ परतावे. त्यावर केलेले वाटण घालावे. त्यावर गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालावे. १-२ मिनीटे परतुन झाकुन मध्यम गॅसवर व्यवस्थीत शिजु द्यावे. शिजताना गरज असेल तर किंचीत पाणी घालावे. किंवा भांड्यावर झाकणीत पाणी घालुन तसे शिजवावे. शिजल्यावर गॅस बंद करुन वरून बारीक चिरलेली कोथींबीर घालावी.

टीप - भारतात थंडीमधे ताजे वाल/पावट्याचे दाणे मिळतात, सोयाबीनच्या ऐवजी ते घातले तरी भाजी छान होते.

Tuesday, June 26, 2007

आंबा आईसक्रिम !!??!! (Mango Ice Cream)

१ वॅनीला आईसक्रिम पॅक
१ मोठा आंबा
१/४ वाटी साखर
१-२ काड्या केशर
२ वेलच्यांची पूड

कृती -
आंब्याची साल काढुन साधारण इंचभर मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात आंब्याचे तुकडे, साखर, केशर, वेलची पुड एकत्र करुन मध्यम गॅसवर ठेवावे. सतत धवळत रहवे. आंबा साधरण शिजत आला की गॅस बंद करुन मिश्रण थंड होउ द्यवे.

वॅनिला आईसक्रिम थोडे thaw करुन घ्यवे आणि वरील थंड केलेले मिश्रण त्यात मिसळावे. साधरण Marble Effect येईल असे मिसळावे. एकजीव करण्याची जरुरी नाही.
हे मिसळलेले आईसक्रीम परत container मधे भरुन फ्रीझर मधे ठेवावे. सेट झाल्या खायला द्यावे.

आंब्याचे मिश्रण जास्त झाल्यास serve करताना आईसक्रीम वर थोडे घलुन serve करवे.

टीप- ह पदार्थ strawberries, raspberries, peaches, mixed berries अश्य कोणत्यही फ़ळाचे करु शकता. पण अशि exotic फ़ळे वापरताना वेलची, केशर नाही टाकले तरी चलते.

Saturday, June 23, 2007

वेज कुर्मा (Vegetable Kurma)

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/vegetablekurma


२ मोठे बटाटे
२ मोठे लाल कांदे
२ मध्यम टोमॅटो
साधारण १/२ वाटी खोवलेले ओले खोबरे (थोडे कमी वापरले तरी चालते)
२-३ मध्यम पाकळ्या लसुण
छोटा तुकडा आले
२ वेलचीचे दाणे
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे
२ चमचे गरम मसाला
फोडणीसाठी सढळ हाताने तेल, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, हिंग

कृती - कांदा उभा पातळ कापावा म्हणजे व्यवस्थीत भाजला जातो. बटाटे धुवुन साल न काढता त्याचे साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. टोमॅटोचे पण साधारण त्याच आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. एका जाड बुडाच्या कढईत अर्धे तेल तापायला ठेवावे. त्यात जिरे घालुन कांदा परतायला घ्यावा. अर्धा परतत आल्यावर त्यात लसुण आणि आल्याचे तुकडे घालावेत. त्यात ओले खोबरे घालावे आणि व्यवस्थीत सोनेरी रंगावर परतुन घ्यावे. नीट परतल्यावर थोडावेळ थंड होऊ द्यावे. आणि मिक्सरवर बारीक वाटुन घ्यावे.
आता उरलेले तेल त्याच कढईत तापत ठेवावे, जिरे, मोहरी, कढिपत्ता, हिंग, हळद घालुन फोडणी करावी. त्यातच वेलचीचे दाणे पण घालावेत. बटाट्याचे तुकडे घालुन ते नीट परतुन घ्यावे. त्यावर टोमॅटो घालुन परतावे. त्यावर केलेले वाटण घालुन एकदा परतावे. तिखट, मीठ, गरम मसाला घालावा. शिजण्यापुरते पाणी घालुन गॅस बारीक करुन झकण न ठेवता शिजवत ठेवावे. अर्धी कोथिंबीर शिजताना घालावी. बटाटे नरम शिजले की उरलेली कोथिंबीर घालुन गॅस बंद करावा.

टीप - १. कांदा व्यवस्थीत परतुन घ्यावा नाहीतर चव चांगली लागत नाही. आणि अर्धवट भाजलेल्या कांद्याचा वास पण वेगळा येतो.
२. मला फक्त बटाट्याचा कुर्मा आवडतो पण फ्लॉवर, ग्रीन बीन्सचे मोठे तुकडे घातले तरी छान लागते.
३. हा पदार्थ पुरी बरोबर छान लागतो (असे सगळे म्हणतात)!!!

Thursday, June 21, 2007

कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhaji - Onion Fritters)

(Link to English Recipe)

Enjoy

१ मोठा लाल कांदा
तिखट, मीठ - चवीप्रमाणे
बेसन अंदाजे लागेल तितके
तेल तळण्यासाठी लागेल तितके
किMचीत हळद
असेल तर चिमुटभर ओवा
मुठभर कोथींबीर

कृती -
कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० मिनीटे बाजुला ठेवावे. १० मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.

टीप - १. ह्या भजीला खेकडा भजी असेही म्हणतात.
२. पीठ भिजवताना पाणी अजिबात वापरु नये.
३. शक्यतोवर लाल कांदा वापरावा. निदान पांढरा कांदा वापरु नये.
४. ही भजी कुरकुरीत होण्यासाठी सोडा घालायची गरज नाही. सोड्याने भजी तेलकट होतात.

Wednesday, June 20, 2007

ओटब्रानचा उपमा (Oat Bran Upma)

Here is link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/02/oat-bran-upma.html

Oat Bran Upma
१.५ कप ओट ब्रान
३.५ कप पाणी
१ लहान कांदा बारीक चिरुन
०.५ वाटी मटारदाणे
२-३ हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करुन
चवीप्रमाणे मीठ
२ लहान चमचे तेल
१ लहान चमचा तुप
उपम्यासाठी लागणारे फोडणिचे साहित्य, कोथींबीर, ओले खोबरे, अर्ध्या लिंबाचा रस.

कृती -
तेल तापवुन फोडणी करुन घ्यावी. हिरव्या मिरच्या आणि कांदा व्यवस्थीत सोनेरी रंगावर भाजुन घ्यावा. त्यात मटार दाणे घालुन ३-४ मिनीटे परतावे. त्यात १ चमचा तुप घालुन १-२ मिनीटे परतावे. आता त्यावर पाणी घालुन मीठ, लिंबाचा रस, कोथींबीर, ओले खोबरे घालुन झाकुन एक उकळी आणावी. त्यावर गॅस बारीक करुन ओटब्रान त्यात हळुहळु घालुन गुठळी न होऊ देता मिक्स करुन घ्यावे. भांड्यावर झाकण ठेवुन ५ मिनीटे ठेवावे. चमच्याने व्यवस्थीत मिक्स करुन गॅस बंद करावा. वरुन लिंबु, ओले खोबरे, कोथींबीर घालुन वाढावे.

