झटपट मटकी (Instant Mataki)

२ वाट्या मोड आलेली मटकी,
चविपुरते मीठ, लाल तिखट, चाट मसाला व चिंचेची चटणी
आवडत असल्यास थोडी चिरलेली कोथींबीर आणि बारीक शेव
तेल आणि फोडणीचे साहित्य

कृती - गॅसवर कढई तापत ठेवावी चांगली तापली पाहिजे. त्यात तेल घालुन पट्कन फोडणी घालावी. त्यात मटकी घालुन परतायला सुरुवात करावी. क्रमाने, मीठ, तिखट, चिंचेची चटणी, चाट मसाला घालावा. गॅस मध्यम ते मोठाच ठेवावा. आणि मटकी सतत हलवत रहावे. साधारण ५-७ मि. परतवुन एका पसरट भांड्यात काढावी. वरुन बरीक शेव आणि कोथींबीर घालुन वाढावी.

Comments

  1. अगं तुझी ही अनुदिनी माहितच नव्हती. बरं झालं आज नजरेला पडली ती. वाचली पाहिजे सावकाश.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.