पंचखाद्य (Panchakhadya)


गणपती जवळ आले की घरोघरी प्रसादाची, पुजेची तयारी अगदी जोरदार चालु होते. हा पंचखाद्याचा प्रकार आमच्या घरी म्हणे परंपरागत चालु आहे. त्यात परिस्थिती आणि काळानुसार नक्कीच बदल झाले असतील. पंचखाद्य म्हणजे कमीत कमी पाच पदार्थ असावेत आणि मग आवडीनुसार त्यात काही जास्तीचे जिन्नस घातले तरी हरकत नाही.



१ वाटी किसलेले खोबरे
४-५ चमचे साखर
४-५ खारका
५-६ बदाम
४-५ काजु
२ टी.स्पू. खसखस
१-२ वेलचीचे दाणे
चिमुटभर जायफळाची पावडर

कृती - खिसलेले खोबरे कोरडे भाजुन घ्यावे. खसखस भाजुन ओबडधोबड पूड करुन घ्यावी. साखर, वेलची, जायफ़ळ एकत्र करुन पूड करावी. खारकेच्या बिया काढुन टाकुन बारीक तुकडे करुन जेवढी बारीक करता येईल तितकी बारीक पूड करुन घ्यावी. काजु,बदाम बारीक चिरावेत अथवा ओबड्धोबड पूड करुन घ्यावी. आता ही सगळी सामुग्री एकत्र करावि. झाले पंचखाद्य तयार.

Comments

  1. panchakhadya mhanje kamit kami paach padarth nave.bagh kase te ...
    pancha+kha+aadya=panchakhadya.
    mhanje jyanchye aadya akshar kha aahe ase pach padartha kharik,khaskhas,khobre,khava,khadi sakhar..ok?..Sushama

    ReplyDelete
  2. वा!! मस्तच आहे! पण आमचे गणपती गावी परतले आणि "पंचखाद्य" सापडलेय! आणि त्यावर सुषमा ताईंनी दिलेला अभिप्राय तर अजूनच झकास वाटला.

    आईला लगेच बाजुला बसवून मी ही रेसिपी सांगितली आणि आई खुश! सुषमा ताईंच्या अभिप्रायावर तर टाळ्या पडल्या.. :)

    आईने एक सुचवलयं. ती म्हणते, तुम्ही वापरलेल्या सामुग्रीपासुन लाडू सुध्दा बनवता येतील. फक्त रवा, तूप, बेदाणे घालावे लागतील. :)

    बाकी तुमचा ब्लॉग रॉकींगच आहे! मी नेहमीच बघतो आणि आईलाही दाखवतो. :)

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.