Posts

Showing posts from July, 2008

लेमन कॉरिएन्डर सुप(Lemon Coriander Soup)

Image
Here is the link to English Recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/lemoncoriandersoup

अश्विनीने मागे एकदा विचारले होते की लेमन कॉरिएन्डर सुप कसे बनवायचे माहीती आहे का? तेव्हा मला त्याबद्दल फार कल्पना नव्हती. त्यानंतर कधीतरी थाई रेस्टॉरंटमधे परत गेले असताना त्यांचे Tom Yum सुप प्यायले तेव्हा त्यातले लेमनग्रास, काफिर लाईम चे पान, गलंगल वगैरेचे स्वाद पुन्हा नव्याने गवसले. पुढे कधीतरी कोथिंबीर निवडताना त्याचे देठ वापरून सुप करुन पहावे असे वाटले.

Lemon Coriander Soup

त्या सुपचे हे अगदी बेसीक प्रमाण -

१ जुडी कोथिंबीरीचे देठ
३-४ इंच लांबीचे गवतीचहाचे दांडे २
१/२ इंच आले
१ मोठा टोमॅटो
१/२ लिंबू
चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरीपूड
३ कप पाणी

कृती - गवतीचहाचे दांडे धुवुन बत्त्याने थोडे ठेचुन घ्यावेत. आले धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. टोमॅटो बारिक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेउन तापायला ठेवावे. पाणी तापत आले की त्यात धुतलेले कोथिंबीरीचे दांडे, आले, गवती चहा, टोमॅटो घालावे. गॅस मध्यम करुन व्यवस्थीत उकळू द्यावे. ३ कप पाणी उकळून साधारण२.५ कप होईल इतपत उकळावे. पातेले गॅसवरुन उतरवून ते पाणी गाळून घ्…

Baked Peaches And Blueberries

Image
बेक्ड पिचेस आणि ब्लुबेरीज विथ व्हॅनीला आईसक्रीम

I enjoy baked fruits in any shape or form. So baked fruits make amazing healthy dessert on those hot summer days.Baked peaches and blueberries with Vanilla Ice Creme
1 Peach

15-20 Blueberries

1/2 Orange

1 tbsp Sugar

Line a baking dish with aluminum foil. Preheat the oven at 325 degree Fahrenheit. Cut the peach in half and take out seed. Thinly slice the 2 halves. Arrange sliced peaches in the baking tray and add washed blueberries. Squeeze orange juice on top of the peaches and blueberries and then sprinkle sugar on top. Put the baking dish in the oven and bake for about 25 minutes. Take off the tray from oven and let it cool for about 5-7 minutes. Take scoop of Vanilla Ice cream in a bowl and add baked fruits on top.


I do not eat ice cream so I just had the baked fruits by itself and it was delicious.बेक्ड पिचेस आणि ब्लुबेरीज विथ व्हॅनीला आईसक्रीम & Awards!! (Baked peaches and bluberrires with vanilla ice creme)

Image
Here is English version of this recipe
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/07/baked-peaches-and-blueberries.html

अवार्ड्स सेलीब्रेट करण्यासाठी काहीतरी गोड हवेच नाही का? बेक्ड पिचेस आणि ब्लुबेरीज विथ व्हॅनीला आईसक्रीम कसे वाटते?

१ पीच
१५-२० ब्लुबेरीज
१/२ संत्र्याचा रस
१ टेबल्स्पून साखर
कृती - ओव्हन ३२५ डिग्री फॅरेनहाईटवर तापवायला ठेवावा. पिच धुवुन मधोमध चिरुन बी काढुन टाकावे. त्याचे पातळ उभे काप करावेत. एका बेकिंग डिशला ऍल्युमिनिअम फॉइल लावावी. त्यावर पिचेसचे तुकडे पसरावेत. त्यावर धुतलेल्या ब्लुबेरीज पसराव्यात. संत्र्याचा रस काढुन पिचेसवर पसरावा. त्यावर साखर भुरभुरावी. हा ट्रे ओव्हनमधे ठेवावा. साधारण २५ मिनीटे बेक करावे. तेवढ्यात पिचेस अगदी मऊ नाही तरी ब-यापैकी शिजतात. ट्रे बाहेर काढुन ५-७ मिनीटे गार होऊ द्यावा.एका बाऊलमधे आईसक्रीम घेउन त्यावर पिचेसचे मिश्रण घालावे. लगेचच खायला द्यावे.
मी स्वतः आईसक्रीम खाउ शकत नाही म्हणुन मग मी बेक केलेली फळे नुसतीच खाल्ली. एकदम मस्त लागली.