टीप - नेहेमीच्या उपम्यात घालतो तशी उडदडाळ, हरभराडाळ फ़ोडणीत छान लागते. साध्या रव्यापेक्षा ओटब्रान मधे fiber आणि protein जास्ती असल्याने हा प्रकार जास्त healthy होतो.

Wednesday, April 25, 2007

मोडाण्यांची भेळ (Sprout Bhel)

१ वाटी मोड आलेले मुग किंवा मटकी
१ उकडलेला लहान बटाटा बारीक चिरुन
१ वाटी काकडी बारीक चिरुन
१ मध्यम टोमॅटो बारीक चिरुन
१/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरुन
१/२ लाल कांदा बारीक चिरुन
चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर
२-३ चमचे खजुर-चिंचेची चटणी
१-२ चमचे पुदीना चटणी
सजावटीसाठी बारीक शेव

कॄती - शेव वगळुन बाकीचे सगळे पदार्थ एकत्र करुन घ्यावेत. खायला देतेवेळी त्यावर बारीक शेव पसरुन द्यावी.

टीप - हवा असेल तर १/२ वाटी फ़रसाण मिसळायला हरकत नाही.

पालकाची कोशिंबीर (Spinach Salad)

Spinach Salad१ जुडी कोवळा पालक बारीक चिरुन
१/४ लाल कांदा अगदी बारीक चिरुन
साखर, मीठ, लिंबु चवीप्रमाणे
२ चमचे दाण्याचे कुट
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग

कृती - थोड्या तेलाची फोडणी करुन घ्यावी. चिरलेला पालक आणि कांदा एकत्र करावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबु घालावे. त्यावार, दाण्याचे कुट आणि फोडणी घालुन एकत्र करावे.

टीप - कच्चा कांदा आवडत नसेल तर वगळायला हरकत नाही पण ह्या कोशिंबीरीत कच्चा कांदा अतीशय छान लागतो.

मुळ्याची कोशिंबीर - २ (Radish Salad -1)

१ कोवळा मुळा पानांसहीत
१/२ लाल कांदा
१/२ वाटी दही
मीठ, साखर चवीप्रमाणे
२ मिरच्या उभ्या चिरुन
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिंग

कृती - मुळ्याची कोवळी पाने काढुन धुवुन बारीक चिरुन घ्यावी. मुळा साल काढुन बारीक खिसुन घ्यावा. कांदा एकदम उभा आणि पातळ कापुन घ्यावा. लहान कढईत तेलाची फोडणी करुन घ्यावी. त्यात मिरची घालुन थोडे हलवावे. त्यात कांदा घालुन नीट सोनेरी रंगावर परतुन घ्यावा. मुळ्याचा पाला, खिस, मीठ, साखर आणि परतलेला कांदा एकत्र करावा. खायला वाढतेवेळी दही घालुन नीट मिसळुन घ्यावे.

टीप - मुळ्याचा पाला कोवळा नसेल तर घालु नये. तो घशाला टोचतो. त्याऐवजी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरी छान लागते.
लाल मुळे वापरायचे असतील तर साधारण ६-७ मुळे लागतील.

मुळ्याची कोशिंबीर - १ (Radish Salad)

१ कोवळा पांढरा मुळा नाजुक खिसुन
१/४ वाटी खोवलेले ओले खोबरे
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढिपत्ता
मीठ, साखर चवीप्रमाणे

कृती - खिसलेला मुळा, ओले खोबरे, कोथिंबीर एकत्र करुन घ्यावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. अगदी कमी तेलात फोडणी करुन ह्यावर ओतावी. आणि हलक्या हाताने एकत्र करावे.

टीप - ह्या कोशिंबीरीला फोडणीमधे हळद घालु नये. पांढरी-हिरवी कोशिंबीर फ़ार सुरेख दिसते.
लाल लहान मुळे घ्यायचे असतील तर साधारण ६-७ वापरायला हरकत नाही.

पचडी (Mixed vegetable Salad)१ मुठ कोवळी मेथी - निवडुन बारीक चिरुन
१ गाजर खिसुन
१/२ वाटी कोवळॆ मटारदाणे
१/२ वाटी खिसलेला मुळा
१ लहान टोमॅटो बारीक चिरुन
१ मुठ कोथिंबीर - निवडुन बारीक चिरुन
१ चमचा साखर
१ चमचा दाण्याचे कुट
चवीपुरते मीठ
१/४ लिंबाचा रस
२ लहान मिरच्या उभ्या चिरुन
१ लहान चमचा तेल, फोडणीचे साहित्य

कृती - एका लहान कढईत नेहेमीप्रमाणे जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करुन घ्यावी. त्यातच मटार दाणे घालुन साधारण ३-४ मिनीटे परतावे. बाकी खिसलेल्या / चिरलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करुन त्यात दाण्याचे कुट, मीठ, लिंबु, साखर घालावे. त्यावर तयार केलेली फ़ोडणी घालावी. सगळे नीट मिसळुन घ्यावे.

टीप - मुळ्याचा कोवळा पाला, पालक, सोलाणे (कोवळे हरबरा दाणे), अशा भाज्या आवडत असतील तर घालायला हरकत नाही.

लहान मुलांसाठी करायचे असेल तर मिरची घालु नये.

कोबीची कोशिंबीर (Cabbage Salad)
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
१ हिरवी मिरची
१ चमचा दाण्याचे कुट
१/४ लिंबाचा रस
१/२ चमचा साखर
चवीप्रमाणे मीठ
थोडी चिरलेली कोथिंबीर
फ़ोडणीसाठी - १ चमचा तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद

कृती - एका लहान फ़ोडणीच्या वाटीत तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फ़ोडणी करुन घ्यावी. त्यातच हिरव्या मिरचीचे तुकडे टाकुन गॅस बंद करावा. एका पसरट बाउलमधे कोबी, दाण्याचे कुट, मीठ, लिंबुरस, साखर, कोथिंबीर घालुन नीट मिसळून घ्यावे. त्यावर तयार केलेली फोडणी घालावी. आणि एकदा नीट मिसळुन घ्यावे.

टीप - ह्या कोशिंबीरीमधे लिम्बुरसाच्या ऐवजी २ चमचे दही घातले तरी छान लागते.

गाजराची कोशिंबीर पण आशीच करता येते.

Tuesday, April 17, 2007

Karlyachi Bhaji

(Link to Marathi Recipe)

Bitter Gourd Bhaji

I am not a big fan of bitter gourd, but I eat it as its good for health. I try to make it healthier and tasty at the same time.2-3 Bitter Gourds
3-4 tbsp Coarsely Ground Roasted Peanuts
1 tsp Garam Masala (or per taste)
1.5 tsp Red Chili Powder (or per taste)
Salt per taste
1.5 tbsp Grated Jaggery
*1.5 tsp Tamarind Pulp
1 tbsp Oil
For Tempering - 1/2 tsp Cumin Seeds, 1/2 tsp Mustard Seeds, Pinch of Hing, Pinch of Turmeric powder


Preparation -
Wash bitter gourds and chop the tips off. If you do not like too much of bitterness, remove the inside with back of a spoon. If you are okay, leave it. Then thinly slice all the gourds. Sprinkle little bit of salt over and leave it untouched for 10-15 minutes.
Squeeze the water out of the gourd pieces if you want, it reduces bitterness. It is okay to leave them as is like I do.
Heat oil in a heavy bottom frying pan. Make tempering as usual by adding cumin seeds and mustard seeds. Once mustard seeds start spluttering, add hing and turmeric powder.
Add sliced bitter gourd, lower the heat and saute for almost 10 minutes or so.
Add salt, red chili powder, garam masala, peanut powder, jaggery and tamarind pulp. Mix thoroughly.
Saute for another 3-4 minutes.
Sprinkle chopped cilantro and serve with chapatis.

