लेमन कॉरिएन्डर सुप(Lemon Coriander Soup)

Here is the link to English Recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/lemoncoriandersoup

अश्विनीने मागे एकदा विचारले होते की लेमन कॉरिएन्डर सुप कसे बनवायचे माहीती आहे का? तेव्हा मला त्याबद्दल फार कल्पना नव्हती. त्यानंतर कधीतरी थाई रेस्टॉरंटमधे परत गेले असताना त्यांचे Tom Yum सुप प्यायले तेव्हा त्यातले लेमनग्रास, काफिर लाईम चे पान, गलंगल वगैरेचे स्वाद पुन्हा नव्याने गवसले. पुढे कधीतरी कोथिंबीर निवडताना त्याचे देठ वापरून सुप करुन पहावे असे वाटले.

Lemon Coriander Soup

त्या सुपचे हे अगदी बेसीक प्रमाण -

१ जुडी कोथिंबीरीचे देठ
३-४ इंच लांबीचे गवतीचहाचे दांडे २
१/२ इंच आले
१ मोठा टोमॅटो
१/२ लिंबू
चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरीपूड
३ कप पाणी

कृती - गवतीचहाचे दांडे धुवुन बत्त्याने थोडे ठेचुन घ्यावेत. आले धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. टोमॅटो बारिक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेउन तापायला ठेवावे. पाणी तापत आले की त्यात धुतलेले कोथिंबीरीचे दांडे, आले, गवती चहा, टोमॅटो घालावे. गॅस मध्यम करुन व्यवस्थीत उकळू द्यावे. ३ कप पाणी उकळून साधारण२.५ कप होईल इतपत उकळावे. पातेले गॅसवरुन उतरवून ते पाणी गाळून घ्यावे. गाळलेले पाणी परत एका पातेल्यात घालून गॅसवर ठेवावे. त्याच चवीप्रमाणे मीठ, साखर आणि मिरीपूड घालावी. भांडे खाली उतरवताना लिंबू पिळावे. गरम गरम प्यावे.

टीप - १. कोथिंबीर घालून पाणी उकळात असताना गाजराचा एखादा तुकडा बारीक चिरुन, एखादा फ्लॉवर, कोबीचा तुकडा घालता येईल. त्याने ब्रॉथ जास्त चविष्ट होईल.
२. सहजी मिळत असेल तर गलंगल हे थाई आले साध्या आल्याच्या ऐवजी वापरता येईल.
३. काफील लाईमची पाने मिळणे शक्य असेल तर ती वापरली तर त्याचा वास अप्रतीम येतो.
४. ब्रॉथ गाळून घेतल्यावर आवडत असेल तर गाजर, झुकीनी, टोमॅटोच्या मोठ्या फोडी या सुप मधे घालता येतात.


अश्विनीला अपेक्षीत असणारे सुप हेच का? माहीती नाही. मला मात्र हे अतिशय आवडले.


Comments

  1. lemon grass soup......seems very interesting...looks nice

    ReplyDelete
  2. थॅंक्यू मिंट्स, अगदी आठवणीने रेसिपी दिल्याबद्दल! मी सुद्धा वाटच पाहात होते.
    यात लेमन ग्रास नाही का वापरलेलं? की गवती चहालाच लेमन ग्रास म्हणतात? माहिती नाही.
    बाकी मला तरी असेच सूप अपेक्षीत होते! बाहेर जोराचा पाऊस पडत असतांना प्यायला मस्तच! त्यावर थोडी कोथिंबीरीची पाने चिरुन टाकलेली असतात.

    ReplyDelete
  3. bhags - Thanks!

    Ashwini - lemongrass mhanajech gavati chaha. mI photo kadhatana kothimbeer ghalayachi visarale :)

    ReplyDelete
  4. The soup looks delicious and sounds interesting:)

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.