Posts

Showing posts from March, 2009

Click 03-2009: Wood

Image
Here is English version of this post - http://vadanikavalgheta.googlepages.com/clickmarch%2709%3Awood


बडगी-मुसळी


Lasun Khobare

मिक्सर, फूडप्रोसेसर्स नव्हते त्याकाळात (?) पाटा-वरवंटा, दगडी खलबत्ता, उखळ-मुसळ, रगडा, जाते हे प्रकार घरोघरी दिसत. आता देखील देशात हे प्रकार पहायला मिळतात पण क्वचित. आमच्याकडे जाते आणि उखळ सोडले तर बाकीचे अजुन आहे. मम्मीला काही काही प्रकार खलबत्त्यातच वाटायला आवडतात त्यातले एक म्हणजे लसुण खोबरे. पण तो जड खलबत्ता देशातून आणणे त्याच्या वजनामुळे शक्य झाले नाही. पण सासरी गेले तेव्हा तिथे अगदी छोटे मुसळ आणि एक लाकडाचे लहान बाऊल हा प्रकार बघितला आणि लगेच बाजारात जाऊन आणला देखील. याला जळगाव भुसावळकडे बडगी (ते बाऊल) आणि मुसळी (लहान मुसळ) असे म्हणातात. लाकडाचा असल्याने हलका आणि त्यामुळे वापरायला सोपा प्रकार आहे. एखादी लसुणपाकळी ठेचायची तरी ही मुसळी वापरता येते.

हा फोटो मात्र घरच्या झाडाचे बदाम फोडतानाचा -

Home Grown Almonds and Musal


This is for Jugalbandi's Click - Wood ....

Kanda Batata Rassa

Image
(Link To Marathi Recipe)

Traditionally Maharashtrian ladies give away something at the Sankranti Haldi-Kumkum. This year I was also invited to Sankant Haldi-kumkum at The Cooker's home. I was little curious to see what snacks she will serve. She had Samosas and Dhoklas Also served some coconut macaroons. She made Orange cake specially for vegan people like me (She has promised she will post the recipe soon :) ). Then I was wondering what will be in the loot bag. May be some fruits, some cool utensils or somethings like that. But then I saw the bag of masalas and I was surprised. It was  gift bag had four small bags filled with different masalas, Kolhapuri Kanda Lasun Masala, Malawani Masala, Kaccha masala and Flax seed chutney.
I wanted to try the masalas immediately but got busy whole of last month and couldn't even open the packs.  Finally I opened it few days ago but did not want to cook anything elaborate. After giving some thought, I decided to try Kanda La…

कांदा बटाटा रस्सा (Kanda Batata Rassa)

Image
(Link to English Recipe)


(left to right in the picture) Kanda Lasun Masala, Kaccha Masala, Malwani Masala, Flax Seed Chutney.

महाराष्ट्रात संक्रांतीच्या सणाच्या हळदीकुंकवाला काहीतरी वाण देण्याची पद्धत आहे. यावर्षी मला पण आमंत्रण होते अशाच एका संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे, द कुकरकडे! तिच्याकडे जाण्यापूर्वी उत्सुकता होती की काय काय खायला मिळणार याचे! एका फूड ब्लॉगरकडे जाण्यात तो एक मोठा आनंदाचा भाग असतो. अपेक्षेप्रमाणे तिने बरेच पदार्थ केले होते फ्रुट पंच, सामोसे, कोकोनट मॅकरून्स आणि बरेच काही. आणि माझ्यासाठी खास केलेला ऑरेंज केक (याची रेसीपी ती देणार आहे असे तिने प्रॉमिस केलेय :) ). खाणे पिणे झाल्यावर पुढची उत्सुकता म्हणजे आता ही वाण काय देणार याची. मला वाटले होते की ती काहीतरी फळ वगैरे देईल किंवा एखादे भांडे असले काहीतरी. पण तिने ४ मसाल्याच्या पॅकेट्सची गिफ्टबॅग दिली. मी एकदम आनंदाने टुण्णकन उडीच मारली. तिने दिलेल्या मसाल्यात कोल्हापुरी कांदा लसुण मसाला, मालवणी मसाला, कच्चा मसाला आणि जवसाची चटणी असे पॅक होते. पण गेला पूर्ण महिनाभर काहीना काही चालू होते त्यामुळे आज्जीबात मसाल्यांना हात…

Mexican Street Food - Corn with Chili lime

Image
Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/cornchililime

साधारण २ वर्षापुर्वीची गोष्ट असेल. मला कामानिमित्त १५ दिवस मेक्सिकोला रहावे लागले होते. तिथे माझ्याबरोबर काम करण्यार्‍यांना फार काळजी पडली होती की ही पूर्ण शाकाहारी बाई इथे कशी जगणार अन काय खाणार. चीज नाही, दूध नाही असले काय मिळेल हिला खायला. पण माझे फार कुठे काही आडले नाही. पपई, आंबे, कलिंगड, चिक्कु, पेरू असली फळे, वेगवेगळ्या प्रकारे नटवलेला मका यावर माझे जेवण पूर्ण होत होते. मी आत्ता लिहितेय ती मक्याची रेसिपी माझी त्या वास्तव्यात रोजच्या खाण्यातली होती. मस्त तिखट-आंबट अशा चवीचे मक्याचे दाणे खायला मजा येते. भारतातल्या प्रमाणे मक्याचे कणीस भाजणे माझ्याकडे गॅस नसल्याने मला शक्य होत नाही. अशावेळी हे दाणे वाटीत घेउन खायला मस्त वाटते. असाच प्रकार पुढे मी भारतात गेल्यावर कॉर्न कॉर्नर मधे पण खाल्ला. तो पण चांगला लागला. पण या कॉर्नला जो मस्त लाल रंग येतो ना तो भारतातल्या कॉर्नला नाही!
Corn With Chili Lime


३ कप पाणी
२ कप मक्याचे दाणे
१ लिंबाचा रस (लाईम वापरावे लेमन नको)
१ टेबल्स्पून लाल तिखट
२ टीस्पून मीठ

क…