Tips -  
  1. * I usually add little warm water to 1 tablespoon size of tamarind and leave it for 10-15 minutes. Then squeeze the pulp. 
  2. Never use water while cooking bitter gourd, that makes the bhaji more bitter.

कारल्याची भाजी (Bitter Gourd Bhaaji)

(Link to English Recipe)

कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :)
Karlyachi bhaji
२-३ मध्यम आकाराची कारली
४-५ चमचे शेंगदाण्याचे कुट
गरम मसाला, तिखट, मीठ - चवीप्रमाणे
साधारण लहान लिंबाएवढा गुळ (जरा बारीक करुन किंवा साखर घातली तरी चालेल)
१ चमचा आमचुर किंवा थोडासा चिंचेचा कोळ
तेल, फोडणीचे साहीत्य

कृती - कारली धुवुन कडेने कापुन घ्यावीत. त्यातला गर काढुन टाकावा. कारल्याच्या चकत्या करुन त्यांना किंचीत मीठ लावुन १०-१५ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे.
कढईत तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. त्यावर कारल्याच्या चकत्या घालुन कमीत कमी १० मिनीटे मध्यम आचेवर परतुन घ्याव्यात. त्यावर मीठ, तिखट, मसाला, दाण्याचे कुट, गुळ, आमचुर घालुन अजुन साधारण २-३ मिनीटे परतावे. वरुन कोथिंबीर घालुन वाढावे.

टीप - १. कारले शिजवताना कधीही पाणी वापरु नये त्याने कारल्याचा कडुपणा वाढतो.
२. कारल्याच्या चकत्या करताना गर न काढता तशाच केल्या तर थोडा कडवटपणा जास्ती रहातो त्यामुळे आमचुर, गुळ यांचे प्रमाण कमीजस्ती करावे लागेल.

मसालेभात (Masale bhat)

मसालेभात करायला खुप अवघड असतो असे माझे प्रामाणिक मत होते. पण एकदा माझी मैत्रीण सविताने केलेला भात खाल्ला आणि तसाच करुन बघीतला तेव्हा तो समज दुर झाला. सविताची ही रेसिपी तुमच्यासाठी!

Masale Bhat

१ वाटी तांदुळ धुवुन पाणी काढुन टाकुन अर्धा तास ठेवावेत.
१/२ वाटी मटार दाणे
१ ते २ टी. स्पून गोडा मसाला
५-६ पाने कढीपत्ता (एखादे तमलपत्र घालायला हरकत नाही)
७-८ तुकडे काजु
मीठ, लाल तिखट चविप्रमाणे
मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली, मुठभर खोवलेले ओले खोबरे
२-३ टेबलस्पून तेल, फोडणीचे साहित्य
२ वाटी पाणी गरम करुन

कृती - तांदुळ धुवुन कमीतकमी अर्धातास तरी निथळत ठेवावेत. एका बाजुला २ वाट्या पाणी गरम करायला ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवुन त्यात नेमेमीप्रमाणे फोडणी करुन घ्यावी. फोडणीमधे कढीपत्ता टाकुन छान तडतडु द्यावा. त्यावर काजुतुकडे घालुन एखादा मिनीट परतुन घ्यावे. त्यावर मटारदाणे घालुन ३-४ मिनीटे परतुन घ्यावे. आता त्यावर तांदुळ घालावेत. मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, थोडी चिरलेली कोथिंबीर, हवी असेल तर किंचित साखर घालुन तांदुळ हलक्या हाताने ५-६ मिनीटे परतुन घ्यावा. आता त्यावर गरम पाणी घालुन एक उकळी आणावी. उकळी आणल्यानंतर गॅस मध्यमपेक्षा थोडा कमी करुन झाकण ठेवावे. १२-१५ मिनीटामधे गरम मसालेभात तयार!
गॅस बंद करुन एक वाफ़ जाउ द्यावी आणि त्यावर खोबरे कोथिंबीर घालुन सजवावे. खाताना मस्तपैकी तुप घालुन खावा.

टीप - १. तांदुळ धुवुन कमीतकमी अर्धा तास तरी निथळत ठेवावेत नाहीतर चव वेगळी लागते. मी बासमती, सोनामसुरी, इंद्रायणी, रत्नागीरी २४ असल्या सगळ्या प्रकारचे ताम्दुल वापरुन हा भात केलेला आहे. सोना मसुरीला थोडे पाणी जास्ती लागते, तर इंद्रायणीला थोडे कमी लागते. पाण्याचे प्रमाण तांदळानुसार कमी जस्ती करावे.
२. गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घालुन पण हा भात चान लागतो.
३. मी फोडणीमधे खडा मसाला घालत नाही हवा असेल तर मात्र मसाला आणि तिखटाचे प्रमाण कमीजास्त बघावे लागेल.

Friday, April 06, 2007

भरली कारली (Stuffed Bitter Gourd)

Stuffed Bitter Gourd

४-५ मध्यम आकाराची कारली
४-५ चमचे दाण्याचे कुट
१ मुठ तीळ भाजुन कुट क्रुन
१ मुठ सुके खोबरे भाजुन चुरा करुन
१ चमचा आमचुर
१ चमचा साखर
१ चमचे गरम मसाला किंवा गोडा मसाला
मीठ, लाल तिखट - चवीप्रमाणे
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरुन

फ़ोडणीसाठी - ४-५ टीस्पून तेल आणि फोडणीचे सामान

कृती - कारली धुवुन देठ आणि टोकाच्या बाजुने कापुन आतला गर काढुन टाकावा. आतल्या बाजुला थोडे मीठ लावुन कारली १५-२० मि. साठी बाजुला ठेवुन द्यावीत. मसाल्याचे सगळे सामान एकत्र करुन नीट एकत्र करावे. खुप कोरडे वाटत असेल तर एखादा चमचा पाणी घालावे. हा मसाला आता कारल्यामधे भरावा. आता ही भरलेली कारली मोदकांप्रमाणे वाफवुन घ्यावीत. साधारण ५-७ मिनिटांमधे कारली पुरेशी शिजतात आणि मसाला बाहेर पडत नाही.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. उरलेला मसाला त्या तेलात घालुन वरती वाफ़वलेली कारली घालुन व्यवस्थीत परतुन घ्यावे. गॅ्स बारीक ठेवावा नाहीतर मसाला जळू शकतो. ३-४ मिनीटे परतल्यावर गॅस बंद करावा.

