Posts

Showing posts from March, 2008

दोडक्याची चटणी (Ridge Gourd Chutney)

Image
English Version of this recipe - https://sites.google.com/site/vadanikavalgheta/vadanikavalgheta/ridge-gourd-chutney


घरी लावलेल्या दोडक्याला कधीतरी एखादाच दोडका असेल तर भाजी सगळ्यांना पुरायची नाही. आणि दोडका तसाच वेलावर ठेवला तर एखाद्या दिवसात जून होऊन जायचा. आशावेळी मम्मी दोडक्याची ही चटणी करत असे.

१ मध्यम आकाराचा दोडका
१-२ लसुण पाकळ्या
१-२ टेबल्स्पून खिसलेले कोरडे खोबरे
मुठभर शेंगदाणे
३-४ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
एक चमचा तेल

कॄती - दोडका स्वच्छ धुवून १/२ सेंटीमीटर जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात. शेंगदाणे आणि खोबरे वेगवेगळे कोरडे भाजुन घ्यावेत. कढईत तेल तापवून त्यात मिरच्या आणि लसुण घालावा. किंचीत परतून त्यावर दोडक्याच्या फोडी घालाव्यात. नीट खरपूस भाजुन घ्यावे. दोडक्याच्या फोडी थोड्या गुलबट दिसु लागतील. त्यात खोबरे, दाणे, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सरमधुन थोडे जाडसर वाटुन घ्यावे.

टीप - १. एखादा दोडक थोडा जून निघतो अशावेळी त्याची साल थोडी तासुन टाकून उरलेल्या दोडक्याची चटणी करता येते.
आवडत असेल तर दही, भाकरी आणि ही चटणी खाऊन पहाण्यास हरकत नाही.

लाल टोमॅटोची भाजी (Red Tomato Curry)

Image
सकाळची भाजी कमी पडणार असेल किंवा पप्पांपुरती असेल तर मग मम्मी आमच्यासाठी ही भाजी करायची. पप्पांना टोमॅटोच्या भाजीत अज्जिबात इंटरेस्ट नसायचा त्यामुळे तेही खूश आणि मला आणि सुबोधला खुप आवडायची म्हणुन आम्ही खूश! पण एक मात्र खरे, ही भाजी मुद्दाम ठरवून केली की अजिबात ती चव येत नाही. पट्कन काहीतरी हवे म्हणुन २ टोमॅटो चिरावेत एखादा पाकळी लसुण ठेचावा आणि करावी तिच चव खरी!
Tomato Bhaji
२ मोठे पिकलेले टोमॅटो
१-२ लसूण पाकळ्या चिरुन
१/२ कांदा (वगळला तरी हरकत नाही)
१ चमचा दाण्याचे कुट
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
१/२ टीस्पून गोडा मसाला
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, साखर

कृती - कांदा, टोमॅटो चिरुन घ्यावा. लसुण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची जिरे, मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी घालावी. त्यातच ठेचलेला लसुण घालुन थोडे परतावे. कांदा घालणार असाल तर तो परतुन घ्यावा. वरुन चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, मीठ, साखर आणि गोडा मसाला घालावा. नीट परतावे. टोमॅटो शिजायला खुप वेळ लागत नाही. साधारण ३-४ मिनीटे परतून दाण्याचे कूट घालावे. मिसळून गॅस बंद करावा.

टीप - १. टोमॅटो नीट पिकलेले असतील तर ही भाजी एकदम चविष्ट लागते.
२. मस…

दह्यातला साबुदाणा (Yogurt Sabudana)

Image
Tapioca Yogurt

आमच्याकडे घरी कोणाचे रोजचे उपवास कधीच नव्हते. श्रावण सोमवार, अंगारकी, आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र हे आमच्यकडे उपवासाचे दिवस. त्यामुळे साबुदाणा खिचडी फार कमी वेळा केली जायची. पण मला खिचडीचे का कोण जाणे फार कौतुक नव्हतेच. त्यापेक्षा मला साबुदाण्याची खीर, गोडाची खिचडी, दह्यातला साबुदाणा हे प्रकार जास्त आवडायचे. त्यातले एक एक प्रकार लिहुन ठेवेन म्हणतेय. आजच्या अंगारकी निमित्त दह्यातला साबुदाणा!

