Posts

Showing posts from January, 2008

अंबील (Ambil)

Image
२ टेबलस्पून नाचणीचे पीठ
१/४ कप अंबट ताक
३ कप पाणी
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून बारीक कापलेला कांदा - इच्छेप्रमाणे
१ लहान पाकळी लसूण बारीक खिसुन - इच्छेप्रमाणे
अंबट ताक - आवश्यकतेप्रमाणे

कृती - अंबट ताकात नाचणीचे पीठ रात्रभर भिजवावे. सकाळी उठुन ३ कप पाणी गरम करायला ठेवावे. त्यात साधारण १ टीस्पून मीठ घालावे. साधारण उकळीला येईल असे वाटले की गॅस बारीक करुन ताकात भिजवलेली नाचणी त्यात घालावी गुठळ्या होऊ न देता ती नीट मिसळुन चमच्याने ते मिश्रण हलवत रहावे. उतू जाणाची शक्यता असल्याने गॅस मोठा करु नये. एक उकळी आली की गॅस बंद करून अंबील थंड करायला ठेवावी.
प्यायला देताना त्यात आवडीप्रमाणे कच्चा कांदा, बारीक केलेला लसूण आणि अंबट ताक घालुन द्यावी.

टीप - १. नाचणीचे पीठ ताकात रात्रभर भिजवणे शक्य नसेल तर किमान २ तास तरी भिजवावे.
२. पीठ पाण्यात घालतना गुठळ्या होतील अशी भिती वाटत असेल तर त्यात १/२ कप पाणी घालुन सरसरीत करुन ते गरम पाण्यात घालावे.
३. कच्चा लसुण आणि कच्चा कांदा ऐच्छीक आहे. हे घातलेली अंबील कर्नाटकात जास्त प्रचलीत आहे. पण घालणार असाल तर ऐनवेळीच घालावी.
४. अंबील शरीरासाठी थंड असते त्यामुळ…

ऑरेंज रसम (Orange Rasam)

Image
अलीकडे मला खुप सर्दीसारखे झाले होते आणि सतत चहा कशाला करायचा म्हणुन मी रसम करावा म्हणुन फ्रीज उघडला तर टोमॅटो संपले होते पण ऑरेंज ज्युस होता घरात. मग थोडा ऑरेंज रसमचा प्रयोग करायचे ठरवले आणि मला वाटते प्रयोग बराच यशस्वी झालाय असा माझ अंदाज आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो ह रस्समOrange Rasam

२ कप ऑरेंज ज्युस
१.५ कप पाणी
१ टेबलस्पून रसम पावडर
१ चमचा साखर
चवीप्रमाणे मीठ
१/४ चमचा चिंचेचा कोळ
१ टीस्पून तेल
जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता - फोडणीसाठी

कृती - एका मध्यम आकाराच्या पातेल्यात तेलाची जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालुन फोडणी करावी. त्यात पाणी, चिंचेचा कोळ, साखर, मीठ, रसम पावडर घालावी आणि एखादा मिनीट मध्यम गॅसवर उकळावे. गॅस बारीक करुन ऑरेंज ज्युस घालावा आणि परत गॅस मध्यम आचेवर करुन एकच उकळी आणुन गॅस बंद करावा.

टीप -१. मी ऑरेंज ज्युस घेताना पल्पसहीत घेते आणि त्याची चव छान येते असे मला वाटले.
२. घरच्या बागेतल्या संत्र्यांचा रस काढुन जर हे रसम केले तर अप्रतीम चव येते.
३. मी हे रसम भाताबरोबर खाल्ले नही कधी पण नुसते प्यायला अतीशय मस्त वाटले.