पावभाजी (Pav Bhaji)

२ बटाटे साल काढलेले
१ मध्यम कांदा
१ टोमॅटो
१ मध्यम ढबु मिरची
साधारण पाव किलो cauliflower
१ गाजर

वरील सगळ्या भाज्या मोठे मोठे (२-२ इंचाचे) तुकडे करुन कुकर मधे १ शिट्टी करुन शिजवुन घ्याव्यात. शिजवताना पाणी सुटेल ते बाजुला काढुन ठेवुन भाज्या पोटॅटो मॅशरने ठेचुन साधरण लगदा करुन घ्यावा.

१ मोठा कांदा (शक्यतो लाल)अगदी बारीक चिरुन
२ मध्यम टोमॅटो बारीक चिरुन
१ मोठी वाटी मटार मायक्रोवेव मधे बोटचेपे शिजवुन
१ इंच आले खिसुन
२-३ चमचे बादशहाचा पावभाजी मसाला
१-२ चमचे धणेपावडर
मीठ चवीप्रमाणे
तिखट - चवीप्रमाणे
३-४ टेबलस्पून तेल
जिरे, मोहरी, हळद

मध्यम आकाराच्या कढईत तेल तापवुन त्यात जिरे, मोहरी, हळद घालुन फ़ोडणी घालावी. त्यावर कांदा परतावा. कांदा नीट गुलबट रंगावर परतावा. त्यात टोमॅटो घालुन परातायला घ्यावे. परतताना त्यात मीठ, पावभाजी मसाला, धणे पावडर, खिसलेले आले घालावे. आता हे सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत परतावे. त्यावर शिजवलेले मटार दाणे घालुन परतावे. १-२ मि. परतल्यावर पोटॅटो मॅशरने ते ठेचुन घ्यावेत. त्यावर बकिच्या भाज्यांचे मिश्रण घालुन व्यवस्थीत मिसळावे. भाजी खुप घट्ट होत असेल तर भाज्यांचे शिजवलेले पाणी घालावे. चविप्रमाणे तिखट मीठ घालावे.
वरुन कोथिंबीर घालावी.

पावभाजीचे पाव गरम करताना तेल किंवा तुपावर भाजावेत.

टीप -
१. भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करावे.
२. मायक्रोवेव नसेल तर मटार चळणीवर वाफ़वुन घेता येतात किंवा फोडणीमधे बोटचेपे शिजवले तरी चालतात.
३. के. प्र. पावभाजी मसाला अतीशय छान आहे मिळत असेल तर तोच वापरावा.
४. गाड्यावरची पावभाजी भरपुर बटर मधे केलेली असते पण मला बटरची चव खुप अवडत नसल्याने मी बटर कधीही वापरत नाही.
५. भाजी खुप प्रमाणात केल्यास पाव पण खुप भाजावे लागतात त्यासाठी तेल किंवा बटर लावुन १५० डीग्री फॅरेनहाईट वर ओव्हन गरम करुन त्यात ५ ते ७ मिनीटे ठेवावे.
६. वरुन घालायचा कांदा कच्चा आवडत नसेल तर किंचीत तेलावर परतुन त्यावर खोडेसे मीठ आणि पाव्भाजी मसाला भुरभुरावा.

Thursday, April 05, 2007

झटपट पन्हे (Instant Panhe)

कैरी नसलेले पन्हे म्हणले तर तुमचा 'आ' वासण्याची शक्यता आहे. पण हा प्रकार अगदी पन्ह्याप्रमाणेच लागतो.
Panhe


१ कप Unsweetened Apple Sauce
१ कप Frozen Lemonade
मीठ चविप्रमाणे
वेलची केशर - आवडीप्रमाणे

कृती - Apple Sauce आणि Lemonade एकत्र करायचे. त्यात साधारण २-३ ग्लास पाणी घालुन किंचीत मीठ घालायचे. आवडीप्रमाणे वेलची/केशर पुड घालुन थंड करायला ठेवायचे.

टीप - लेमोनेडमधे साखर असल्याने साखर घालु नये. पण साधा लिंबुरस घालणार असाल तर साखरेचे प्रमाण पहावे लागेल.

कैरीचे पन्हे (Kairiche Panhe)

१ कैरी
४-५ चमचे साखर
१/२ चमचा मीठ
वेलची, केशर - आवडीप्रमाणे

कैरी कुकरमधे शिजवुन ह्यावी. भाताबरोबर नीट शिजते पण नुसतीच ठेवायची असेल तर १ शिट्टी पुरते. साल काढुन गर काढुन घ्यावा. त्यात साखर मिसळून नीट विरघळवुन घ्यावी. चविपुरते किंचीत मीठ घालावे. आवडीप्रमाणे वेलची आणि केशर घालावे. १ ग्लास पन्हे करायचे असेल तर हे मिश्रण साधारण १/४ ग्लास घ्यावे आणि त्यात पाणी घालुन मीठ/साखरेचा अंदाज घ्यावा.

टीप - कैरीच्या अंबटपणावर साखरेचे प्रमाण अवलंबुन आहे त्यामुळे ते स्वत:च्या चवीप्रमाणे ठेवावे.
कैरीच्या गरामधे साखरेऐवजी गुळ आणि वेलची/केशराऐवजी जिरेपावडर घालुन ते चपातीबरोबर तोंडीलावणे म्हणुन पण छान लगते.

Friday, March 30, 2007

अक्की रोट्टी (Akki Roti)

अक्की म्हणजे कन्नड मधे तांदुळ, आणि रोट्टी म्हणजे भाकरी.
ही रेसीपी माझी मैत्रीण मनिषा हिची आहे.

Akki Roti

२-३ हिरव्या मिरच्या,
छोटा आल्याचा तुकडा,
१ चमचा जिरे
मीठ

हे सर्व मिक्सरमधे बारीक करुन घ्यावे.

१ गाजर बारीक खिसुन
१/२ कप हिरवे वाटाणे - थोडेसे ठेचुन किंवा फूडप्रोसेसर मधुन काढुन घ्यावे.
छोटा कोबीचा तुकडा - बारीक चिरुन किंवा खिसुन
१/२ कप शेपू/कोथिंबीर/मेथी चिरुन
२-३ टेबल्स्पून खिसलेले कोरडे खोबरे

तांदळाचे पिठ - लगेल तितके साधरण १ ते १.५ वाटी पिठ लागेल.

चिरलेल्या, खिसलेल्या सगळ्या भाज्या एकत्र कराव्यात. त्यात केलेले वाटण घालावे. त्यात खोबर घालावे. सगळे नीट एकत्र करावे. त्यात एक वाटी तांदळाचे पिठ घालुन चवीप्रमाणे मीठ घालावे. पिठ मळता येत असेल तर मळुन घ्यावे. कोरडे वाटत असेल तर किंचीत पाणी घालुन नीट मळु्न घ्यावे. पिठाची consistency थालीपिठाच्या consistency झाली पाहीजे.

