Thursday, July 31, 2008

लेमन कॉरिएन्डर सुप(Lemon Coriander Soup)

Here is the link to English Recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/lemoncoriandersoup

अश्विनीने मागे एकदा विचारले होते की लेमन कॉरिएन्डर सुप कसे बनवायचे माहीती आहे का? तेव्हा मला त्याबद्दल फार कल्पना नव्हती. त्यानंतर कधीतरी थाई रेस्टॉरंटमधे परत गेले असताना त्यांचे Tom Yum सुप प्यायले तेव्हा त्यातले लेमनग्रास, काफिर लाईम चे पान, गलंगल वगैरेचे स्वाद पुन्हा नव्याने गवसले. पुढे कधीतरी कोथिंबीर निवडताना त्याचे देठ वापरून सुप करुन पहावे असे वाटले.

Lemon Coriander Soup

त्या सुपचे हे अगदी बेसीक प्रमाण -

१ जुडी कोथिंबीरीचे देठ
३-४ इंच लांबीचे गवतीचहाचे दांडे २
१/२ इंच आले
१ मोठा टोमॅटो
१/२ लिंबू
चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरीपूड
३ कप पाणी

कृती - गवतीचहाचे दांडे धुवुन बत्त्याने थोडे ठेचुन घ्यावेत. आले धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. टोमॅटो बारिक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेउन तापायला ठेवावे. पाणी तापत आले की त्यात धुतलेले कोथिंबीरीचे दांडे, आले, गवती चहा, टोमॅटो घालावे. गॅस मध्यम करुन व्यवस्थीत उकळू द्यावे. ३ कप पाणी उकळून साधारण२.५ कप होईल इतपत उकळावे. पातेले गॅसवरुन उतरवून ते पाणी गाळून घ्यावे. गाळलेले पाणी परत एका पातेल्यात घालून गॅसवर ठेवावे. त्याच चवीप्रमाणे मीठ, साखर आणि मिरीपूड घालावी. भांडे खाली उतरवताना लिंबू पिळावे. गरम गरम प्यावे.

टीप - १. कोथिंबीर घालून पाणी उकळात असताना गाजराचा एखादा तुकडा बारीक चिरुन, एखादा फ्लॉवर, कोबीचा तुकडा घालता येईल. त्याने ब्रॉथ जास्त चविष्ट होईल.
२. सहजी मिळत असेल तर गलंगल हे थाई आले साध्या आल्याच्या ऐवजी वापरता येईल.
३. काफील लाईमची पाने मिळणे शक्य असेल तर ती वापरली तर त्याचा वास अप्रतीम येतो.
४. ब्रॉथ गाळून घेतल्यावर आवडत असेल तर गाजर, झुकीनी, टोमॅटोच्या मोठ्या फोडी या सुप मधे घालता येतात.


अश्विनीला अपेक्षीत असणारे सुप हेच का? माहीती नाही. मला मात्र हे अतिशय आवडले.


Tuesday, July 29, 2008

Baked Peaches And Blueberries

बेक्ड पिचेस आणि ब्लुबेरीज विथ व्हॅनीला आईसक्रीम

I enjoy baked fruits in any shape or form. So baked fruits make amazing healthy dessert on those hot summer days.Baked peaches and blueberries with Vanilla Ice Creme
1 Peach15-20 Blueberries1/2 Orange1 tbsp SugarLine a baking dish with aluminum foil. Preheat the oven at 325 degree Fahrenheit. Cut the peach in half and take out seed. Thinly slice the 2 halves. Arrange sliced peaches in the baking tray and add washed blueberries. Squeeze orange juice on top of the peaches and blueberries and then sprinkle sugar on top. Put the baking dish in the oven and bake for about 25 minutes. Take off the tray from oven and let it cool for about 5-7 minutes. Take scoop of Vanilla Ice cream in a bowl and add baked fruits on top.I do not eat ice cream so I just had the baked fruits by itself and it was delicious.
Monday, July 28, 2008

बेक्ड पिचेस आणि ब्लुबेरीज विथ व्हॅनीला आईसक्रीम & Awards!! (Baked peaches and bluberrires with vanilla ice creme)

Here is English version of this recipe
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/07/baked-peaches-and-blueberries.html

अवार्ड्स सेलीब्रेट करण्यासाठी काहीतरी गोड हवेच नाही का? बेक्ड पिचेस आणि ब्लुबेरीज विथ व्हॅनीला आईसक्रीम कसे वाटते?

