Posts

Showing posts from June, 2008

चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie)

Image
साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची अप्रतीम चव आणि नाविन्य यामुळे कितीहीवेळा गेले तरी काहीतरी नवीन खाल्ल्याचा 'साक्षात्कार' होतो. त्यातलीच एक I Am Lusciously Awake नावाची स्मूदी, माझी अतिशय आवडती. त्यासाठी ४० मैल गाडी चालवायला नको म्हणून करायला शिकलेली :)

Chocolate Smoothie


(प्रमाण एका माणसासाठी आहे)

१ टेबल्स्पून कोको पावडर
१ टीस्पून इन्स्टंट कॉफी
१/२ केळ
२-३ काजु अगर बदाम
२-३ बिया काढलेले खजूर
१/२ कप पाणी
गरजेप्रमाणे बर्फाचे खडे

कृती - खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.

टीप - १. कोको पावडर शक्यतो दूध, साखर न मिसळलेली अशीच वापरावी.
२. साधी कॉफी वापरायची असेल तर पाण्यात कॉफी उकळून, गाळून, थंड करून वापरावी.
३. माझ्याकडे जेव्हा कच्च्या (न भाजलेल्या) चॉकलेटच्या बिया असत तेव्हा त्याच वापरत …

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi)

Image
Here is English version of this recipe -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/03/sabudana-khichadi.html

साबुदाणा खिचडी ब-याच लोकाना प्रिय असते. मला मात्र त्याचे खूप कौतुक नव्हते. एकतर घरात रोजचा उपास कधी कोणाचा नसे आणि सगळ्यांच्या वेळा सांभाळत मम्मीला असले खास प्रकार करायला सुट्टीच्या दिवसाशिवाय कधी वेळ पण नसे. श्रावणातले सोमवार, महाशिवरात्र याच दिवशी घरी खिचडी असे. हे सगळे संपले हॉस्टेलला गेल्यावर. रात्री मेसमधे भाकरी आणि कसलातरी पाला पाण्यासारखी पातळ आमटी असले दिव्य जेवण असे. मला भाकरीचे वावडे नव्हते पण ती इतकी जाड असे की खायचा कंटाळा यायचा. मग थोडे दिवस आम्ही काहीतरी करुन नेले पण तेही जमण्यासारखे नव्हते. मग त्यावर काढलेला उपाय एकदम 'सॉलेट' होता. आम्ही ६-७ जणी एकत्र जेवत असु. एकेकीने एकेक दिवस वाटुन घेउन रात्री उपास मांडले होते. मग जिचा उपास असेल तिला भात/भाकरी खाऊ घालण्याची जबाबदारी उरलेल्या मुलींवर आणि आलेली खिचडी सगळ्याना वाटणे ही तिची जबाबदारी! असे एक वर्ष काढले.

पुढे उसगावात आल्यावर मग साबुदाण्याबद्दल बरेच काही ऐकले होते, अनुभवही बरेच घेतले. सबुदाणा चांगला आहे की …

कॅरामल फ्लान (Caramel Flan)

Image
अलीकडे एका मैत्रीणीने मला अवडतो म्हणुन Caramel Flan केला होता. पण जिलेटीन प्राणीजन्य पदार्थ असल्याने मी खात नाही तसेच अंडी पण खात नाही म्हणल्यावर तिला वाईट वाटले. पण त्या दिवसापासुन मला आपण वेगन फ्लान करुन पहायचाच असे वाटायला लागले. त्याच प्रयत्नाना आलेले हे फळ -

Caramel Flan

२ कप दूध (सोया, Almond यापैकी कोणतेही)
१ टीस्पून व्हॅनीला एक्स्ट्रॅक्ट
४ टेबल्स्पून साखर
१ टेबल्स्पून अगार अगार फ्लेक्स

कॅरामल साठी -
३-४ टेबल्स्पून साखर
१ टेवल्स्पून पाणी

कृती - अगार अगार पावडर एका वाटीत घालून त्यावर ते भिजेल इतके पाणी घालुन आजुला ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात दूध, साखर एकत्र करून उकळण्यासाठी ठेवावे. एक उकळी आली की त्यात व्हॅनीला आणि अगार अगार घालून गॅस बारीक करावा.

