Posts

Showing posts from February, 2008

चॉकलेट मॅकरून (Chocolate Macaroon)

बाजारात मिळणा-या चॉकलेट मॅकरूनमध्ये अंडे, तूप, साखर आणि चॉकलेट पावडर असते. अंडे मी खात नसल्याने मला हा प्रकार कधी खाता येत नसे. एकदा घरच्या घरी थोडा प्रयत्न करुन बघु म्हणुन मी हे करुन पाहीले आणि सतत करत राहीले.

१ कप ओल्या खोब-याचा चव
१ कप पिठीसाखर
१ कप चॉकलेट पावडर (unsweetened)

कृती -
फूडप्रोसेसर मधे कणीक मळण्यासाठी जे पाते असते ते लावुन साखर आणि ओले खोबरे एकत्र करावे. त्यात चॉकलेट पावडर घालुन नीट मिश्रण बनवून घ्यावे. ह्या झालेल्या मिश्रणाचे साधारण १ इंच व्यासाचे लाडू बांधावेत आणि एका ताटलीमधे ठेवून फ्रिजमध्ये ठेवावेत. साधारण ३-४ तास सेट होऊ द्यावेत.

टीप -
१. माझ्याकडे raw chocolate म्हणाजे चॉकलेट्च्या न भाजलेल्या बिया होत्या त्याची पावडर करुन मी वापरली होती अप्रतीम लागत होते.
२. पिठीसाखर आवडीप्रमाणे कमीजस्त करु शकता.
३. चॉकलेट पावडर unsweetened च वापरा त्याने चव चांगली लागते.
४. लाडू वळत बसण्याऐवजी आईस्क्रीम स्कूप ने लहान लहान स्कूप पाडा. घरी असलेल्या लहान पळीला पाणी लावुनही हा प्रकार करता येईल.

व्हेजीटेबल कटलेट्स (Vegetable Cutlets)

ही रेसीपीदेखील माझी मैत्रीण अश्विनीचीच. मधे पार्टीसाठी खुप लहानमुले येणार होती आणि नेहेमी मुलांसाठी मोठ्यांचेच जेवण असते आणि बरेचदा खाणे तसेच टाकुन दिले जाते म्हणुन मुद्दाम मुलांसाठी म्हणुन हा पदार्थ केला होता आणि मुलांनी अगदी आवडीने खाल्ला.

१ मोठे बीट
१ मोठा बटाटा
१/२ कप फ्लॉवरचे तुकडे
१/२ कप कोबी
१/२ वाटी मटार
१-२ हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
१/२ टीस्पून जि-याची पावडर
१/२ वाटी कोथिंबीर
१ कप ब्रेड्क्रम्स

कृती - बीट आणि बटाटे कुकरमधे वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर साली काढुन मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावे. त्याबरोबर फ्लॉवर, कोबी पण खिसुन अगर मिक्सरमधुन काढुन बारीक करुन घ्यावा. मटारचे दाणे थोडे ठेचुन घ्यावेत. मिरच्या मिक्सरमधुन बारीक करुन घ्याव्यात. मीठ, वाटलेल्या मिरच्या, जिरापूड, कोथिंबीर, सगळ्या भाज्या, आणि अर्धा कप ब्रेडक्रम्स एका मोठ्या बाऊलमधे हलक्या हाताने एकत्र करावे. लागले तर एका थोडे ब्रेडक्रम्स घालावेत. हे मिश्रण साधारण बटाटेवड्याच्या सारणासारखे मऊसर असावे. आता ह्या मिश्रणाचे साधरण १ इंचाचे बॉल करुन घ्यावेत. आता ओव्हन ३५० फॅरेनहाईट टेंपरेचरवर प्रीहीट करण्यासाठी चालु करावा. एका बेकिंग डीश…

फ्लॉवर चटपटा (Chaptpata Cauliflower)

Image
प्ह्लॉवरची भाजी माझी तशी फार आवडती भाजी नाही. अगदीच काही मिळाले नाही तर ही भाजी आणावी लागते आणि मग त्याचा तो उग्र वास घालवण्याचे अनेक उपाय करुन पाहावे लागतात. हे रामायण काहीवर्षांपुर्वी अश्विनीला ऐकवल्यावर तिने मला हा प्रकार सांगितला आणि माझा अगदी फेवरीट झाला.
Chaptpata Cauliflower
साहित्य -
१ फ्लॉवरचा गड्डा
५-६ काजु पाकळ्या
१०-१२ बेदाणे
१ टेबल्स्पून तेल
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि हळद

कृती -
फ्लॉवरचे तुरे साधारण अर्धा ते एक इंच जाडीचे कापुन घ्यावेत. खालच्या गड्ड्याचे पण तसेच लहान तुकडे कापून घेउन सर्व धुवुन घ्यावे. पाणी शक्यतो पूर्ण निथळु द्यावे. एका जाड बुडाच्या कढईत तेलाची जिरे, मोहरी आणि हळद घालुन फोडणी घालावी. त्यात काजुच्या पाकळ्या व बेदाणे घालावेत. वरुन फ्लॉवर घालुन परतायला घ्यावे. त्यात लाल तिखट, गोडा मसाला घालुन परतावे. बारीक गॅसवर साधारण ५ एक मिनीटे परतल्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे. आता कदाचीत फ्लॉवरला पाणी सुटेल परत बारीक गॅसवर फ्लॉवर पूर्ण कोरडा होईल इतके परतावे. फ्लॉवर नीट शिजला की खाली उतरवून कोथिंबीर घालुन गरम गर्म फुलक्यांबरोबर वाढावे…