Posts

Showing posts from May, 2009

Gavhaachi kheer

Image
(गव्हाची खीर)


Some things in life reminds you of loved ones. And when these are childhood memories or memories of your grandparents its all about nostalgia. I am currently hit by such nostalgic mood as a friend of mine is staying with me. We became good buddies when we were both students here in US and one fine day realized that our moms know each other so much so that our grandmas also knew each other. We were chatting about my hometown and various foods we have eaten there. And that was it. I started thinking my grandma's cooking and whatever she made was so tasty and flavorful. Simplest of simple things she made was my favorites. This kheer was something she made was so flavorful.



1 cup cracked wheat/dalia
2 cups grated jaggery
3 cans coconut milk (14oz/can)
3-4 cardamom pods
3-4 strands of saffron
2-3 tbsp white poppy seeds
1/8 cup dry unsweetened coconut
2-3 tsp ghee (optional)
1 cup water
1/8 cup almonds, cashews and pistachio pieces (all mixed)
10-15 raisins
pinch of turm…

गुळाचा सांजा (Goolacha sanja)

Image
(English Version)
गोड पदार्थ खाण्यासाठी आणि करण्यासाठी फार काही कारण लागत नाही. आज काय घरची आठवण झाली, उद्या काय बरेच दिवसात काही गोड केले नाही असले कोणतेही कारण पुरते. हा सांजा पण असाच कारण नसताना बनवला जातो माझ्याकडे.
आम्हाला गावाकडुन आज्जी बरेचदा घरचे शेंगदाणे, लाल तिखट पाठवत असे. त्याबरोबरच एक लहान पुरचुंडी असायची गव्हाच्या रव्याची. आजीने आणि काकुने घरी सडलेल्या गव्हाचा रवा. मस्त केशरी रंग असे. घरचा गहू काही खुप निघायचा नाही. तिकडे घरच्यापुरता झाला तरी पुरे असा प्रकार होता. पण ज्वढा मिळे त्यात आज्जी सगळ्यांचा वाटा म्हणुन हा रवा तरी पाठवत असे.त्या जाड रव्याचा सांजा अगदी अप्रतीम लागत असे. मम्मी तूप वगैरे घालुन करयची. पण नेहेमी म्हणायची यात तुपाची तेलाची काही गरज नसते. मधे एकदा मला अचानक या सांज्याची आठवण झाली म्हणुन मग लगेच करुन पाहीला. छानच झालेला. मला एका मैत्रीणीने यात सुंठ घातली की छान लागतो असे सांगितल्यावरुन मग सुंठ घालुन केला. एकदम मस्त लागला.

Godacha sanja


पॉटरी क्लासला गेले कित्येक वर्षे जातेय. प्रत्येक भांडे करताना वेगवेगळे इन्स्पिरेशन घेउन बनवले जाते. मात्र हे भांडे रंगवतान…

नवलकोलची भाजी (Kohlrabi Sabji)

Image
नवलकोलची भाजी मी पहिल्यांदा बेळगावला आज्जीकडे पाहिली तेव्हा काकु विळीवर आपण खोबरे जसे खवणतो तशी खवणत होती. मला आधी वाटले की शहाळे आहे की काय इतका कोवळा पांढुरका रंग होता. त्या खवणलेल्या नवलकोलची पहिल्यांदा आवडीने खाल्ली देखील.ही भाजी आमच्या गावात मिळणे मात्र थोडेकठीण होते. कधीतरी कोल्हापुरला गेल्यावर मम्मी किंवा मी आणत असु.. बेळगावहुन आणायच्या भाज्यांमधे देखील ओले काजु, बारिक मटारच्या शेंगा (याचेच पुढे काळे वाटाणे होतात), नवलकोल आणि बारिक मसूर हमखास ठरलेले. भरतातून इथे आल्यावर एकदा आवडीने आणली ही भाजी आणि मम्मी करते त्या पद्धतीने डाळ घालून करुन पाहिली. पण का कोण जाणे थोडी उग्र लागली. त्यामुळे पुढे आणणे बंदच केले.
Purple Kohlrabi
अलिकडे मी CSA चा शेअर घेतला आहे. त्या लिस्टमधुन भाज्या निवडतना Purple Kohlrabi दिसले. रंगामुळे ऑर्डर देखील केले. पण हा प्रकार आतुन पांढराच निघाला. पण चवीला मात्र खुप उग्र नव्हता. एकदा नेहेमीप्रमाणे मुगाची डाळ घालुन भाजी केली. खुप ग्रेट नाही पण अगदीच वाईटदेखील नाही अशी झाली.नंतरच्यावेळी ऑर्डर केली तर डाळ भिजवयला विसरले होते म्हणुन मग चक्क पंचफोरण घालुन केली आणि ए…

कलौंजीवाली दाल (Masoor Dal with Kalaunji)

Image
अलिकडे ET च्या ब्लॉगवरची दुधी भोपळ्याची भाजी करुन पाहिली आणि मी पण कलौन्जीच्या प्रेमात पडले. हे प्रियाला सांगितल्यावर तिने सहज मला बंगाली पद्धतीची कलौंजी घातलेली मसुरडाळ तिची रूममेट बनवते असे सांगितले. मोहरीच्या तेलाची कलौन्जी घातलेली फोडणी असते या व्यतिरिक्त तिने मला काही सांगितले नाही. डाळीत बिघडून काय बिघडणार आहे असा विचार करुन मी डाळ करायची ठरवले. तेव्हाच ET च्या ब्लॉगवरची ही बंगाली डाळही वाचली होती. मी त्या दोन्हीचे काँबिनेशन करावे असा विचार केला. पण बाऊलला कडेने लिंच्या चकत्या लवल्या तर ती डाळ लगेचच संपवावी लागते परत गरम करता येत नाही असेही तिच्या ब्लॉगवर वाचले होते. म्हणुन मग मी लिंबाचा रस त्या डाळीत घालावा असे ठरवले. तयार झालेली डाळ किनवा बरोबर अप्रतीम लागली. आता आम्हाला ही साधी डाळ प्रचंड आवडायला लागलेली आहे. माझी रेसिपी पुर्णपणे बंगाली नसेल/नाही कदाचित पण Bengali Inspired नक्कीच आहे ....

Masoor Dal with Kalaunji

१ कप मसूर डाळ
१ टीस्पून कलौन्जी
१/४ टीस्पून हळद
२ सुक्या लाल मिरच्या
२ ओल्या लाल मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ टीस्पून तेल (ऑलिव,कनोला, सफोला कोणतेही चालेल)
१ टीस्पून मोहरीचे तेल…