दुस-या गॅसवर एका जाड बुडाचा लहान पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून ठेवावे. ते एक्सारखे ढवळत रहावे. थोड्यावेळात साखरेतले पाणी संपूर्ण आटून परत खडे बनतील. ते तसेच गरम करत रहावे. काही मिनीटातच ते खडे विरघळून पाक होईल. हेच ते कॅरामल. यात आता थोडे पाणी घालून थोडे पातळ राहु द्यावे. ते कॅरामल तुम्हाला फ्लान ज्या भा.ंड्यात बनवायचा आहे त्यात खाली …

पन्हे (Panhe)

Image
Panhe


सध्या आमच्याइथे खूप गरम होतेय. अचानक तापमान वाढलेय. त्यामुळे शनीवारी घरी पन्हे केले होते त्याचे काढलेले फोटो.

ही रेसिपी इथे मिळेल - झटपट पन्हे

Peanut Chutney

Image
(Link to Marathi Recipe)

The box in this post is made by me after few tries. It is called dartlington box. It is a good technique to learn. I had fun making it. And the glaze used called Woo-Blue which brakes to give brown color on rough surface. I use my pot with lid to serve my favorite peanut chutney.

1 cup Roasted Peanuts
2-3 Cloves of Garlic (or per taste)
1 tsp Cumin seeds
1 tsp Sugar (optional)
Salt per taste

Preparation - Add half of the peanuts in big enough mixer bowl. Add salt, sugar, chili powder, cumin seeds and garlic cloves. Add remaining peanuts over. 
Now cover and start pulsing the grinder slowly to make chutney. Texture should be very coarse and oily. To get that texture pulsing slowly is very necessary. 
This chutney stays good for weeks or even months. 

Tips -Solapur's peanut chutney is very tasty and well known in Maharashtra. It is usually made in cast iron mortar pestle. Try to use Byadagi to get bright red colored chutney. This chutney + fresh yogurt and onion wit…

शेंगदाण्याची चटणी (Shengadaana Chutney)

Image
(Link to English Recipe)

Chutney pot with lid
टेबलवर चटण्या घालुन ठेवण्यासाठी एखादे छानसे भांडे असावे असे बरेच दिवसापासुन वाटत होते. मधे २-३ बनवली पण होती. पण काही ना काही कारणांमुळे ती कोणाला तरी द्यावी लागली अथवा नीट fire झाली नाहीत. हे भांडे मात्र बनवताना मनासारखे जमले, रंग पण मनासारखा झाला. आणि टेबलवर ठेवल्यावर अगदी मनापासुन आवडले. आता यात एखादी चटणी करुन ठेवावी असे वाटले. नवीन काहीतरी करण्यापेक्षा नेहेमीची शेंगदाणा चटणी बरेच दिवसात केली नाहीये ही बाब लक्षात आणून दिली गेली म्हणल्यावर तीच केली.

Shengadaana Chutney
१ कप भाजलेले शेंगदाणे
२-३ पाकळ्या लसूण (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा)
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून साखर
१-२ टीस्पून मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करावे)
१-२ टीस्पून लाल तिखट

कृती - मिक्सरच्या भांड्यात निम्मे शेंगदाणे घालावेत त्यावर लसूण, तिखट, जिरे, मीठ, साखर घालावे. वरून उरलेले दाणे घालावेत. हळुहळू पल्स करत करत चटणी बारीक करावी. भांड्यात काढून तिखट मीठ व्यवस्थीत आहे क ते पहावे. कमी जास्त हवे असल्यास मिसळून डब्यात भरावे.

टीप - १. सोलापूरकडची दाण्याची चटणी अतीशय प्रसिद्ध आहे. ती …

टोमॅटो सार/सूप (Tomato Soup)

Image
लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ क्रीम वगैरे घालताना पहिले आणि खूप विशेष वाटले होते कारण माझ्यासाठ सूप हा खूप साधा प्रकार होता/आहे. रेस्टॉरंटमधे मिळणारे Cream of Tomato सूप पण मला फार आवडत नाही ते याच कारणाने.

