Posts

Showing posts from August, 2011

घोळीची भाजी (GhoLichi Bhaji)

Image
देशात घोळीची भाजी ही पावसाळ्यानंतर कधीकधी बाजारात दिसते. इथे मात्र फार्मर्स मार्केट सुरु झाले की हमखास मिळते. याचे इथले एक कॉमन नाव म्हणजे 'Pigweed'

घोळीची भाजी एक जुडी
१/२ वाटी मुगाची डाळ
कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे
तेल, मीठ, दाण्याचे कूट, फोडणीची साहित्य

मुगाची डाळ भिजत घालावी.
घोळूची भाजी निवडून पाने आणि कोवळे देठ घ्यावेत. भाजी धुवुन निथळत ठेवावी.
तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करून त्यात मूगाची डाळ परतावी, किंचीत पाण्याचा हबका मारून झाकण लावून अर्धवट शिजू द्यावी.
धुतलेली भाजी, मीठ, कांदा लसूण मसाला घालून नीट परतावे.
पुन्हा झाकण घालून भाजी नीट शिजवावी .
शेवटी दाण्याचे कूट मिसळून एक वाफ काढावी.

घोळीची भाजी अशी दिसते -

अवांतर माहिती - आमच्या भागात घोळूची भाजी विकायला फारशी येत नसे पूर्वी . कारण ह्या भाजीची वेगळी लागवड केली जात नाही. शेतात तण म्हणुनच उगवलेले असते तेच शेतकरी काढून आणून भाजी करतो.
भाजीला कधीकधी थोडासा अंबटपणा असतो तसेच भाजीला भेंडीसारखी तार असते पण तेवढ्या प्रमाणात नाही.

ह्याचीच ताकातल्या पालकाप्रमाणे पण भाजी होते. तसेच पातळ डाळमेथी असते …

Its raining cherry tomatoes!!!

Image
I have planted all colors of cherry tomatoes this year -- red, yellow, orange. I am getting basketful of tomatoes almost every couple of days in past few weeks.


I have very pleasant memories of cherry tomatoes from my childhood. After my grandfather retired they moved to Kolhapur in their own home. I visited them frequently. The house was small but there was a huge yard in the front. They planted peanuts, maize, some other vegetables and a few tomato plants which would yield baby tomatoes. I remember spending hours and hours playing in the yard around these vegetables. I even have pictures of me playing in the maize plantation! Once in a while my great grandfather would come and visit us. He would hold my hand and we would go around the vegetable patch and pluck okra or cucumbers. He would pull a peanut vine and check if the peanuts are ready. He would share a couple of those fresh peanut pods with me. I still remember smell of the freshly pulled peanuts. At the end of our stroll we …

घेवड्याची भाजी

Image
English version here - http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/08/ghevadyachi-bhaji.html

मम्मीची ही साधी सोपी रेसिपी आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची आहे. करायला सोपी, चवीला एकदम झक्कास  मम्मी हि भाजी अशी करते.
पाव किलो घेवड्याच्या शेंगा
१ लहान कांदा
२-३ लसुण पाकळ्या
२-३ टेबलस्पून दाण्याचे कुट
चविप्रमाणे कांदा लसुण मसाला, मीठ
फोडणीसाठी - तेल(२-३ टेबलस्पून), जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
कोथिंबीर कृती:  १. घेवड्याच्या शेंगांचे कडेचे धागे, दोन्हीबाजुची टोके काढुन टाकावेत. शेंगा उघडून नीट तपसाव्यात कारण यात कधी कधी आळ्या वगैरे असतात.
२. सोललेल्या शेंगा धुवुन निथळून बारिक (१/२ सेंटीमीटर जाडी) कापाव्यात.
३. कांदा बारीक कापावा. लसूण बत्त्याने ठेचुन घ्यावा.
४. तेलात नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यावर मंद आचेवर कांदा परतावा.
५. कांदा परतून झाल्यावर त्यात लसुण घालुन एखादा मिनीट परतावे.
६. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून साधारण ४-५ मिनीटे परतावे.
७. त्यावर अगदी एखादा पळी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवुन शिजण्यास ठेवावे.
८. अर्धवट शिजले की त्यात कांदा लसूण मसाला घालावा. नीत मिसळावे आणि उरले…