ह्या पिठाची नेहेमीच्या थालीपिठासारखे थालीपिठ कराव पण त्याला छिद्रे न पाडता तव्यावर किंचीत तेल टाकुन भाजुन घ्यावेत.

अक्की रोट्टी गरम गरम खायला मस्त लागते.

टीप - ह्याबरोबर दाणे, कोथिंबीर, मिरची आणि दही घालुन केलेली चटणी छान लागते. गाजर, कोबीची दही घालुन केलेली कोशिंबीर पन मस्त लागते.

कैरीची डाळ (Kairichi/Ambyachi Daal)

कैरीची डाळ
चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा आहे.

१ कैरी (अमेरीकेमधे मिळणार्या कै~याना अंबटपणा यथातथाच असतो त्यामुळे १ कैरी लागते भारतातल्या कैरी मधे तोतपुरी घेतला तर १ मध्यम कैरी लागेल साधी कैरी वापरली तरी चवीप्रमाणे कमी करावी लागेल.)
१ वाटी हरबरा डाळ
२-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात)
मीठ चविप्रमाणे
१ टीस्पून साखर
१/२ इंच आल्याचा तुकडा
फ़ोडणीपुरते तेल
फोडणीचे साहित्य - हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती - हरबरा डाळ थंड पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी. कैरीची साल काढुन त्याचे तुकडे करावेत किंवा सरळ कैरी खिसुन घ्यावी. हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढुन त्याचे पण तुकडे करावेत. कैरी, डाळ, मीठ, आले, मिरची एकत्र करुन मिक्सरमधे जाडसर वाटुन घ्यावे. कैरी खिसली असेल तर मिक्सरमधे बारीक न करता तशीच डाळीमधे मिसळली तरी चालते. साखर घालुन सगळे एकत्र नीट मिसळुन घ्यावे.
तेलाची हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप - ही डाळ तशीच खायला, पानाच्या डाव्या बाजुला वाढायला चांगली वाटते. टॉर्टीया चिप्स बरोबर सालसाच्या ऐवजी पण मस्त लागते.

खजुर रोल्स (Date Rolls)

Khajur Rolls१० ते १२ खजुर (बिया काढुन)
१५ ते २० बदम बिया
१५ ते २० काजु बिया
२ ते ३ टीस्पून खसखस भाजुन
४ ते ५ टीस्पून खोबरे भाजुन आणि चुरुन
२ ते ३ चमचे साखर (ही घातली नाहि तरी चालते)

कृती -
बदाम, काजुची भरड पुड करुन घ्यावी. खसखस भाजुन त्याची पाण बारीक पुड करुन घ्यावी. खोबरे गुलबट रगावर भाजुन चुरुन घ्यावे. फूडप्रोसेसर मधे बिया काढलेला खजुर मध्यम बारीक करुन घ्यावा. त्या बदाम काजुची पूड, खसखस पूड, चुरलेले खोबरे आणि घालणार असाल तर साखर घालुन एकदा फूडप्रोसेसर मधुन फ़िरवुन काढावे. तुपाचा हात लावुन अल्युमिनिअमच्या फॉईलवर मिश्रणाचा रोल करावा. त्याचे १ ईंच लांबीचे तुकडे करावेत.
हे रोल सहज ८ ते १० दिवस टिकतात.

कृती - हे रोल अजुन पौष्टीक करायचे असतील तर अक्रोड, पिस्ते वगैरे पण घालु शकता. किंवा दूधमसाल्यात बारीक केलेला खजुर घालुन पण झटपट रोल होऊ शकतात.

Thursday, March 29, 2007

ढब्बू (सिमला) मिरचीची मसालेदार भाजी (Bell Pepper with Gravy)अमेरीकेत स्वीट पेपर्स म्हणुन एक प्रकारची मिरची मिळते, ती वापरुन ही भाजी छान होते.

६-७ लाल रंगाचे स्वीट पेपर्स
१ मध्यम कांदा
१-२ लसुण पाकळ्या
१ मुठभर दाणे भाजलेले
१/२ मुठ तीळ भाजलेले
१/२ मुठ सुके खोबरे भाजलेले
छोट्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
गुळाचा छोटा तुकडा
कांदा लसुण मसाला (गरम किंवा गोडा मसाला आणि लाल तिखट वापरले तरी चालते), मीठ चवीप्रमाणे
Dhabu Mirachichi Bhaji

कृती -
मिरचीचे दांडे १/२ कापून भरल्या मिरचीसारखे ४ भाग करुन मिरच्या कापुन ठेवाव्यात. किंवा मिरचीला slit देवून बाजुला ठेवाव्यात.
कांदा मोठा मोठा चिरुन तेलावर परतावा. त्यातच भाजलेले हळद, लसुण पाकळी, दाणे, तीळ, खोबरे घालुन थोडे परतावे, जरा थंड झाले की मिक्सरमधुन बारीक वाटून घ्यावे. मसाला, मीठ, गुळ वाटणात घातले तरी चालते. आवडत असेल तर थोडी कोथींबीरही घालावी.
आता जड बुडाच्या कढईत तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फ़ोडणी द्यावी त्यात मिरच्या घालुन परताव्यात. नीट परतून झाले की मग वाटलेला मसाला घालुन चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालुन झाकण लावावे, मिरच्या नीट शिजु द्याव्यात. वरुन कोथींबीर घालुन गरम गरम पोळी बरोबर खावे.

टीप - स्वीट पेपर्स जर मिळत नसतील तर लाल ढबु मिरची घेऊन त्याचे मोठे (१.५ ईंच मोठे) तुकडे करुन ते वापरले तरी ही भाजी छान होते. मिरचीतल्या बिया शक्यतोवर काढुन टाकाव्यात. तीळ अवडत नसतील तर घातले नाहीत तरी चालतात. सुक्या खोबर्याच्या ऐवजी ओले खोबरे घतले तर वेगळी चव येते.

Tuesday, March 27, 2007

Tur dal Amati

तुरडाळीची आमटी
I think I have written over and over again that my grand moms were excellent cooks. This Aamati recipe is also from one of my grandma. A day-to-day daal with my Aajji's 50-55 years experience.

Aamti

1 cup Toor Daal
Small ball of Tamarind (or 1 tbsp Tamarind paste)
Small ball of Jaggery
Salt and Kolhapuri Masala (Kanda Lasun Masala) per taste
2 Cloves of Garlic
1 tbsp Grated Coconut (Fresh or Dry)
Chopped Cilantro
2 tbsp Oil
1/2 tsp each Cumin Seeds, Mustard seeds, Turmeric for tempering
Few curry leaves
Water as needed

Wash toor daal and pressure cook till soft (about 3 whistles). Soak tamarind ball in 1/2 cup warm water for 15-20 min and squeeze the pulp. Grind garlic, coconut and little bit of cilantro together and set aside. Heat oil in a vessel add mustard seeds, cumin seeds, turmeric powder and curry leaves and let it sizzle for few min. Now add tamarind pulp with water, kanda lasun masala, coconut-garlic paste. Add 1 cup water and cover. Let it boil for at least 5 minutes. Mash cooked daal with ladle and add to the boiling water, add salt and let it boil without covering it for at least 5 more minutes. Add chopped cilantro and serve warm with rice.