१ पीच
१५-२० ब्लुबेरीज
१/२ संत्र्याचा रस
१ टेबल्स्पून साखर
कृती - ओव्हन ३२५ डिग्री फॅरेनहाईटवर तापवायला ठेवावा. पिच धुवुन मधोमध चिरुन बी काढुन टाकावे. त्याचे पातळ उभे काप करावेत. एका बेकिंग डिशला ऍल्युमिनिअम फॉइल लावावी. त्यावर पिचेसचे तुकडे पसरावेत. त्यावर धुतलेल्या ब्लुबेरीज पसराव्यात. संत्र्याचा रस काढुन पिचेसवर पसरावा. त्यावर साखर भुरभुरावी. हा ट्रे ओव्हनमधे ठेवावा. साधारण २५ मिनीटे बेक करावे. तेवढ्यात पिचेस अगदी मऊ नाही तरी ब-यापैकी शिजतात. ट्रे बाहेर काढुन ५-७ मिनीटे गार होऊ द्यावा.एका बाऊलमधे आईसक्रीम घेउन त्यावर पिचेसचे मिश्रण घालावे. लगेचच खायला द्यावे.
मी स्वतः आईसक्रीम खाउ शकत नाही म्हणुन मग मी बेक केलेली फळे नुसतीच खाल्ली. एकदम मस्त लागली.


Baked peaches and blueberries with Vanilla Ice Creme

धन्यवाद दिक्षा, तुला मिळालेले आवार्ड्स माझ्याशी शेअर केल्याबद्दल!
मला खुप फूड ब्लॉगर्स माहीती नाहीत म्हणुन ५ लोकाना टॅग करु शकणार नाही. पण ४ जणीना करते

इवॉल्व्हींग टेस्ट्स
द कुकर
वैदेही
अश्विनी

Blog award


दिक्षा, तुझे फ्रेंडशिप अवॉर्ड शेअर केल्याबद्दल पण धन्यवाद.

हे फेंडशीप अवॉर्ड मी खालील चौघींबरोबर शेअर करते.

इवॉल्व्हींग टेस्ट्स
द कुकर
वैदेही
अश्विनी

Friendship

खालील प्रश्न इंग्लिशमधे असल्याने उत्तरे पण इंग्लिशमधे.
1. What was I doing ten years ago?
Working as a Statistics Lecturer!

2. Five things on Today's "To do" list
Work on this post
send tag messages to 4 girls i have chosen to pass on my awards.
planning the next recipe
planting some vegetables in the backyard.

3.I am addicted to:
Food!

4.Things I would do if I were a billionaire:
Stop working and be a teacher for a school which is in need of teachers. May be travel around the world.

5. Places I have lived:
Karad, Kolhapur, Pune, Santa Clara and Fremont.


Sunday, July 27, 2008

परत एकदा कॉफी - फिल्टर कॉफी (Coffee once Again - filter coffee that is!)

Here is the link to English version of this coffee -http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/02/coffee-once-again-filter-coffee-that-is.html

मुद्दाम कॉफीसाठी कुणी घरी येणे या देशात तरी खुपच कमी. बोलावले आले तरी जेवणासाठीच बोलावले जाते. त्यामुळे माझे काका-काकू माझ्याकडे कॉफी प्यायला म्हणुन मुद्दाम येतात ते खुपच आवडते एकतर घरचे कोणी येतेय म्हणुन आणि कॉफी अगदी मनापासुन पितेय ते पाहुनही!
फिल्टर कॉफीची पहिली चव मी माझी मैत्रीण सौजन्याच्या घरी तिच्या सासुबाईंनी केलेल्या कॉफीची घेतली. मस्त तब्येतीत बनवलेल्या या कॉफीचे २ घोटही जागे होण्यासाठी पुरेसे असतात. या कॉफीची चव जरी मला ४-५ वर्षापुर्वी कळाली तरी स्वत:चा फिल्टर घ्यायला मला तेवढी वर्षं लागली. माझा हा कॉफीचा फिल्टर मला माझी मैत्रीण दीपिकाने दिलाय, एका मैत्रीणीने, श्रीप्रियाने कॉफी कशी बनवायची ने शिकवले, कोणती कॉफी वापरावी हे मला प्रितीने सांगितले. त्यामुळे माझी ही फिल्टर कॉफी माझ्या सर्व मैत्रीणींसाठी! धन्यवाद सौजन्या, दीपिका, श्रीप्रिया, प्रिती! ही कॉफी तुमच्यासाठी!

