आंबा आईसक्रिम !!??!! (Mango Ice Cream)

१ वॅनीला आईसक्रिम पॅक
१ मोठा आंबा
१/४ वाटी साखर
१-२ काड्या केशर
२ वेलच्यांची पूड

कृती -
आंब्याची साल काढुन साधारण इंचभर मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात आंब्याचे तुकडे, साखर, केशर, वेलची पुड एकत्र करुन मध्यम गॅसवर ठेवावे. सतत धवळत रहवे. आंबा साधरण शिजत आला की गॅस बंद करुन मिश्रण थंड होउ द्यवे.

वॅनिला आईसक्रिम थोडे thaw करुन घ्यवे आणि वरील थंड केलेले मिश्रण त्यात मिसळावे. साधरण Marble Effect येईल असे मिसळावे. एकजीव करण्याची जरुरी नाही.
हे मिसळलेले आईसक्रीम परत container मधे भरुन फ्रीझर मधे ठेवावे. सेट झाल्या खायला द्यावे.

आंब्याचे मिश्रण जास्त झाल्यास serve करताना आईसक्रीम वर थोडे घलुन serve करवे.

टीप- ह पदार्थ strawberries, raspberries, peaches, mixed berries अश्य कोणत्यही फ़ळाचे करु शकता. पण अशि exotic फ़ळे वापरताना वेलची, केशर नाही टाकले तरी चलते.

Comments

  1. मस्त डेझर्ट! :) जास्त कष्ट नाहीत, आणि बिघडण्याची शक्यता शून्य! प्काल पाहुण्यांसाठी केलं होतं तेव्हा आंबा आणि आईस्क्रीम मिक्स करताना वेलची, केशर घालायला विसरले. मग सर्व्ह करताना वरून वेलचीची पूड भुरभुरली आणि दूधात केशराच्या काड्या घालून प्रत्येक बोलमध्ये चमचा-चमचा दूध वरून घातलं. चांगलं लागलं. शिवाय केशराच्या काड्या वरतीच असल्याने छान दिसत देखिल होतं! :) दाताखाली आंब्याच्या छोट्या छोट्या फॊडी आलेल्या आवडल्या सगळ्यांना.

    ReplyDelete
  2. छान आहे कृति, सोपी आणि सुटसुटीत!
    यांत मी थोडासा बदल करून इथे ज्या आंबापोळ्या मिळतात ना, त्यांचे पातळ काप करुन घातले. मधूनच असे दाताखाली येणारे काप छान लागतात. बघ कधी ट्राय करून :)

    ReplyDelete
  3. ICe cream chan zal hot... sagalyana avadal

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.