Tip - If you don't have Kanda Lasun Masala, you can add Goda/Kala masala and red chili powder.


Thursday, March 22, 2007

व्हर्जीन पिना कोलाडा (Virgin Pina Colada)

हा प्रकार किती authentic आहे माहीत नाही पण माझ्या मित्रमंडळाला खुप आवडतो.

५-६ कप पायनॅपल ज्युस
१ कॅन लाईट कोकोनट मिल्क (original recipe मधे कोकोनट क्रिम आहे जे खुप हेव्ही होते)
३-४ कप ginger ale ( हे मिळाले नाहीतर 7 up वापरले तरी चालते)
१ कप क्रश्ड पायनॅपल किंवा पायनॅपल तुकडे

कृती - पायनॅपल ज्युस, कोकोनट मिल्क, Ginger Ale थंड करायला ठेवावे. साधारण थंड झाले की ज्युस, मिल्क, एकत्र करुन परत थंड करायला ठेवावे. Ginger Ale अगदी ऎनवेळी घालावे नाहीतर त्यातला कार्बनडाय ऑक्साईड जाउन चव वेगळी लागते.
सर्व्ह करताना ग्लास मधे थोडा क्रश्ड पायनॅपल टाकुन त्यावर वर तयार केलेले ज्युस मिश्रण घालावे.

Wednesday, March 21, 2007

वांग्याचे भरीत (Khandeshi Bharit)

खानदेशी भरीत करताना केलेले हे फोटोफिचर पहा. यावरुन संपूर्ण तयारीची कल्पना येईल. 

Khandeshi Bharit


१ मोठे वांगे भरीत करण्यासाठी भाजुन घेतो तसे भाजुन घ्यावे
३-४ लसुण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
१ वाटी चिरलेली कांद्याची पात
१/२ वाटी चिरलेली कोथींबीर
मीठ चवीप्रमाणे
मुठभर कच्चे शेंगदाणे
सुक्या खोब~याचे काप मुठ्भर
फोडणीसाठी तेल (नेहेमीपेक्षा थोडे जास्त)
फोडणीचे साहित्य.

कृती - भाजलेल्या वांग्याची साल काढून टाकुन गर बाजुला ठेवावा. लसुण आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात बारीक करुन घ्याव्यात. लसुण-मिरची बारीक झाल्यावर त्यात वांग्याचा गर घालुन एकजीव करुन घ्यावा. आता कढईमधे तेल तापायला ठेवुन त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे आणि खोबरे घालुन परतावे. खोबरे सोनेरी रंगावर भाजले गेले की त्यात कांद्याची पात घालुन २-३ मिनीटे परतावे. त्यावर वांग्याचा गर, मीठ टाकुन व्यवस्थीत परतुन घ्यावे. वरुन कोथींबीर घालुन २-३ मिनीटे परतुन घ्यावे.

टीप - हे भरीत खानदेशी पद्धतीचे आहे. व्यवस्थीत तिखट असते त्यामुळे आवडत असेल तर मिरच्या वाधवायला हरकत नाही. त्यात मसाला वगैरे कही घालत नाहीत. भाकरी, पुरी, चपाती कशाहीबरोबर अप्रतीम लागते.

Mirachicha Thecha or Kharada

(Link to Marathi Recipe)

This is a spicy chutney that is made various ways in Maharashtra. Today I am going to share version that I grew up with. This is my father's favorite chutney and he can eat it almost everyday.

15-20 Spicy Green chilies
1/4 cup Peanuts
1/2 Bunch of Cilantro
5-6 Large Cloves of Garlic (add more if you like)
Salt Per Taste
1 tbsp Oil for Roasting

Preparation - 
Heat a pan on medium heat. Use cast iron pan if possible.
Roast peanuts.
Remove chili stems. Add 1 tbsp oil in kadhai. Roast chilies over medium heat making sure they are coated with oil. Roast until they are turning almost blackish.
Add cilantro and garlic. Roast neatly until cilantro almost dries out.
Let everything cool for 10-15 minutes.
Add salt and coarsely grind in mortar pestle or in mixer.


Tips - 
  1. This tastes best with Jowar roti. 
  2. Serve with little oil, it tastes better. 
  3. Add more oil and not water while grinding if needed. This way it stays longer.

दुध मसाला (Milk Masala)

Milk Masala


१ कप बदाम
१ कप काजु
१ कप पिस्ते
१ कप अक्रोड बी
१ टेबल्स्पून वेलची दाणे
१ टेबल्स्पून केशर
१ टीस्पून खिसलेले जायफळ (आवडीप्रमाणे कमी करता येईल किंवा नाही घातले तरी चालेल)

कृती -
वेलची आणि केशर आधी खलबत्त्यात बारीक करुन घ्यावे. मिक्सरमधे सगळ्या बिया एकत्र करुन बारीक कराव्यात. मिक्सर्वर खुप वेळ फ़िरवत राहीले तर पुड तेलकट होते. ते टाळायचे असेल तर pulse करत करावे. सर्वात शेवटी बारीक केलेली वेलची आणि केशर घालुन एकदा मिक्सरमधे फ़िरवावे. हा मसाला फ्रीझर मधे बरेच महीने टिकतो.

टीप - प्रमाण कपमधे लिहिलेय पण ते कमी करता येईल. इथे लिहिलेला १ कप म्हणजे १ भाग असे घेता येइल.

झटपट पेढा (Instant Pedha)

१ कप व्हिपींग क्रिम (हेव्ही व्हिपिंग क्रिम)
४ कप दुध पावडर
१ कप साखर
वेलचि, केशर, जायफळ - आवडीप्रमाणे
पिस्ता तुकडे - डेकोरेशन साठी

कृती - पिस्ता तुकडे वगळुन बाकीचे सर्व जिन्नस एका मायक्रोवेव मधे जाण्याजोग्या भांड्यात एकत्र करुन सहज जमतील तितक्या गुठळ्या कमी करण्याचा प्रयत्न करावा. आता ते भांडे ४ मिनीटासाठी मायक्रोवेव मधे ठेवावे. बहेर काढुन एक्जीव करुन परत ३ मिनीट ठेवावे असे २ मि., १ मि. करावे. आता चमच्याने थोडी consistency पहावी. पेढ्याच्या मानाने चिकट वाटत असेल तर अजुन एखादा मिनिट मायक्रोवेव करावे. मिश्रण साधरण कोमट झाल्यावर पेढे वळावेत. मोदकाचा लहान साचा असेल तर तुपाचे बोट लावुन त्याचे मोदक पण पाडता येतात.
पेढे झाल्यावर त्यावर एखादा पिस्त्याचा तुकडा शोभेसाठी लावावा.