Filter Coffee in Handmade Kulhad

या फोटोमधील कुल्हड मी स्वत: बनवले आहे तसेच त्याखालील प्लेट देखील!

माझा फिल्टर साधारण ३/४ कप मापाचा आहे. त्यात मी ४-५ टेबल्स्पून कोथा या कंपनीची कॉफी पावडर जाळीच्या भांड्यात घालते. त्यावर उकळते पाणी ओतते. साधारण २०-२५ मिनीटात दाट कॉफी फिल्टरच्या खालच्या भांड्यात मिळते. हे तयार डीकॉक्शन साधारण ४-५ लोकाना पुरते. एक कप कॉफीसाठी ३/४ कप दूध (मी १% किंवा सोयामिल्क वापरते) १ टीस्पून साखर घालून उकळायचे आणि त्यात डीकॉक्शन घालून लगेच गॅस बंद करायचा. गरम कॉफी तय्यार!

ही कॉफी जुगलबंदीच्या 'Coffee or Tea Event' साठी पण!

Wednesday, July 23, 2008

मेथीचे पिठले (Methiche Pithale)

(Link to English Recipe)

आमचे कराडचे घर अगदी शेतात होते पूर्वी. शेतकरी घरच्यापुरती का होईना मेथी, चकवत, पालक, पावटे, वांगी असली पिके लावत आणि आम्ही शेजारी असल्याने आणुनही देत असत. शेतातल्या ताज्या भाजीचा स्वाद अगदी वेगळाच. असली भाजी घरी आल्य आल्या केली जायची आणि त्यामुळे जेवताना ४ घास नक्कीच जास्त जात. आता आजुबाजुला इतकी भरपूर भाजी विकत मिळते पण त्या ताज्या भाजीची चव नक्कीच कुठे मिळत नाही. त्यावेळी मम्मी मेथीचे असंख्य प्रकार करत असे त्यातलेच एक मेथीचे पिठले!

मधे एका मैत्रिणीला जेवायला बोलावले होते. त्या दोघाना साधे आणि मराठी असे कहीतरी खायचे होते. काय करावे असा विचार करत देसी स्टोअरमधे गेले तर समोर मेथीची एकच पेंडी दिसली ती घेतली, थोडी ताजी वांगी वगैरे घेऊन घरी आले. मेथीची भाजी करायचा विचार होत पण मग अचानक मेथीचे पिठले करावे असा विचार आला. तिच ही रेसिपी -
१ जुडी मेथी
३-४ लसुण पाकळ्या
३/४ ते १ कप बेसन
१/२ कांदा बारीक चिरुन (वगळण्यास हरकत नाही)
फोडणीसाठी २ टीस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे

कृती - मेथी निवडून, धुवुन बारीक चिरुन घ्यावी. काMदा घालणार असाल तर बारीक चिरुन घ्यावा. लसुण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची खमंग फोडणी करावी. त्यात लसुण घालून किन्चीत परतावे. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात चिरलेली मेथी घालून साधारण ३-४ मिनीटे परतावे. लाल तिखट, मीठ घालुन एकदा नेट मिसळून घ्यावे. गॅस बारीक करुन मेथीमधे बेसन हळूहळू घालुन परतत जावे. साधारण ३/४ कप ते एक कप बेसन लगेल. मेथीला पाणी जास्त सुटले असेल तर बेसन थोडे जास्त लागण्याची शक्यता आहे. बेसन घालून नीट मिसळले गेले की कढईवर झाकण ठेवुन एक वाफ आणावी. गरम गरम पिठले भाकरी बरोबर वाढावे.

टीप - १. उत्तर कर्नाटकात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात घट्ट पिठल्याला पिठले आणि पातळ पिठल्याला झुणका म्हणतात (महाराष्ट्रात अगदी उलट म्हणतात). त्यामुळे याची consistency घट्ट पिठल्यासारखी करावी.
२. लसूण शक्यतो ठेचुनच घालावा.
३. कांदा घातला नाहीतरी चव अप्रतीम येते.