Baked peaches and blueberries with Vanilla Ice Creme

धन्यवाद दिक्षा, तुला मिळालेले आवार्ड्स माझ्याशी शेअर केल्याबद…

परत एकदा कॉफी - फिल्टर कॉफी (Coffee once Again - filter coffee that is!)

Image
Here is the link to English version of this coffee -http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/02/coffee-once-again-filter-coffee-that-is.html

मुद्दाम कॉफीसाठी कुणी घरी येणे या देशात तरी खुपच कमी. बोलावले आले तरी जेवणासाठीच बोलावले जाते. त्यामुळे माझे काका-काकू माझ्याकडे कॉफी प्यायला म्हणुन मुद्दाम येतात ते खुपच आवडते एकतर घरचे कोणी येतेय म्हणुन आणि कॉफी अगदी मनापासुन पितेय ते पाहुनही!
फिल्टर कॉफीची पहिली चव मी माझी मैत्रीण सौजन्याच्या घरी तिच्या सासुबाईंनी केलेल्या कॉफीची घेतली. मस्त तब्येतीत बनवलेल्या या कॉफीचे २ घोटही जागे होण्यासाठी पुरेसे असतात. या कॉफीची चव जरी मला ४-५ वर्षापुर्वी कळाली तरी स्वत:चा फिल्टर घ्यायला मला तेवढी वर्षं लागली. माझा हा कॉफीचा फिल्टर मला माझी मैत्रीण दीपिकाने दिलाय, एका मैत्रीणीने, श्रीप्रियाने कॉफी कशी बनवायची ने शिकवले, कोणती कॉफी वापरावी हे मला प्रितीने सांगितले. त्यामुळे माझी ही फिल्टर कॉफी माझ्या सर्व मैत्रीणींसाठी! धन्यवाद सौजन्या, दीपिका, श्रीप्रिया, प्रिती! ही कॉफी तुमच्यासाठी!

Filter Coffee in Handmade Kulhad

या फोटोमधील कुल्हड मी स्वत: बनवले आह…

मेथीचे पिठले (Methiche Pithale)

Image
(Link to English Recipe)

आमचे कराडचे घर अगदी शेतात होते पूर्वी. शेतकरी घरच्यापुरती का होईना मेथी, चकवत, पालक, पावटे, वांगी असली पिके लावत आणि आम्ही शेजारी असल्याने आणुनही देत असत. शेतातल्या ताज्या भाजीचा स्वाद अगदी वेगळाच. असली भाजी घरी आल्य आल्या केली जायची आणि त्यामुळे जेवताना ४ घास नक्कीच जास्त जात. आता आजुबाजुला इतकी भरपूर भाजी विकत मिळते पण त्या ताज्या भाजीची चव नक्कीच कुठे मिळत नाही. त्यावेळी मम्मी मेथीचे असंख्य प्रकार करत असे त्यातलेच एक मेथीचे पिठले!

