झटपट पेढा (Instant Pedha)

१ कप व्हिपींग क्रिम (हेव्ही व्हिपिंग क्रिम)
४ कप दुध पावडर
१ कप साखर
वेलचि, केशर, जायफळ - आवडीप्रमाणे
पिस्ता तुकडे - डेकोरेशन साठी

कृती - पिस्ता तुकडे वगळुन बाकीचे सर्व जिन्नस एका मायक्रोवेव मधे जाण्याजोग्या भांड्यात एकत्र करुन सहज जमतील तितक्या गुठळ्या कमी करण्याचा प्रयत्न करावा. आता ते भांडे ४ मिनीटासाठी मायक्रोवेव मधे ठेवावे. बहेर काढुन एक्जीव करुन परत ३ मिनीट ठेवावे असे २ मि., १ मि. करावे. आता चमच्याने थोडी consistency पहावी. पेढ्याच्या मानाने चिकट वाटत असेल तर अजुन एखादा मिनिट मायक्रोवेव करावे. मिश्रण साधरण कोमट झाल्यावर पेढे वळावेत. मोदकाचा लहान साचा असेल तर तुपाचे बोट लावुन त्याचे मोदक पण पाडता येतात.
पेढे झाल्यावर त्यावर एखादा पिस्त्याचा तुकडा शोभेसाठी लावावा.

टीप - मायक्रोवेवचे सेटींग वेगवेगळे असतात त्यामुळे वेळेचा अंदाज बघावा.
1/2 pint = 1 cup (approx) = little less than 1/4 liter (approx)

Comments

  1. पाकक्रिया चांगली आहे, झटपट आहे, पण कॅलरीजही भरपूर आहेत. जरा जपून...

    ReplyDelete
  2. संगीता, अगदी अगदी !!! मी करुन ४-५ वर्षे तरी होऊन गेली.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.