Methiche Pithale / Zunaka

(Link to Marathi Recipe)

My parent's home was in the middle of the farms. Most of the farmers used to grow vegetables like methi, spinach, small eggplants etc. just for the family. They used to share these goodies with us. Fresh out of the farm vegetables are so tasty that once could easily overeat! I can get so many fresh and variety of vegetables here but its not the same as the ones we used to get back then. My mom used to make lots of different kinds of dishes with methi and this 'pithale' is one of them

Recently i had invited a friend of mine for dinner. She wanted to eat something simple and Maharashtrian. I was roaming in the Indian store thinking what to make and I saw last bunch of Methi leaves. I got that along with some fresh tiny eggplants. I was initially thinking of making simple methi but I decided to make 'methiche pithale'


1 bunch of fresh methi
3/4 to 1 cup besan (chickpea flour)
3-4 cloves of garlic
1/2 onion (optional)

2 tsp oil, mustard seeds, cumin seeds, curry leaves, turmeric, asafoetida - for tempering

Kanda Lasun Masala & Salt to taste

Preparation -

Wash methi leaves and chop.
Finely chop onion if you are planning to use it. Smash garlic with pestle.
Heat oil in thick bottom frying pan and add oil. Add mustard seeds, cumin seeds, turmeric and asafoetida. Add smashed garlic to the old and fry for few seconds.
Now add onions and fry till golden brown. Add chopped methi leaves in the pan and fry for few minutes (till methi leaves wilt).
Mix red chili powder and salt to it and fry for few more minutes.
This is the time to start adding besan in the methi stirring constantly so that besan doesn't form lumps. you will be able to add abt 3/4 to 1 cup of besan depending on how much water methi has.
Mix besan well and put a lid on the pan. Let it cook for few minutes, until besan is cooked thoroughly. Cosistancy of this pithale is pretty dry.

Tips - 
  1. This is called as Pithale around North Karnataka-Maharashtra border and the patal pithale is called zunaka (exactly opposite to what it is called in Maharashtra) 
  2. Smash the garlic instead of grating or chopping.  

Friday, July 18, 2008

Instant Coffee with Nutmeg!

(Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/04/coffee-break-instant-coffee-with-touch.html)
माझी मम्मी अतिशय सुंदर कॉफी बनवते. पण तिची पद्धत म्हणजे साधी कॉफी पाणी, दूध, साखर आणि जायफळ घालून उकळून बनवलेली. एकदम मस्त लागते. आम्ही मुख्य गावापासुन दूर रहातो आणि सायकलवरून मामालोकांना घरी यायचे म्हणजे कमीतकमी १० किलोमीटर पेडलींग करावे लागे. मग ते आले की नक्की फर्माईश होणार, 'माई, कॉफी कर की!' त्यामुळे दर मंगळवारी घरी कॉफी होणारच! जायफळ तिच्या हातून कधी जास्त नाही झाले की कधी कमी नाही पडले. साखर, दूध, कॉफी नेहेमी अगदी व्यवस्थीत असे. मी केलेली कॉफी मामालोक लग्गेच ओळखायचे :( तिच्यामुळेच की काय देव जाणे पण मला थोडी स्ट्राँग कॉफी प्यायची सवय झाली. साधारण ७-८ वी मधे असेन मम्मीने माझ्यासाठी नेसकॅफेची बरणी घरी आणली कदाचीत माझ्या हट्टाने पण असेल. त्याआधी ती घरी येतही होती पण माझ्या कधी लक्षातही आले नव्हते. एक कप दूध आणि त्यात अगदी चमचा भरून कॉफी असे मम्मी करुन देत असे रविवारी वगैरे.

कॉफी म्हणले की मला अजुन एक गम्मत आठवते ती म्हणाजे मी मम्मीचा निरोप घेउन एका ओळखीच्या काकुंकडे गेले होते (हा 'प्री टेलीफोन काळ' होता) त्यांच्या 'अतीआग्रहास्तव' मला कॉफी घेणे भाग पडले. काय कॉफी होती म्हणुन सांगु! छोटुसा कप दूध, त्यात १ चमचा (देशात साखरेचा चमचा नावाने एक किल्वर सारखा दिसणारा चमचा मिळतो तो) आणि एखाद्या पदार्थात जितके जायफळ घालू साधारण तेवढी कॉफी! आहाहा काय समिकरण होते! एखाद्याचे कॉफीचे व्यसन सोडवायचे असेल तर हेconcoctionप्यायला द्यावे! तेव्हा मला शोध लागला 'मला स्ट्रॉंग, अगोड कॉफी आवडते.'