टीप - मायक्रोवेवचे सेटींग वेगवेगळे असतात त्यामुळे वेळेचा अंदाज बघावा.
1/2 pint = 1 cup (approx) = little less than 1/4 liter (approx)

हिरव्या मिरचीचा खर्डा (Green Chili Thecha)

(Link to English Recipe)

हा एक अस्सल कोल्हापुर सातारा भागातला पदार्थ. करताना आणि खाताना स्वत:च्या जबाबदारीवर करावा/खावा :)

१५-२० हिरव्या मिरच्या देठ काढुन धुवुन
मुठभर कच्चे शेंगदाणे
मुठभर कोथींबीर
५-६ लसुण पाकळ्या (आवडीप्रमाणे कमी जास्त केल्या तरी चालतील)
मीठ
भाजण्यापुरते तेल

कृती - कढई मध्यम ते मोठ्या गॅसवर तापायला ठेवावी. एक चमचाभर तेल घालुन मिरच्या सतत हलवत भाजाव्यात. तसेच दाणे, कोथींबीर भाजुन घ्यावी. लसुण कच्चा किंवा भाजुन घ्यावा. सगळे पदार्थ खलबत्यात घालुन बारीक करावे. खर्डा साधारण बारीक होत आला की मीठ घालावे.

हा पदार्थ भाकरीबरोबर मस्त लागतो. खाताना खर्ड्यावर कच्चे तेल घालुन किंवा दही घालुन खावे.

टीप - खलबत्यात बारीक करणे कष्टाचे आहे आणि मिरची खुप तिखट असेल तर थोडे धोक्याचे पण आहे त्यामुळे मिक्सर मधे बारीक केले तरी चालेल. जर मिक्सरवर बारीक करताना हवे असेल तर पाणी न घालता कच्चे तेल घालावे.

Tuesday, March 20, 2007

भरली वांगी (Stuffed Eggplant)

Bharali Vangiकृष्णाकाठच्या वांग्याना एक वेगळीच चव असते. कराड, सातारा भागात जांभळी वांगी तर कोल्हापुर, सांगली भागात जांभळ्याबरोबर हिरवी/पांढरी वांगी आवडीने खाल्ली जातात.

४-५ लहान कमी बियांची वांगी
१/२ लाल कांदा (कांदा लालच वापरावा)
१ मुठभर भाजलेल्या दाण्याचे कुट,
साधारण तेवढ्याच भाजलेल्या तीळाचे कुट,
१-२ लहान चमचे कोरडे खोबरे भाजुन त्याचे कुट
कांदा-लसुण मसाला, मीठ, गुळ, गरम मसाला चवीप्रमाणे
२ लसुण पाकळ्या बारीक करुन
मुठभर कोथींबीर बारीक चिरुन
थोडी चिंच पाण्यात कोळून

कृती -
चिंच पाण्यात कोळुन घेउन ते पाणी बाजुला ठेवावे. कांदा एकदम बारीक कापुन घ्यावा. आता दाणे, तीळ, खोब~याचे कुट, मसाला, मीठ, गुळ, लसुण, कोथींबीर कांद्यावर घालावे. एक लहान चमचा तेल त्या मिश्रणात घालावे व मिश्रण नीट एकजीव करावे. आता वांग्यांचे देठ चांगले असतील तर अर्धे करावेत आणि हिरवा भाग थोडा कमी करावा. वांगी भरुन करण्यासाठी कापतो तशी ४ भाग करुन कापुन मीठाच्या पाण्यात घालावीत. एकेका वांग्यात मसाला ठासुन भरुन ती बाजुला ठेवावीत. राहीलेला मसाला पण बाजुला ठेवावा.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापायला ठेवुन मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यात भरलेली वांगी शेजारी शेजारी ठेवावीत (शक्यतो वांगी शेजारीच मावतील असे पातेले निवडावे). राहीलेला मसाला त्यावर पसरावा. हलक्या हाताने, मंद गॅसवर वांगी थोडावेळ हलक्या हाताने परतावी. आता त्यावर चिंचेचा कोळ आणि थोडे पाणि घालुन गॅस बारीक करुन शिजायला ठेवावे. साधारण ७-८ मिनीटानी वांगी हलक्या हाताने उलटावीत. लागणार असेल तर थोडे पाणी घालुन दुस~या बाजुने ५-६ मिनीटे शिजु द्यावीत.

ज्वारीच्या अगर तांदळाच्या गरम भाकरीबरोबर ही भाजी झक्कस लागते.

टीप - कांदा आवडत नसेल तर घातला नाहीतर चालतो पण मग कुटांचे प्रमाण वाढवावे लागेल. ही भाजी थोडी रसदार होते. एकदम कोरडी करायची असेल तर मात्र भरपुर तेलाची फोडणी घालुन मंद आचेवर झाकणात पाणी ठेवुन शिजवावी लागेल.

झटपट मटकी (Instant Mataki)

२ वाट्या मोड आलेली मटकी,
चविपुरते मीठ, लाल तिखट, चाट मसाला व चिंचेची चटणी
आवडत असल्यास थोडी चिरलेली कोथींबीर आणि बारीक शेव
तेल आणि फोडणीचे साहित्य

कृती - गॅसवर कढई तापत ठेवावी चांगली तापली पाहिजे. त्यात तेल घालुन पट्कन फोडणी घालावी. त्यात मटकी घालुन परतायला सुरुवात करावी. क्रमाने, मीठ, तिखट, चिंचेची चटणी, चाट मसाला घालावा. गॅस मध्यम ते मोठाच ठेवावा. आणि मटकी सतत हलवत रहावे. साधारण ५-७ मि. परतवुन एका पसरट भांड्यात काढावी. वरुन बरीक शेव आणि कोथींबीर घालुन वाढावी.

मक्याचा उपमा (Corn Upma)

US मधे छान कोवळा मका किंवा त्याचे दाणे काढुन मिळतात त्याचा उपमा एकदम सुंदर लगतो.

२ मक्याची कणसे खिसुन (किंवा २ वाट्या मक्याचे कोवळे दाणे फ़ूड प्रोसेसर मधे बारीक करुन)
हिरव्या मिरचीचे तुकडे
कढिपत्ता
२-३ चमचे दाण्याचे कुट
मीठ चवीप्रमाणे
लिंबु
फोडणीचे साहित्य, तेल

कृती -
मक्याची कणसे खिसुन घ्यावीत त्याला खुप रस सुटतो तसा सुटला तरी ठेवायचा, टाकुन द्यायचा नाही. आता तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर मक्याचा खिस घालुन मीठ, लिंबु आणि दाण्याचे कुट घालुन सारखे करायचे. झाकण ठेवुन मंद आचेवर शिजु द्यावे. मधुन मधुन हलवत रहावे नाहीतर खाली चिटकण्याचा संभव असतो. हा प्रकार खुप कोरडा होत नाही. थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवशी खायला एकदम मस्त लागतो.

टीप - Frozen Corn चा पण हा प्रकार चांगला लागतो.

