Posts

Showing posts from February, 2009

स्पॅगेटी (Spaghetti)

Image
Here is English Version of this Recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/spaghetti


इटालियन रेस्टॉरंटमधे गेले की बरेचदा एकाच प्रकारचा टोमॅटो सॉस घातलेला पास्ता खाणे चिड आणणारा आहे. कित्येक पुस्तकांमधे इतक्या सुंदर सुंदर शाकाहारी पास्ता रेसिपीज असताना हे चेन रेस्टॉरंटवाले फक्त हे असले सॉस मधे डुंबणारे पास्ता नूडल्सच का विकतात हे मला पडणारे एक कोडे आहे. माझ्यापरीने मी स्वतः बर्याच भाज्या घालुन पास्त्याचे बरेच प्रकार करते. बेसील पेस्तो, सनड्राईड टोमॅटो पेस्तो, रोस्टेड बेलपेपर सॉस असे बरेच काही. त्यातलाच हा एक सोपा प्रकार -

Spaghetti

३ भाग स्पॅगेटी *
४ टोमॅटो
१/२ कप मटारदाणे
१/४ कांदा
१ गाजर (किंवा ५-६ बेबी कॅरट्स)
१ पाकळी लसुण
१/२ टीस्पून इटालियन हर्ब मिक्स **
मीठ, मिरपूड चविप्रमाणे
१ टेवलस्पून तेल
१ टेबल्स्पून पाईन नट्स
५ कप पाणी

कृती - एका मोठ्या पातेल्यात पाणी घेउन एक चिमुट मीठ घालून उकळी येउद्या. त्यात स्पॅगेटी नूडल्स घालून शिजुद्या. नूडल्स शिजलेले पाणी १ कप बाजुला ठेवुन बाकीचे चाळणीतून गाळुन नुडल्स बाजुला ठेवा. दरम्यान ३ टोमॅटो बारिक चिरुन घ्या. एक टोमॅटो उभा चिरुन बाजुला ठेवा. कांदा उभा क…

आंबट बटाटा (Sour Potatoes)

Image
कोकणी, केरळी, आणि बंगाली पदार्थांबद्दल मला अतिशय आकर्षण आहे. त्यातल्या त्यात रोजच्या भाज्या वगैरे तर खुपच. मासे खात नसुन देखील मी त्या रेसिपीज वाचते कारण ते करण्याची पद्धत वाचायची उत्सुकता असते. माझ्या एका मैत्रिणीचा, प्रियाचा, मला अतिशय हेवा वाटतो त्याचे एकमेव कारण म्हणजे तिची रूममेट बंगाली आणि जवळचा मित्र मल्याळी आहे. एकाहुन एक सरस पदार्थ तिला पहायला आणि चाखायला मिळतात. खोब-याचा खुप वापर करतात वगैरे कितीही खरे असले तरी एखादेवेळी खाण्यासाठी मला हे पदार्थ आवडतात. असाच एक ब्लॉग सापडला मला - अश्विनीचा -बर्याच कोकणी रेसिपीज आणि मस्त फोटो. एकदम प्रेमातच मी! हळुहळु एकेक पदार्थ करायला लागले. तिने बरेच दिवसात काही लिहिले नाही म्हणुन तिला इमेल देखील पाठवले.त्यातच मला रसचंद्रिका नावाचे एक पुस्तक मैत्रिणीकडुन मिळाले मग काय सपाटाच लावला मी हे पदार्थ करायचा. ही रेसिपी पण अश्विनीची आणि रसचंद्रिका मधुन बघुन जे पटेल ते घेउन केली आहे.२ मोठे बटाटे
१/४ कप ओले खोबरे
१ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हळद
चविप्रमाणे मीठ
लहान खडा गूळ
१ टीस्पून जिरे
२-३ लाल मिरच्या (चविप्रमाणे कमी जस्त करायला हरकत नाही)
२ टीस्पून मेथ्…

Stuffed Eggplants (Maharashtrian Style)

Image
(Link to Marathi Recipe)


I am from West Maharashtra and live on coasts of river Krishna. The area is very famous for its eggplants. Dark purple in color and various sizes of eggplant or brinjals, as they are know in British English, are amazingly tasty. Another variety is light green with white spots is popular in Kolhapur and Sangli region. People have long debates about what kind is more tastier but for me any kind is the best specially after going from US. I grow eggplants in my backyard and they come out well and even tastier that what we get here in Indian stores.


This stuffed eggplant recipe is very popular among my friends. I love making it for them as that is the only time I make them. I add few stuffed baby potatoes with the eggplants for my 'non brinjal eating' friends. I somehow find this very easy to make for masses. I roast peanut, sesame, and dried coconut and grind together and use 1 tbsp of the mixture for 1 small eggplant. Proportion of sesame and peanuts var…

Just For You!

Image
Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/stuffedeggplants(maharashtrianstyle)

Bhakri, VangyachI bhaji, Chutney

आमच्या एका मित्राला, संदीपला, भरल्या वांग्याची भाजी खुप आवडते पण वृषाली, संदीपची बायको, वांग्याचा कोणताही पदार्थ् खाऊ शकत नाही. तिला भाकरी खुप आवडतात पण तो भाकरी कशीबशी खातो. त्या दोघाना खुष करण्यासाठी मधे एकदा भरल्या वांग्याची भाजी आणि भाकरी असा बेत केला होता. काल अचानक आलकाच्या Just For You! event ची announcement पहिली म्हणुन मराठीमधे असलेली रेसिपी इंग्लिशमधे केली आणि आता Just For You! साठी पाठवत आहे.


मुळची मराठी रेसिपी इथे आहे - http://www.vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_7214.html