Posts

Showing posts from May, 2008

मटकीची उसळ (Mataki Usal)

Image
पाचवी सहावीत कधीतरी मम्मीने पावसाळ्यात मटकीची उसळ केलेली आठवते. त्यावर मी मम्मीला विचारलेले प्रश्नही तितकेच आठवतात. पुढे हॉस्टेलमधे असताना मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ जवळजवळ एक दिवसाआड मिळत असे. भरपूर लिंबू पिळुन ती खाणे आणि पोट भरणे हे माझ्यासाठी अगदी नॉर्मल होते त्या काळात. बरेचदा असे वाटे की आता आयुष्यात परत कधी या उसळी खाईन असे वाटले नव्हते. पण माझ्या नशिबाने तसे काही झाले नाही. लहान असताना जितकी आवडायची तितकीच अजुनही आवडते.

Mataki Usal

४ कप मोड आलेली मटकी
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ मोठी लसूण पाकळी
१ टीस्पून चिरलेले आले
मुठभर शेंगदाणे
१ टेबल्स्पून चिंच पाण्यात कोळुन
अगदी छोटा खडा गूळ
१ टीस्पून गरम मसाला
लाल तिखट, मीठ - चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता इत्यादी फोडणीचे साहित्य
मटकी शिजवण्यासाठी लागेल तसे पाणी

कृती - मटकी धुवुन निथळत ठेवावी. एका जाड बुडाचे पातेले मध्यम आचेवर ठेवुन तेलाची फोडणी करुन घ्यावी. त्यावर कापलेला कांदा, आले, लसुण घालुन सोनेरी रंगावर भाजुन घ्यावे. त्यावर शेंगदाणे आणि मटकी घालावी. मंद आचेवर मटकी नीट भाजुन घ्यावी. त्यावर चिंचेचा कोळ, मीठ, गरम …

दही बुत्ती (Curd Rice)

Image
मी लहान असताना आमचे कराड-कोल्हापूर-पुणे असे सारखे जाणे होत असे. त्याकाळात आजच्यासारखी चांगली हॉटेल्स वगैरे नसल्याने आणि प्रत्येकवेळी हॉटेलमधे जाणे शक्य नसल्याने मग जाताना चपात्या, बटाट्याची काचर्याची भाजी आणि दही बुत्ती हा डबा आज्जी, मम्मी नेहेमी करुन नेत. सोबत एका बाटलीमधे थोड्या दुधाला ताजे विरजण लावून आणि एका थर्मासमधे दूध. त्यामुळे गेल्या गेल्या दूध दही आणायला बाजारात पळायला लागत नसे. त्यातलीची ही दहीबुत्ती मधे मधीतरी आज्जीची खूप आठवण झाली तेव्हा केलेली -
Curd Rice
२ कप शिजवलेला भात
२ कप दही
चवीप्रमाणे मीठ
१/२ टीस्पून मिरीपूड (चवीप्रमाणे कमी जास्त करावी)
१ टेबलस्पून लसूण पेस्ट
१/४ कप चिरलेली कोथिंबीर


कृती - शिजवलेला भात पूर्णपणे थंड करुन त्यात एक कप दही, मीठ, लसूण पेस्ट, मिरीपूड घालुन नीट मिसळून घ्यावे. घट्ट वाटत असेल तर थोडे दही अजुन घालावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालून वाढावे.

टीप - १. दही मिसळताना कधी पूर्ण मिसळू नये भात घट्ट होत जातो. लागेल तसे दही वरून घालून घ्यावे.
२. ह्या भाताबरोबर तळलेली कुटाची मिरची अप्रतीम लागते.

मोडाच्या मसुरांची आमटी (Sprouted Lentil Amati)

Image
बेळगावला मंगळवारी दुकाने बंद असतात आणि त्यादिवशी काका लोक घरी असत. मग रात्रीच्या जेवणाला नेहमीच्या भाजी भाकरी भात यापेक्षा काहीतरी वेगळे करायची टूम निघायची. अशावेळी मग ही मसूर आमटी म्हणजेच चन्नंगी सारू आणि ब्रेड असा फंडु मेनु असायचा. तेच हे चन्नंगी सारु -

Sprouted Lentil Amati


२ कप मोड आलेले मसूर
१ टेबलस्पून आले लसुण पेस्ट
१ टेबलस्पून गोडा मसाला
मीठ, लाल तिखट चवीप्रमाणे
२ अमसुले
गुळाचा छोटा खडा
१ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता
१/२ कप बारीक चिरलेला कांदा (वगाळला तरी हरकत नाही)
गरम पाणी जरुरीप्रमाणे
थोडी चिरलेली कोथिंबीर

कृती - मोड आलेले मसुर एका पसरट भांड्यात घ्यावेत. त्यात आले लसुन पेस्ट, थोडेसे लाल तिखट, सगळा गोडा मसाला आणि १-२ चमचे पाणी घालुन ते मसुरांना नीट चोळावे. मसाला लावलेले मसुर साधारण एक ते दिड तास तसेच ठेवावे.
त्यानंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालुन फोडणी करावी. त्यात मसाला लावलेले मसूर घालुन साधारण २-३ मिनीटे नीट परतून घ्यावे. त्यावर लाल तिखट घालावे वरुन पाणी घालावे. त्यावर बारीक चिरलेलेआ कांदा घालावा आणि झाकण लावून मसु…

पौष्टीक खिचडी (Healthy Khichadi)

Image
बरेचदा असे होते की स्वयंपाकाचा तुफान कंटाळा येतो आणि तेच तेच इडली, डोसा, छोले नान असले बाहेर जाऊन खायचा तर त्याहुनही कंटाळा येतो. चिनी, थाई वगैरे दुकानात भात, नारळाचे दूध खायची भिती वाटते. अशावेळी दोघांपैकी कोणीतरी वरणफळे किंवा खिचडी कढी बनवतो. मधे केलेल्या पौष्टीक खिचडीची कृती देतेय.

Healthy Khichadi

१ भाग सालीची मूगडाळ
१ भाग ताजे/ फ्रोझन सोयाबीनचे दाणे
२ भाग ब्राऊन भात (हातसडीचा तांदूळ)
३ भाग चिरलेली पालेभाजी (पालक, कोबी, लाल कोबी पैकी कोणतीही एक)
१-२ टीस्पून गोडा मसाला (चवीप्रमाणे कमी जास्त करावा)
२ टेबलस्पून तेल
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे
जिरे मोहरी, हळद, हिंग फोडणीसाठी
६ भाग पाणी

कृती - डाळ, तांदूळ धुवुन ठेवावे. पालेभाजी धुवुन चिरुन घ्यावी. मायक्रोवेव मधे किंवा गॅसवर पाणी तापवत ठेवावे. एका प्रेशरकुकर मधे तेल तापवून त्याला जिरे, मोहरी, हिंग, हळद घालुन फोदणी करावी. त्यात धुतलेले डाळ तांदूळ घालुन ३-४ मिनीटे नीट परतावे. त्यात सोयबीनचे दाणे घालुन एखादा मिनिट परतावे. त्यात चिरलेली पालेभाजी, तिखट, मीठ, गोडा मसाला घालावा. वरुन गरम पाणी ओतून कुकरचे झाकण लावून २-३ शिट्ट्या करुन भात शिजवून घ्यावा.

टिप…