साधी कॉफी उकळून करुन नीट प्यायला खूप कंटाळा यायला लागला तेव्हा मम्मीने 'फेटलेली' कॉफी करायला शिकवली. ही अत्ताची रेसिपी मम्मीच्या जायफळ कॉफी आणि फेटलेली कॉफी याचे कॉंबीनेशन -
Coffee+Sugar beaten
१ टेबल्स्पून इंस्टंट कॉफी
१ टीस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त करावी)
३/४ कप दूध (मी १% दूध किंवा सोयामिल्क वापरते)
१/४ कप पाणी
१ चिमुट जायफळ (खिसायचे असेल तर १ वेळा बारीक खिसणीवरून फिरवणे)

कृती - एका लहान पातेल्यात दूध, पाणी एकत्र करुन उकळायला ठेवावे. ते साधरण गरम झाले की त्यात जायफळाची पावडर घालावी. गॅस बारीक करुन दूध उकळायला ठेवावे. त्याचवेळी एका कपमधे कॉफी आणि साखर एकत्र करावी. त्यात साधारण १/२ टीस्पून पाणी घालून स्टीलच्या चमच्याने मस्त फेटायला सुरुवात करायची. पाणी कमी वाटत असेल तर अगदी थेंबभर घालावे. थोड्यावेळाने त्या मिश्रणाचा रंग तयार कॉफी सारखा दिसेल . आत्तापर्यंत दूध पाणी नीट उकळले असेल. ते उकळते दूध अर्धे त्या घोटलेल्या कॉफीमधे घालून नीट ढवळावे. उरलेले दूधही घालून नीट ढवळावे. वरती अगदी पातळ फेसाचा थर येईल.

Coffee is Ready!

टीप - १. एका मैत्रीणीने सांगितलेली टीप म्हणजे दूधात कॉफी घालून दूध उकळायचे नाही.
२. आवडत असेल तर पूर्ण दूधाची कॉफी करायला हरकत नाही.
३. साखर घालायची नसेल तर नुसती कॉफी घोटली तरी चाले पण त्यात १/२ चच्याऐवजी १/४ चमचा पाणी घाला.

This recipe is on its way to Aparna's Think Spice - Nutmeg event

(Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/coffeebreak%21)

Sunday, July 13, 2008

Vegetable cultets as weekend snack!

Vegetable Cutlets


ह्या विकेन्डला cutlets करुन झाले. हाताशी कॅमेरा असल्याने लगेच फोटो काढणे पण जमले. तेच हे फोटो!

कटलेट्सची रेसीपी इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/02/blog-post_08.html

कालवलेले पोहे (Kalavalele Pohe)
Here is my link to English version of this recipe.

साधारण ३ वर्षापुर्वी मी हे पोहे पहिल्यांदा खाल्ले. मी बेंगलोरला माझ्या चुलत बहीणीला भेटायला गेले असताना तुला नवीन वेगळे काय खायला घालू? असा विचार करत तुला कुमठ्याचे पोहे खायला घालते असे ती म्हणाली. तिच्या सासुबाई कुमठ्याच्या आहेत आणि अप्रतिम स्वयंपाक करतात. ती पोहे करत असताना माझे निरिक्षण चालु होते. पातळ पोहे, थोडा गुळ, मस्त ताजे ओले खोबरे, आणि एक लालभडक रंगाचा मसाला. ती या पोह्यात थोडा कच्चा कांदा पण घालते म्हणुन मग तिने मला विचारले सकाली कच्चा कांदा खाशील का? माझे उत्तर होते 'कसे लागते त्यावर अवलंबून आहे!' तिने थोडे कांदा घालून आणि थोडे तसेच बनवले.

मी नेहेमी वापरते/करते त्याहून तो मसाला थोडा वेगळाच होता. त्यात कोल्हापूर/बेळगावकडे मिळणारी ब्याडगी/बेडगी मिरची वापरली होती. या मिरचीचे वैशिष्ट्य हे की तिखटाला एकदम कमी आणि रंगाला एकदम लालभडक अशी असते. एवढेसे तिखट घातले तरी पदार्थ मस्त लाल होतो.