मधे एका मैत्रिणीला जेवायला बोलावले होते. त्या दोघाना साधे आणि मराठी असे कहीतरी खायचे होते. काय करावे असा विचार करत देसी स्टोअरमधे गेले तर समोर मेथीची एकच पेंडी दिसली ती घेतली, थोडी ताजी वांगी वगैरे घेऊन घरी आले. मेथीची भाजी करायचा विचार होत पण मग अचानक मेथीचे पिठले करावे असा विचार आला. तिच ही रेसिपी -
१ जुडी मेथी
३-४ लसुण पाकळ्या
३/४ ते १ कप बेसन
१/२ कांदा बारीक चिरुन (वगळण्यास हरकत नाही)
फोडणीसाठी २ टीस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे

कृती - मेथी निवडून, धुवुन बारीक चिरुन घ्यावी. काMदा घालण…

Methiche Pithale / Zunaka

Image
(Link to Marathi Recipe)

My parent's home was in the middle of the farms. Most of the farmers used to grow vegetables like methi, spinach, small eggplants etc. just for the family. They used to share these goodies with us. Fresh out of the farm vegetables are so tasty that once could easily overeat! I can get so many fresh and variety of vegetables here but its not the same as the ones we used to get back then. My mom used to make lots of different kinds of dishes with methi and this 'pithale' is one of them

Recently i had invited a friend of mine for dinner. She wanted to eat something simple and Maharashtrian. I was roaming in the Indian store thinking what to make and I saw last bunch of Methi leaves. I got that along with some fresh tiny eggplants. I was initially thinking of making simple methi but I decided to make 'methiche pithale'


1 bunch of fresh methi
3/4 to 1 cup besan (chickpea flour)
3-4 cloves of garlic
1/2 onion (optional)

2 tsp oil, mustard seeds…

Instant Coffee with Nutmeg!

Image
(Here is the link to English version of this recipe -http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/04/coffee-break-instant-coffee-with-touch.html)
माझी मम्मी अतिशय सुंदर कॉफी बनवते. पण तिची पद्धत म्हणजे साधी कॉफी पाणी, दूध, साखर आणि जायफळ घालून उकळून बनवलेली. एकदम मस्त लागते. आम्ही मुख्य गावापासुन दूर रहातो आणि सायकलवरून मामालोकांना घरी यायचे म्हणजे कमीतकमी १० किलोमीटर पेडलींग करावे लागे. मग ते आले की नक्की फर्माईश होणार, 'माई, कॉफी कर की!' त्यामुळे दर मंगळवारी घरी कॉफी होणारच! जायफळ तिच्या हातून कधी जास्त नाही झाले की कधी कमी नाही पडले. साखर, दूध, कॉफी नेहेमी अगदी व्यवस्थीत असे. मी केलेली कॉफी मामालोक लग्गेच ओळखायचे :( तिच्यामुळेच की काय देव जाणे पण मला थोडी स्ट्राँग कॉफी प्यायची सवय झाली. साधारण ७-८ वी मधे असेन मम्मीने माझ्यासाठी नेसकॅफेची बरणी घरी आणली कदाचीत माझ्या हट्टाने पण असेल. त्याआधी ती घरी येतही होती पण माझ्या कधी लक्षातही आले नव्हते. एक कप दूध आणि त्यात अगदी चमचा भरून कॉफी असे मम्मी करुन देत असे रविवारी वगैरे.

कॉफी म्हणले की मला अजुन एक गम्मत आठवते ती म्हणाजे मी मम्मी…

Vegetable cultets as weekend snack!

Image
Vegetable Cutlets


ह्या विकेन्डला cutlets करुन झाले. हाताशी कॅमेरा असल्याने लगेच फोटो काढणे पण जमले. तेच हे फोटो!

कटलेट्सची रेसीपी इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/02/blog-post_08.html

कालवलेले पोहे (Kalavalele Pohe)

Image
Here is my link to English version of this recipe.

साधारण ३ वर्षापुर्वी मी हे पोहे पहिल्यांदा खाल्ले. मी बेंगलोरला माझ्या चुलत बहीणीला भेटायला गेले असताना तुला नवीन वेगळे काय खायला घालू? असा विचार करत तुला कुमठ्याचे पोहे खायला घालते असे ती म्हणाली. तिच्या सासुबाई कुमठ्याच्या आहेत आणि अप्रतिम स्वयंपाक करतात. ती पोहे करत असताना माझे निरिक्षण चालु होते. पातळ पोहे, थोडा गुळ, मस्त ताजे ओले खोबरे, आणि एक लालभडक रंगाचा मसाला. ती या पोह्यात थोडा कच्चा कांदा पण घालते म्हणुन मग तिने मला विचारले सकाली कच्चा कांदा खाशील का? माझे उत्तर होते 'कसे लागते त्यावर अवलंबून आहे!' तिने थोडे कांदा घालून आणि थोडे तसेच बनवले.