Monday, March 19, 2007

टोफ़ु टिक्का मसाला (Tofu Tikka Masala)

१ पॅकेट बेक्ड टोफ़ु
१ चमचा चाट मसाला
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा लाल तिखट (चवीप्रमाणे कमी जास्ती घेतले तरी चालेल)
चवीप्रमाणे मीठ
१/४ चमचा हळद
१/२ कप दही


कृती -
टोफुचे १ इंच किंवा त्यापेक्षा थोडे लहान तुकडे करुन घ्या. सगळे मसाले दह्यात एकत्र करा. ते मसालेदार दही टोफ़ूच्या तुकड्यांना लावुन भांडे झाकुन कमीतकमी २ तास ठेवा. खायच्या आधी १/२ तास ओव्हन ३५० डीग्री फॅरेन्हईट्वर ५ मिनीटे प्रीहीट करावा. एका बेकींग डीशला तेलाचा हात पुसुन त्यावर टोफूचे तुकडे पसरावे (शक्यतो सुटे सुटे ठेवावेत) आता ती डीश बेक करायला ठेवावी. साधारण ३० मिनीटे बेक करावे. खायला देताना अवडत असेल तर थोडा चाट मसाला भुरभुरावा.

टीप - टोफु शक्यतोवर organic घ्यावा.

जवसाची चटणी (Flax Seed Chutney)

जवसाची चटणी मी अशी करते

१ वाटी जवस
१ /2 वाटी तीळ
१ / ४ वाटी शेंगदाणे (वगळले तरी चालतात)
लाल सुक्या मिरच्या, मीठ - चवीप्रमाणे
३ ते ४ लसुण पाकळ्या(ह्या देखील वगळू शकता आवडत नसेल तर)

जवस, तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजुन घ्या शक्यतो वेगवेगळे भाजा.
मिरच्या किंचीत तेलात भाजुन घ्या. त्या गरम गरम असतानाच सर्व मिक्सरमधुन चटणी करुन घ्या.

टीप - जवस खोकल्यासाठी चांगले असतात.
US मधे Whole Foods वगैरे दुकानात Flax Seeds या नावानी जवस मिळतात.

वरणफळ/ डाळ ढोकळी / चकुल्या (Varanphal / Daal Dhokali / Chakulya)

Here is link to English version of this recipe -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/04/varanphal-daal-dhokali-chakulya.html

ही आमटी जरा पातळ करायची. आमटी उकळेपर्यंत चपातीची साधी कणीक किंवा तिखट, मीठ, कोथिंबीर, हळद वगैरे घालुन कणीक भिजवायची. आमटीचा गॅस बारीक करुन कणकेची साधीच चपाती लाटायची (घडी वगैरे न घालता, जाड फुलक्यासारखी) आणि त्याचे सुरीने साधारण १ इंच मापाचे तुकडे कापायचे आणि तुकडे करु तसे ते आमटीत सोडायचे. वरील प्रमाणाच्या आमटीला साधारण ४ चपात्या लागतात.

Varanphal/Chakulya/Dal Dhokli

सगळे तुकडे घालुन झाले की एकदा छान उकळू द्यायचे आणि तुप घालुन त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा.

टीप - हा पदार्थ गरम गरम खाण्यातच मजा आहे. आणि त्यावर तुप एकदम must आहे!!!

आमटी (Amati)

Here is english version of the recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/turdaal-amati.html


Amti
ही साधीच तुरीची आमटी पण आज्जीच्या ५०-५५ वर्षांच्या अनुभवाची जोड असलेली...

१ वाटी तुरीची डाळ - कुकरमधे मऊ शिजवलेली
१ लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन.
१ छोटा खडा गुळ,
चवीप्रमाणे मीठ, कांदा-लसुण मसाला,
२ मध्यम लसूण पाकळ्या, थोडे ओले खोबरे , कोथिंबीर - बारीक कुटुन,
तेल आणि फोडणीचे सामान

कृती -
तेल तापवून नेहेमीप्रमाणे फोडणी करायची. फोडणी छान तडतडली म्हणजे त्यात चिंचेचा कोळ घालायचा. त्यात कांदा-लसुण मसाला, लसुण-खोब~याचा गोळा, गुळ घालुन १ वाटीभर पाणी घालायचे. आता हा कोळ साधारण मध्यम आचेवर झाकुन ५ मिनीटे छान उकळू द्यावा. त्यात आता मीठ घालुन परत २-३ मिनीटे उकळावे. गॅस बारीक करुन शिजवलेली डाळ घोटुन घालावी. गॅस मध्यम करुन झाकण न लावता आमटी ५-६ मिनीटे उकळू द्यावी.
गरम भाताबरोबर अप्रतीम लागते.

टीप - कांदा लसुण मसाला नसेल तर प्रमाणात गोडा मसाला आणि लाल तिखट वापरले तरी छान लागते.

Sunday, March 18, 2007

नारळाच्या घा~या (Coconut Ghari)

मम्मीकडुन हा पदार्थ शिकले साधाराण १० वर्षांपूर्वी. जरा वेगळा प्रकार.

२ वाट्या ओले खोबरे खवणलेले,
२ वाट्या बारीक साखर (भारतात ती पिठीसाखर वापरते पण इथे नेहेमीची साखर चालते)
३-४ वेलचीची पावडर
तांदुळाचे पीठ - लागेल तसे
तळण्यासाठी तेल

कृती-
साखर, खोबरे एकत्र करायचे आणि ते हातने व्यवस्थीत १० -१२ मिनीटे फ़ेसायचे.मिश्रण पांढरेशुभ्र दिसते फ़ेसता फ़ेसता. त्यात आता वेलची घालायची. आणि लागेल तसे तांदळाचे पीठ घालत थालीपीठाच्या पिठाइतपत consistency चे पीठ बनवायचे. आता तळायचे तेल कढईत तापत ठेवायचे. तेल नीट तापले की प्लास्टीकपेपरवर थोडे तेल किंवा पाणी लावुन पुरीइतक्या आकाराची एक घारी थापायची. घा~या साधारण जाडसर असतात त्यामुळे पुरी करताना गोळा घेतो त्याच्या दुप्पट गोळा घेऊन त्याची पुरीइतकी मोठी घारी करायची. मंद आचेवर सोनेरी रंगावर तळायची.

टीप - तांदुळाचे पीठ जास्त झाले तर घारी पिठूळ लागते. आणि पिठ कमी झाले तर साखरेमुळे कडक होते. प्रमाण जमणे कठीण नाही.

॥ श्री अन्नपूर्णा प्रसन्न ॥

मला स्वयंपाकाची आवड साधरण ११-१२ वी मधे असताना लागली. त्याआधी घरी स्वयंपाकाला व्यवस्थीत मदत करत होतेच पण आवड अशी नव्हती. सुट्टीमधे कोल्हापुरला रहायला गेले तेव्हा सरुताई स्वयंपाक आवडीने करयची आणि मी अगदी तिच्याचसारखे वागायचा प्रयत्न करायचे आणि स्वयंपाकाची आवड हा त्यातलाच भाग होता. तिच्याबरोबर मी पहिला पदार्थ करायला शिकले तो म्हणजे पावभाजी. कर्मधर्मसंयोगाने ती आवड अजुन टिकुन आहे आणि काही प्रमाणात वाढीसही लागलेली आहे.

आज गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन blog चालु करतेय, पूर्णपणे स्वयंपाकाला वाहीलेला.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...