१ वाटी साबुदाणा
२ वाट्या अंबट ताक
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
मीठ, साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी १ टीस्पून तेल/तूप, जिरे आणि २ मिरच्या उभ्या चिरुन
थोडीशी कोथिंबीर

कृती - साबुदाणा मंद आचेवर ५-७ मिनीटे भाजुन घ्यावा. भाजताना एकेक दाणा नीट फुलायला हवा पण रंग पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे. एका बाऊलमध्ये अंबट ताक, मीठ, साखर एकत्र करुन त्यात साबुदाणा गरम असतानाच घालावा. बाऊल झाकुन साधारण २-३ तास ठेवुन द्यावे. साबुदाणा नीट मऊ झाला पाहीजे, आत कणी रहाता कामा नये. २-३ तासानी मिश्रण नीट ढवळुन घ्यावे. एखादा साबुदाणा बोटाने चेपुन नीट भिजला आहे ना ते पहावे. तेलाची/तुपाची जिरे मिरची घालुन फोडणि करावी. दाण्यचे कूट, …

मेथी-मटर-मलाई (Methi Matar Malai)

Image
Methi MaTar Malai
Methi-Matar-Malaai

मलई, दूध, दही वगैरे दुग्धजन्य पदार्थ शक्यतो वापरायचे नाहीत असे मी साधारण ७-८ वर्षांपूर्वी एका सेमिनारला गेले असताना, दुधासाठी, मांसासाठी प्राण्यांचे किती हाल करतात ते पाहिल्यावर ठरवले. त्यानंतर माझ्या स्वयंपाकाच्या पद्धतीमधेदेखील खूप बदल झाले/केले. माझा स्वतःचा 'दूध खूप पौष्टीक असते' वगैरे भाकडकथांवरचा विश्वास उडाला. असेही पनीर वगैरे पंजाबी पदार्थ माझ्या फार आवडीचे नव्हते आणि अजुनही नाहीत. पण मेथी-मटर मलाई मला अतिशय आवडणारा. साधारण ५ वर्षापूर्वी मी ही भाजी एका पॉटलकसाठी केली आणि कोणाचाही विश्वास बसला नाही की त्यात मलई घातलेली नाहीये. त्यानंतर थोडा बदल करुन मी ही भाजी जास्त चविष्ट आणि आरोग्याला चांगली अशी बनवायला सुरुवात केली. संगिताने व्हीगन रेसिपींविषयी विचारले तेव्हाच ठरवले की ही भाजी करुन, फोटो काढुन मगच लिहायची.

१ मोठी जुडी मेथी
१ कप मटार
५-६ काजु
४-५ बदाम
१ मध्यम कांदा
१ मोठा टोमॅटो
१ टीस्पून गरम मसाला
मीठ, लाल मिरची पावडर चवीप्रमाणे
किंचीत साखर
१/२ टीस्पून जिरे, धणे पावडर (प्रत्येकी
फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, हिंग, हळद.

कृती - काजु…

इडली-चटणी-सांबार (Idli chutney Sambar)

Image
Idli Chutney



इडली -
इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या लागतात. पण इथल्या थंडीत पिठ अंबणे थोडे कठीण जात असे म्हणुन मग एकदा इडली रवा आणुन करुन पाहीले. ते पण नीट झाले. त्याच वेळेला थंडीमधे पीठ कसे अंबवावे याची एक 'ट्रिक' पण कळली ती पण इथे देतेय.

३ वाट्या इडली रवा
१ वाटी उडीद डाळ

कृती - डाळ आणि रवा धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात रवा घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजीच्या पिठासरखे असावे. पिठ एका मोठ्या पातेल्यात काडुन त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते. इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे.
वर दिलेल्या प्रमाणाअत साधारण ४०-४५ इडल्या होतात.

टीप - पीठ ओव्हनमधे ठेवुन ओव्हनचा दिवा चालू केला तर ६-७ तासात पीठ अंबते.

चटणी -
१ जुडी कोथिंबीर निवडुन
२-३ हिरव्या मिरच्या
१ मुठ शेंगदाणे
१/४ वाटी…

कच्च्या फणसाची भाजी (Raw Jackfruit bhaaji)

Image
कोकणात कच्च्या फणसाची भाजी खुप आवडीने खाल्ली जाते. मामा कोयनेहुन येताना कधितरी छोटे फणस घेउन येत असे. ते फणस साफ करणे म्हणजे जिकिरीचे काम असे. पण भाजी फार अवडत असल्याने ते केले जायचे. विळीला तेल लावुन वरचे टणक साल काढुन टाकायची. मग आतल्या गराचे ६-७ तुकडे करुन कुकर मधे २-३ शिट्ट्या करुन शिजवुन घ्यायचे. मग त्या शिजवलेल्या तुकड्यातला मधला दांडा काढुन टाकायचा. तो तसा लगेच निघतो. राहिलेले तुकडे बोटाने कुस्करुन त्याची भाजी करावी.

कच्च्या फणसाची भाजी


ही झाली 'फ्रॉम स्क्रॅच' रेसीपी! पण माझ्या सारख्या 'डमीज' साठी सोपी पद्धत आहे ती खालील प्रमाणे -

१ कॅन कोवळा फणस
१ मध्यम कांदा मोठा-मोठा चिरुन
१/४ कप हरबरा डाळ
१-२ लसुण पाकळ्या
१-२ सुक्या मिरच्या
१ टेबल्स्पून खोबरे (ओले/सुके)
१ टेबल्स्पून तेल
चवीपुरते मीठ
१ टीस्पून काळा मसाला
चवीप्रमाणे लाल मिरची पावडर
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग

कृती - डाळ साधारण १-२ तास भिजत घालावी. कॅन फोडुन त्यातला फणस काढुन पाणी फेकुन द्यावे. फणसाचे तुकडे पाण्याने जरा धुवुन घ्यावेत. पाणी न घालता कुकरला २ शिट्ट्या करुन घ्याव्यात. गार झाल्यावर फणस कुस्करुन घ्यावा. का…

अननसाची भाजी (Pineapple Bhaaji)

भुवया उंचावल्या ना? गोडसर चवीच्या भाज्या आवडत असतील तर हा प्रकार करुन पहा.