मी नेहेमी वापरते/करते त्याहून तो मसाला थोडा वेगळाच होता. त्यात कोल्हापूर/बेळगावकडे मिळणारी ब्याडगी/बेडगी मिरची वापरली होती. या मिरचीचे वैशिष्ट्य हे की तिखटाला एकदम कमी आणि रंगाला एकदम लालभडक अशी असते. एवढेसे तिखट घातले तरी पदार्थ मस्त लाल होतो.

पहिल्या घासालाच मी या पोह्यांच्या प्रेमात पडले. अर्थात मला कांदा न घातलेलेच जास्त आवडले! बहीणीने थोडा मसाला मला बरोबर नेण्यासाठी दिला. …

बीट कोशिंबीर (Beet Koshimbir)

Image
मी अगदी नवीन नवीन स्वयंपाक शिकले होते तेव्हा कोणतीतरी कोशिंबीर कर असे मम्मी सांगायची. त्या सर्वात बीटची कोशिंबीर माझी आवडीची कारण त्याचा सुंदर रंग. मी स्वत: भाजी आणायला गेले की हमखास बीट आणायचेच. त्यावेळी माझे कोल्हापुरला खूप जाणे होत असे. एकदा मामींबरोबर भाजी आणायला गेले तेव्हा उत्साहाने बीट घेउयाकी की म्हणुन घेउन आले. मामीना कौतुकाने कोशिंबीर करुन दाखवली. थोड्यावेळात माझा काका जेवायला बसला. आणि पहिल्याच घासाला लिंबाचे बी, आणि मिरचीचा तुकडा असला तुफान संगम त्याच्या तोंडात झाला! तेव्हापासून बीटची कोशिंबीर केली की मला त्याचा तो विचित्र चेहेराच आठवतो.

अलीकडे माझे खुपच exotic पदार्थ खाउन/ लिहुन झाले तेव्हा एखादा साधा -सुधा घरगुती पदार्थ करुन लिहावा वाटला तेव्हा मला अपसूकच बीटच्या कोशिंबीरीची आठवण झाली.

Beet Koshimbir

२ मध्यम आकाराचे बीट
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
१/२ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ, साखर
मुठभर कोथिंबीर

फोडणीसाठी - १ टीस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, १ हिरवी मिरची चिरुन

कृती - बीट स्वच्छ धुवुन कुकरला एक शिट्टी करून शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढुन मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावे. त्यात द…

वेगन मॅंगो मूस (Vegan Mango Mousse)

Image
Here is English version of this recipe

साधारण ७-८ वर्षापूर्वीची गोष्ट असेल एका मैत्रीणीकडे मॅंगो मूस खाल्ले आणि रेसीपी घेउन, सामान आणुन लगेच करून पाहीले. त्यादिवशी माझी एक मैत्रीण घरी आली होती तिला पण चाखायला दिले. ही माझी मैत्रीण नविन कोणत्याही शाकाहरी पदार्थाची कमीतकमी चव घेण्यासाठी तरी नेहेमी तयार असते. पण तिने ते खाल्ले नाही कारण त्यात जिलेटिन घातले होते. तेव्हा मला प्रथम समजले की जिलेटीन प्राणीजन्य पदार्थ आहे ते. त्यानंतर माझा वेगन जिलेटीन चा शोध सुरु झाला आणि अगार अगार पावडर मिळाली तेअगार अगार पावडर थाई, इंडोनेशियन, व्हीएटनामीज पदार्थांमधे जेलींग एजंट म्हणुन वापरतात. ते सी-वीड पासून बनवलेले असते. पुढे मी प्राणीजन्य पदार्थ खाण्याचे थांबवले तेव्हा क्रीमचीज, कूलव्हीप, व्हिपिंगक्रीम ऐवजी सिल्कन टोफु वापरायला सुरुवात केली. ही रेसीपी माझ्या टोफू न आवडणा-या मैत्रीणी पण आवडीने खातात.