पहिल्या घासालाच मी या पोह्यांच्या प्रेमात पडले. अर्थात मला कांदा न घातलेलेच जास्त आवडले! बहीणीने थोडा मसाला मला बरोबर नेण्यासाठी दिला. पण ती पुडी तिथेच विसरली हे इथे आल्यावर बॅगा उचकल्यावर समजले. तिला फोन करुन रेसीपी विचारली तर तिची उत्तर होते 'मला कुमठ्याहुन येतो!!

त्यावर मी बरेच दिवस हा मसाला कसा करायचा हे शोधत होते. पुढे कधीतरी शिल्पाचा ब्लॉग चाळताना मला तो मसाला सापडला लगेच करून पाहीला! तोच रंग, तीच चव!!
Pohe Masala
तो हा मसाला -
१ कप धने
१/२ बडीशेप
१/४ कप जिरे
४ लवंगा
२ इंच दालचीनीचा तुकडा
३-४ टेबलस्पून लाल मिरची पावडर (ब्याडगीची मिरची पावडर असेल तर थोडी जास्त पण चालेल)
मसाल्याची कृती - तिखट वगळून सर्व जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत. मिक्सरमधे बारीक पावडर करावी शेवटी मिरची पावडर मिसळून कोरड्या बरणीत भरून ठेवावे.

(ही रेसिपी शिल्पाची जशीच्या तशी लिहिली आहे)

KumaTha Pohe


मी पोहे बनवण्यासाठी रेसीपी पण शिल्पाचीच वापरते पण खोबरे थोडे कमी वापरते. ती रेसीपी -
१ कप पातळ पोहे
१/४ कप ओले खोबरे (ताजे किंवा फोझन)
१ टीस्पून गूळ
१ टीस्पून वर लिहिलेला पोहे मसाला
चवीप्रमाणे मीठ

कृती - गूळ १-२ चमचे पाण्यात भिजत ठेवावा. त्यात पोहे मसाला, मीठ, खोबरे घालून नीट मिसळावे. पोहे थोडे कोरडे वाटत असतील तर त्यावर थोडे पाणी शिंपडावे.
(ही कृती पण शिल्पाचीच आहे.)

हे पोहे नुपुरच्या 'MBP July'08: Less is More!' साठी!

Here is my link to English version of this recipe.


Less is More!

Wednesday, July 09, 2008

बीट कोशिंबीर (Beet Koshimbir)

मी अगदी नवीन नवीन स्वयंपाक शिकले होते तेव्हा कोणतीतरी कोशिंबीर कर असे मम्मी सांगायची. त्या सर्वात बीटची कोशिंबीर माझी आवडीची कारण त्याचा सुंदर रंग. मी स्वत: भाजी आणायला गेले की हमखास बीट आणायचेच. त्यावेळी माझे कोल्हापुरला खूप जाणे होत असे. एकदा मामींबरोबर भाजी आणायला गेले तेव्हा उत्साहाने बीट घेउयाकी की म्हणुन घेउन आले. मामीना कौतुकाने कोशिंबीर करुन दाखवली. थोड्यावेळात माझा काका जेवायला बसला. आणि पहिल्याच घासाला लिंबाचे बी, आणि मिरचीचा तुकडा असला तुफान संगम त्याच्या तोंडात झाला! तेव्हापासून बीटची कोशिंबीर केली की मला त्याचा तो विचित्र चेहेराच आठवतो.

अलीकडे माझे खुपच exotic पदार्थ खाउन/ लिहुन झाले तेव्हा एखादा साधा -सुधा घरगुती पदार्थ करुन लिहावा वाटला तेव्हा मला अपसूकच बीटच्या कोशिंबीरीची आठवण झाली.

Beet Koshimbir

२ मध्यम आकाराचे बीट
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
१/२ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ, साखर
मुठभर कोथिंबीर

फोडणीसाठी - १ टीस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, १ हिरवी मिरची चिरुन

कृती - बीट स्वच्छ धुवुन कुकरला एक शिट्टी करून शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढुन मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावे. त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ, लिंबाचा रस घालावा. फोडणीच्या वाटीमधे तेल गरम करुन जिरे, मोहरी, हिंग घालुन ते तडतडले की त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालून गॅस बंद करून २-३ मिनीटे तसाच राहु द्यावा. त्यामुळे मिरची कुरकुरीत होईल. त्यानंतर ती फोडणी खिसलेल्या बीटमधे घालून सगळे नीट मिसळावे. वरून कोथिंबीर घालावी.