२ कप अननस (मध्यम आकाराच्या फोडी करुन)
२-३ लाल सुक्या मिरच्या
३-४ टेबल्स्पून ओले खोबरे
चवीप्रमाणे मीठ व किंचीत साखर
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे आणि मोहरी

कृती - पातेल्यात तेल गरम करुन जिरे मोहरीची फोडणी करुन घ्यावी. त्यावर लाल मिरच्या घालुन किन्चीत गरम कराव्यात त्यावर अननस घालावा. ओले खोबरे थोडे भरड वाटुन त्यावर घालावे. मीठ व साखर घालुन एकदा हलवावे आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. हवी असेल तर वरून कोथिंबीर घालायला हरकत नाही.

टीप - मी शक्यतो ताज्या अननसाच्या फोडी वापरते. पण कॅनमधला वापरायचा असेल तर Packed in its own juice अशा प्रकारचा कॅन आणुन रस काढुन फोडी वापराव्यात.

रेड चार्डची भाजी (Red Chard (Maharashtrian style))

Image
Red Chard

माठ, तांदळी, राजगिरा या भाज्या अमेरीकेमध्ये आल्यावर खायला मिळेनाश्या झाल्या आणि मग त्यांना पर्याय शोधणे आले. तेव्हा इथे रेड चार्ड नावाची भाजी मिळते हे समजले आणि एकदा तो *मोदळा घरी आणुन त्यावर प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग यशस्वी झाला तो हा -

Ready Bhaji

१ जुडी रेड चार्ड
३-४ लसुण पाकळ्या
२-३ हिरव्या मिरच्या (चवी प्रमाणे कमी जास्त किंवा पूर्णपणे वगळल्यास हरकत नाही)
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी आणि हळद

कृती - चार्ड आणुन स्वच्छ धुवुन घ्यावा. या भाजीला प्रचंड रेती चिकटलेली असल्याने नीट धुवुन घ्यावी लागते. दांडे जून असतील तर टाकुन द्यावेत कोवळे असतील तर बाजूला काढुन ठेवावेत. आता भाजी मध्यम कापून घ्यावी. ही पाने खूप लांब आणि रुंद असतात त्यामुळे उभी आडवी दोन्ही बाजुने कापावीत. कोवळे देठ बारीक कापुन घ्यावेत. लसूण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेल तापवून नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात ठेचलेला लसुण घालावा. मिरची घालणार असाल तर उभी चिरुन घालावी. त्यावर चिरलेल्या भाजीपैकी अर्धी भाजी घालुन त्यावर थोडे मीठ घालावे. त्यवर उरलेली भाजी घालावी. गॅस बारीक करुन झाकण ठेवावे. २-३ मिनीटामध्ये भाजी वा…

गोडाचे लिंबू लोणचे (Sweet Lemon/Lime Pickle)

Image
Sweet Lemon Pickle






चटण्या-लोणची प्रकरणे माझ्या फारशी आवडीची नाहीत. अलीकडे मैत्रीणीला हवे होते म्हणुन केले थोडे आणि विचार केला लिहुन ठेवावी पाककृती.

७ रसरशीत पिवळी लिंबे
३/४ कप साखर
१/२ चमचा लाल तिखट
३ टेबल्स्पून मीठ

कृती - सर्व लिंबे धुवुन स्वच्छ कोरडी करुन घ्यावीत. ५ लिंबांच्या, एका लिंबाच्या साधारण ८-१० अशा प्रमाणात फोडी कराव्यात. २ लिंबाचा रस काढुन घ्यावा. एका जाडबुडाच्या स्टीलच्या पातेल्यात लिंबाच्या फोडी, साखर, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस असे एकत्र करुन नीट हलवून साधारण अर्धा एक तास तसेच ठेवून द्यावे. तासाभरानंतर पातेले गॅसवर ठेवुन मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. साखर विरघळून पाकाला एक उकळी आली की पातेले उचलून बाजुला ठेवावे. झाकण झाकू नये. पूर्णपणे थंड झाल्यावर बाटलीत भरुन ठेवावे. रस लगेच खाता येतो. पण फोडी मुरायला साधारण ५-६ दिवस लागतात.

टीप -
१. अमेरीकेमध्ये मेयर लेमन नावाची खुप रसदार आणि केशरट लिंबू मिळतात त्याचे लोणाचे अप्रतीम होते.
२. हिरवे लिंबाचे लोणचे पण चांगले लागते पण मुरायला थोडा वेळ लागतो.