Posts

Showing posts from November, 2008

JFI: Carrot

माझ्या काही जुन्या गाजराच्या रेसिपीस एकत्र करुन, काहीचे इंग्लिशमधे भाषांतर(?) करुन खास पोस्ट बनवतेय. त्या रेसिपीज अशा -
गाजर सोयाबीनची भाजी - मराठी रेसिपीCarrot Soyabean Sabji रेसिपीगाजराचा केक

All this is for The Best Cooker's JFI: Carrots!

गाजराचे पराठे (Carrot Paratha)

Image
English version of this recipe can be found here - http://vadanikavalgheta.googlepages.com/carrotparathas

बाजारात गाजराचे ढीग दिसायला लागले की थंडी आली हे समजत असे देशात असताना. लाल केशरट रंगाच्या गाजराचे ढीग मस्त दिसायचे. मम्मी नेहेमी थोडी मोठी, थोडी लहान अशी मिक्स करुन आणत असे कारण मला ती ताजी गाजरे खायला खुप आवडत असे. गाजराची कोशिंबीर, कधितरी गाजराचा हलवा करणे आलेच. मम्मीने केलेला हलवा मस्त असायचा. तिने कधी खवा वगैरे आणुन हलवा केल्याचे मला आठवत नाही. रोजचे राहीलेले दूध ती आटवून फ्रीझरमधे ठेवत असे. असे ४-५ दिवस करुन त्यात तुपावर भाजलेला गाजराचा खिस घालुन कोरडे होईपर्यंत आटवून त्यात साखर, वेलची, केशर घातले की झालाच हलवा. त्या गाजराची आणि मम्मीने केलेल्या हलव्याची सर इतर कशालाच नाही.

गाजर म्हणले आणखी एक आठवण येते ती म्हणजे हिंदी सिनेमा! हिंदी सिनेमातला आई आणि मुलाचा एक अतिशय प्रेमळ संवाद असतो - "बेटे मैने आज तुम्हारे लिये गाजरका हलवा बनाया है|" तसाच कधितरी "बेटे मैने तुम्हारे लिये आज मूली के पराठे बनाये है|" असे पण ऐकल्याचे आठवते. हे प्रसंग आठवत असताना गाजराचे पराठे …

स्वयंपाकाची तयारी

बरेच दिवसापासुन ब-याच कॉलेजला जाणा-या मित्र-मैत्रिणींकडुन ऐकतेय की स्वयंपाकात खुप वेळ जातो. बाहेरचे खाऊन पोट भरतेच असे नाही. नेहेमी तेच तेच खाउन कंटाळा येतो. तेव्हापासुन विचार करतेय की त्यांना उपयोगी पडेल अशा काही गोष्टी लिहाव्यात म्हणुन. पूर्वतयारीचा थोडाफार भाग आणि भारतीय किराणामालाच्या दुकानात न जाता भारतीय स्वयंपाक आणि इटालियन वगैरे पदार्थ कसे करावेत इत्यादी. सगळेच एका पोस्ट मधे होईलच असे नाही. पण हळुहळु बरेच लिहिन म्हणतेय. तर नमनाला फार तेल न जाळता सुरुवात करते -

* आठवड्याच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी किंवा रविवारी थोडावेळ राखुन ठेवावा तेव्हा निदान आठवड्याचा किराणा भरुन ठेवावा.
* बटाटे, टोमॅटो, पालक, गाजर, काकडी, बीटरुट, कोबी फ्लॉवर, चायनीज/जापनीज वांगी, ढबु मिरच्या हे आणुन ठेवायला विसरु नये.
* झुकीनी, लाल भोपळा, सरसो (मस्टर्ड ग्रीन्स), चार्ड, लाल मुळा वगैरे पण आणायला हरकत नाही.
* लिमा बीन्स, मिळत असतील तर सोयाबीन, मटारचे दाणे, मिक्स वेजीटेबल पॅक, कापलेले ग्रीन बीन्स हे फ्रोजन सेक्शनमधे मिळतात ते आणुन ठेवावेत.
* करायला सोपे जाते म्हणुन फक्त भात करण्यापेक्षा व्हीट ब्…