टीप - १. बीट शिजवताना खूपवेळ शिजवू नये. थोडे कडक राहीले तरी चालतात.
२. लहान मुलांसाठी ही कोशिंबीर करताना त्यात मिरची घातली नाही तरी चालते.

Thursday, July 03, 2008

वेगन मॅंगो मूस (Vegan Mango Mousse)

Here is English version of this recipe

साधारण ७-८ वर्षापूर्वीची गोष्ट असेल एका मैत्रीणीकडे मॅंगो मूस खाल्ले आणि रेसीपी घेउन, सामान आणुन लगेच करून पाहीले. त्यादिवशी माझी एक मैत्रीण घरी आली होती तिला पण चाखायला दिले. ही माझी मैत्रीण नविन कोणत्याही शाकाहरी पदार्थाची कमीतकमी चव घेण्यासाठी तरी नेहेमी तयार असते. पण तिने ते खाल्ले नाही कारण त्यात जिलेटिन घातले होते. तेव्हा मला प्रथम समजले की जिलेटीन प्राणीजन्य पदार्थ आहे ते. त्यानंतर माझा वेगन जिलेटीन चा शोध सुरु झाला आणि अगार अगार पावडर मिळाली तेअगार अगार पावडर थाई, इंडोनेशियन, व्हीएटनामीज पदार्थांमधे जेलींग एजंट म्हणुन वापरतात. ते सी-वीड पासून बनवलेले असते. पुढे मी प्राणीजन्य पदार्थ खाण्याचे थांबवले तेव्हा क्रीमचीज, कूलव्हीप, व्हिपिंगक्रीम ऐवजी सिल्कन टोफु वापरायला सुरुवात केली. ही रेसीपी माझ्या टोफू न आवडणा-या मैत्रीणी पण आवडीने खातात.

Vegan Mango Mousse

२-३ आंब्याच्या फोडी
१/२ पॅक सिल्कन सॉफ्ट टोफ़ु (साधारण ५-६ औंस)
३-४ टेबल्स्पून साखर
१/२ टीस्पून वेलची पावडर
३-४ केशर काड्या
१ संत्र्याचा रस
१/२ लिंबाचा रस

१/२ कप पाणी
३ टेबल्स्पून अगार अगार फ्लेक्स

कृती - आंब्याचा रस साधारण २ कप होईल इतके आंबे घ्यावेत.
एका लहान पातेल्यात पाणी तापयला ठेवावे. तोपर्यन्त आंब्याच्या फोडी, साखर, टोफ़ु, वेलची पावडर, केशर, संत्र्याचा रस, लिंबाचा रस एका मिक्सरच्या भांड्यात घालून नीट बारीक करून घ्यावे. पाणी उकळले की त्यात अगार अगार फ्लेक्स घालून नीट हलवून गुठळ्या काढाव्यात. त्याला एक उकळी आली की ते गरम मिश्रण मिक्सरच्या भांड्यात (आंब्याच्या मिस्र्ह्रणात) ओतावे. हे पूर्ण मिश्रण आता साधारण २-३ मिनीटे मिक्सरमधून फिरवावे. ज्या भांड्यात हे सेट करायला ठेवायचे असेल त्या भांड्यात ओतावे. ते भांडे साधारणपणे ८-१० तास सेट होण्यासाठी फ्रीजमधे ठेवावे. (फ्रिझरमधे ठेवु नये). वाढतेवेळी पाण्यात बुडवलेली सुरी मूसच्या कडेने फिरवून ताटात उलटे टाकावे. मूस केकप्रामाणे नीट कापता येतो. सर्व्ह करताना एखादी आंब्याची फोड सोबत ठेवावी.

टीप - १. मुळ कृतीमधे क्रीमचीज किंवा कूल व्हीप किंवा व्हीपिंग क्रीम आहे. मी ते खात नसल्याने ती consistency येण्यासाठी मी टोफु वापरला आहे.
२. ताजा आंबा मिळत नसेल तेव्हा २ कप कॅनमधला पल्प वापरायला हरकत नाही.

( Here is the English Version of this recipe which I am sending for 'Mango Mania', a Monthly Mingle Event by Meeta K of 'What's for Lunch Honey?')

कांदे पोहे (Kande Pohe)

ही रेसीपी अभिजीत साठी!
कांदेपोहे हा मराठी माणसाचा आवडता नाष्ट्याचा प्रकार. 'कांदेपोहे' ह्या प्रकाराला मराठी समाजात एक वेगळेच स्थानही आहे.