Vegan Mango Mousse

२-३ आंब्याच्या फोडी
१/२ पॅक सिल्कन सॉफ्ट टोफ़ु (साधारण ५-६ औंस)
३-४ टेबल्स्पून साखर
१/२ टीस्पून वेलची पावडर
३-४ केशर काड्या
१ संत्र्याचा रस
१/२ लिंबाचा रस

१/२ कप पाणी
३ टेबल्स्पून अगार …

कांदे पोहे (Kande Pohe)

Image
ही रेसीपी अभिजीत साठी!
कांदेपोहे हा मराठी माणसाचा आवडता नाष्ट्याचा प्रकार. 'कांदेपोहे' ह्या प्रकाराला मराठी समाजात एक वेगळेच स्थानही आहे.

Cabbage Pohe

१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची पाने
चविपुरते मीठ
१/२ लिंबाचा रस
१ टीस्पून साखर
२ टेबल्स्पून तेल
फोडणीसाठी जीरे, मोहरी, हिंग, हळद
मुठभर चिरलेली कोथिंबीर
२-३ टेबलस्पून ओले खोबरे (वगळण्यास हरकत नाही)

कृती - कांदा शक्यतो बारीक कापून घ्यावा. एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून जीरे, मोहरी, हिंग, हळद घालावे. जिरे-मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता, चिरलेली मिरची घालावी. एखादा मिनीट परतले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा परतत असताना एका बाजुला पोहे नीट धुवुन शक्यतो पूर्ण पाणी काढुन टाकावे. शक्य असेल तर शक्यतो पोहे चाळणीत भिजवावेत. कांदा परतत आला की त्यावर अर्धे पोहे घालावेत त्यावर मीठ, साखर घालून उरलेले पोहे घालुन नीट परतावे. वरून लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर घालून नीट परतावे.

टीप - १. बरेचदा अमेरीकेत दुकानात मिळणारे पोहे एकतर खूप जाड नाहीतर खूपच पातळ असतात. खूप ज…

पालकाची पळीवाढी भाजी (Spinach BhaajI)

Image
Spinach Bhaji

पालकाची पातळ भाजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. ही रेसीपी माझी मैत्रीण रेणुका हिची आहे.

Spinach BhaajI

१ मोठी जुडी पालक
१ मुठ शेंगदाणे
१ मुठ हरभरा डाळ
१-२ टेबलस्पून बेसन
२-३ लाल मिरच्या (२-२ तुकडे करून)
२ पाकळ्या लसूण (ठेचुन)
१ लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
१ लहान खडा गूळ
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी - १ टेबल्स्पून तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग
२-३ कप पाणी लागेल तसे

कृती - डाळ आणि दाणे पाण्यात वेगवेगळे साधारण१ तास भिजत ठेवावेत. दरम्यान पालक नीट धुवुन बारीक चिरुन घ्यावा. साधारण तासाभराने डाळ, दाणे, पालक एकत्र करुन प्रेशरकुकर्मधे १-२ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावा. प्रेशर उतरल्यावर भाजी पळीने नीट घोटुन घ्यावी. त्याला साधरण १-२ टेबलस्पून बेसन लावावे. मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ, घालून भाजी उकळायला ठेवावी. खूप घट्ट झाली असेल तर किंचीत पाणी घालावे. बाजुला फोडणीच्या वाटीत तेल तापवून जिरे, मोहरी, हळद, हिंग, ठेचलेला लसूण घालावा. १ मिनीटानंतर त्यात लाल मिरची घालावी. आणी फोडणीचा गॅस बंद करावा. उकळत्या भाजीवर ही फोडणी ओतुन गॅस बंद करावा. गरम गरम…