Tomato Soup

२ मोठे पिकलेले टोमॅटो
गरजेप्रमाणे पाणी
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून लाल मिरची पावडर
फोडणीसाठी १ टिस्पून तेल किंवा तूप आणि जिरे

कृती - टोमॅटो धुवुन घ्यावेत. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात टोमॅटो बुडतील एवढे पाणी घालुन ते उकळायला ठेवावे. पाणि उकळले की त्यात टोमॅटो घालुन बरुन झाकण ठेवुन ५ मिनिटे उकळून गॅस बंद करावा. पाणी थंड झाल्यावर फक्त टोमॅटो मिक्सरमधुन बारिक करुन घ्यावे. साले, बिया आवडत नसतील तर केलेली प्युरी गाळण्याने गाळुन घ्यावी. सूप/सार जितके पातळ हवे असेल त्याप्रमाणे टोमॅटो शिजवलेले पाणी घालावे. एका पातेल्यात तेलाची अगर तुपाची फक्त जिरे घालुन फ़ोडणी करावी त्यावर प्युरी केलेले टोमॅटो घालावेत. अवडीप्रमाणे मीठ, आणि तिखट घालावे. आवडत असेल तर थोडी साखर घालण्यास हरकत नाही.


टीप - १. ट…

कढीगोळे (Kadhigole)

Image
गेल्या महिन्यात कधीतरी एका अश्विनीकडे गेले असताना 'काल आईने कढीगोळे केले होते' असे ती सहज बोलुन गेली. तेव्हा मला अरुंधतीच्या आईने एकदा कढीगोळे खाऊ घातले होते ते आठवले. मम्मी हा प्रकार फारसा करत नसे त्यामुळे खुपच विस्मरणात गेला होता. परवा अचानक भाताबरोबर हेच करु असा विचार आला पण हरभरा डाळ भिजवलेली नव्हती. पण मोड आणण्यासाठी मूग भिजवले होते. काकुना फोन करुन विचारले, होईल का नीट तर काकु म्हणाल्या करुन बघ १-२! शेवटी करुन पाहिलेच! तीच ही रेसिपी -

Kadhigole
गोळ्यांसाठी -
१ कप भिजवलेले मूग
२ हिरच्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
१ बारीक तुकडा आले
१-२ पाकळ्या लसूण
१ टेबलस्पून जिरे
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून बेसन अथवा तांदळाचे पीठ

कृती - बेसनाव्यतीरिक्त सर्व सामान मिक्सरवर बारीक वाटुन घ्यावे. अगदी गंधाइतके बारीक नसेल तरी हरकत नाही. एक बाऊलमधे घेउन त्यात बेसन घालुन नीट मिसळावे. त्याचे एक इंच व्यासाचे गोळ करुन बाजुला ठेवावे.

कढीसाठी -
१ कप दही
२ ते अडीच कप पाणी
१ पाकळी लसूण
१ बारीक तुकडा आले
२-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून साखर
२-३ टेबल्स्पून बे…

शेवयाचा उपमा (Vermicelli Upama)

Image
शनिवारी-रविवारी नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न नेहेमी पडतो. कारण प्रत्येकवेळी पोहे, उपीट करायचा कंटाळा येतो. नेहेमीच इडली डोस्याचे पीठ तयार असतेच असे नाही. अशावेळी शेवया घरात असतील तर त्याचा उपमा पण मस्त आगतो. इथे अगदी साधी कृती देतेय पण त्यात बदल करणे अगदी सहजी शक्य आहे.

Vermicelli Upama

१ कप शेवया
२ कप गरम पाणी
१/२ कप किंवा थोडे कमी मटार दाणे
१-२ हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ, साखर
१ टेबलस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग आणि १/२ टीस्पून उडीद डाळ

कृती - शेवया तेल न घालता कढईत थोड्या लालसर रंगावर भाजुन घ्याव्यात. त्या बाजुला काढुन ठेवून त्याच कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालुन तांबूस रंगावर भाजु द्यावी. त्यातच मिरची घालावी. त्यावर मटारचे दाणे घालुन बारीक गॅसवर २-३ मिनीटे परतावे. त्यावर भाजलेल्या शेवया घालाव्यात व २-३ मिनीटे परतावे. चवीप्रमाणे मीठ घालून वरून दीड कप गरम पाणी ओतावे. मिश्रण नीट हलवून झाकावे. शेवयी शिजली नाही आणि पाणी आटले तर उरलेले पाणी घालुन पुन्हा झाकुन ठेवावे. शेवयी जरा फ़ुलल्या सारखी वाटल…