Cabbage Pohe

१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची पाने
चविपुरते मीठ
१/२ लिंबाचा रस
१ टीस्पून साखर
२ टेबल्स्पून तेल
फोडणीसाठी जीरे, मोहरी, हिंग, हळद
मुठभर चिरलेली कोथिंबीर
२-३ टेबलस्पून ओले खोबरे (वगळण्यास हरकत नाही)

कृती - कांदा शक्यतो बारीक कापून घ्यावा. एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून जीरे, मोहरी, हिंग, हळद घालावे. जिरे-मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता, चिरलेली मिरची घालावी. एखादा मिनीट परतले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा परतत असताना एका बाजुला पोहे नीट धुवुन शक्यतो पूर्ण पाणी काढुन टाकावे. शक्य असेल तर शक्यतो पोहे चाळणीत भिजवावेत. कांदा परतत आला की त्यावर अर्धे पोहे घालावेत त्यावर मीठ, साखर घालून उरलेले पोहे घालुन नीट परतावे. वरून लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर घालून नीट परतावे.

टीप - १. बरेचदा अमेरीकेत दुकानात मिळणारे पोहे एकतर खूप जाड नाहीतर खूपच पातळ असतात. खूप जाड पोहे असतील तर कांदा परतायला घेण्याआधी थोडावेळ आधी भिजवावेत. पातळ पोहे असतील तर अजिबात न भिजवाता सरळ फोडणीत घालून त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडत पोहे करावेत. थोडेफार ओलसर झाले की त्यावर मीठ, साखर आणि लिंबूरस घालून परतावे.
२. मटार, दाणे, बटाटे यापैकी काहीजरीपोह्यात घालायचे असेल तर कांदा परतत आल्यावर त्यात परतवून घ्यावे.
३. बारीक चिरलेला कोबी घालूनही पोहे अप्रतीम लागतात. त्या पोह्यात कांदा नाही घातला तरी चालतो.

Tuesday, July 01, 2008

पालकाची पळीवाढी भाजी (Spinach BhaajI)


Spinach Bhaji


पालकाची पातळ भाजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. ही रेसीपी माझी मैत्रीण रेणुका हिची आहे.

Spinach BhaajI

१ मोठी जुडी पालक
१ मुठ शेंगदाणे
१ मुठ हरभरा डाळ
१-२ टेबलस्पून बेसन
२-३ लाल मिरच्या (२-२ तुकडे करून)
२ पाकळ्या लसूण (ठेचुन)
१ लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
१ लहान खडा गूळ
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी - १ टेबल्स्पून तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग
२-३ कप पाणी लागेल तसे

कृती - डाळ आणि दाणे पाण्यात वेगवेगळे साधारण१ तास भिजत ठेवावेत. दरम्यान पालक नीट धुवुन बारीक चिरुन घ्यावा. साधारण तासाभराने डाळ, दाणे, पालक एकत्र करुन प्रेशरकुकर्मधे १-२ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावा. प्रेशर उतरल्यावर भाजी पळीने नीट घोटुन घ्यावी. त्याला साधरण १-२ टेबलस्पून बेसन लावावे. मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ, घालून भाजी उकळायला ठेवावी. खूप घट्ट झाली असेल तर किंचीत पाणी घालावे. बाजुला फोडणीच्या वाटीत तेल तापवून जिरे, मोहरी, हळद, हिंग, ठेचलेला लसूण घालावा. १ मिनीटानंतर त्यात लाल मिरची घालावी. आणी फोडणीचा गॅस बंद करावा. उकळत्या भाजीवर ही फोडणी ओतुन गॅस बंद करावा. गरम गरम भाताबरोबर अगर चपातीबरोबर खावे.

टीप - १. आवडत असेल तर फोडणीमधे ५-६ काजुच्या पाकळ्या, ५-६ खोब-याचे काप घालायला हरकत नाही. पण ते घालणार असाल तर फोडणीचे तेल साधारण २ टेबल्स्पून घ्यावे.
२. आळुची भाजी अशीच करता येते. त्यात थोडी चिंच अधीक घालावी. आळुची भाजी घेताना त्याच्या देठी पण सोलून बारीक चिरुन घ्याव्यात.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...