Ghevadyachi Bhaji

Image
Marathi version here - http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/08/blog-post_23.html

Ghevada is very generic name in Maharashtra for any kind of bean. Shravan Ghevada is one kind of green beans which yields speckled red kidney beans. Hyacinth beans are commonly known as Kala Ghevada. Val papadi is another variety of Kala Ghevada. There are another varieties like pawata, gode wal, kadave val. Same genus but different species. There are two very different looking beans in this family, one is called Chardhari Ghevada(Winged Beans) and other is known as Abai Babhaee(Sword Bean).
These beans start appearing in small town markets around diwali time. We all used to look forward to all these bean types. Every year mummy used to plant kala ghevada seeds near compound. She would water, remove weeds around it, help it grow on the wires. Once the vine grows it starts yielding beans in bunches. Mummy used to make sabji almost every week and we never ever got tired of eating it. Mummy still make…

साबुदाण्याच्या पापड्या - १ (Sabudanyachya Papadya)

Image
आत्ता ऊन आहे तर आत्ता लगेचच पापड्या करायच्यात असे कधी उन्हाळ सामानाचे होते का? त्याला कसं मस्तपैकी ऊन पडलं पाहिजे ३-४ दिवस सलग! मग आजुबाजुच्या बायका/मुली नक्की कशाचा घाट घालणार आहेत याचा आढावा घ्यायचा. उद्या दिवसभरात नक्की कोणती कोणती कामे मार्गी लावायची आहेत याची यादी करायची. हे सगळे केल्यावर मस्तपैकी चहा करून घ्यायचा आणि दुसर्‍या दिवसाचा परत एकदा आढावा घ्यायचा. रात्रीचा स्वयंपाक करून जेवणे झाल्यावर शांतपणे २ कप साबुदाणा स्वच्छ धुवुन पाण्यात भिजत घालायचा.
आता गेल्यावर्षी जपून नीट ठेवलेले प्लास्टिकचे पेपर्स हुडकायला लागायचे. अगदी जपून ठेवलेले असल्याने ते सापडायला उशीर व्हायला लागतो तसे मगाशी कशाला उगीच चहा पित बसलो त्याऐवजी हे काम केले असते तर बरे म्हणुन स्वतःलाच शिव्या घालायच्या! हे सगळे चालू असताना सकाळी ५ ला उठायचेय याची आठवण होऊन स्वतःला अजुन थोड्या शिव्या घालत भराभरा सगळा पसारा अजुन एकदा उलटपालट करायचा! आता पापड्या घालायला बारक्या बारक्या दुधाच्या पिशव्या/Ziplock कापत बसाव्यात का असला तुफान विचार चालू असताना पिशव्यांचे अगदी जपून ठेवलेले गाठोडे हातात येते. मग पहाटे ४ चा एक, ४.३० …

Mummy's Garam Masala

Image
My mother is a great cook and makes almost everything from scratch at home. That includes making festival specials like puran poli, chakali, chirote, chivda, karanji. It also includes making yearly supply of Garam Masala and Mixed Chutney Masala which is also known as Kanda Lasun Masala in Maharashtra. She has her list of ingredients that she has inherited from her mom and her mom-in-law. Both my grandmothers were excellent cooks and mummy tells me both shared various cooking tips with her. She combined both the lists and made her own proportions per her taste and started making her own variety many many years ago.

She makes this masala just after Diwali when the weather is a bit cold.  She had her own sewing business so she would be very busy with sewing orders before Diwali. But she had some time to spare after Diwali so she would plan to make the masala then. That habit continued even after she stopped her business. She starts out with the list of ingredients and goes to shop arou…

फोटोफिचर - खानदेशी वांग्याचे भरीत

Image
Photo Feature - Khandeshi Vangyache Bharit)

आमची देशात जायची वेळ झाली की दोन्ही घरांमधे(माहेरी आणि सासरी) आमच्या येण्याची जंगी तयारी सुरू होते. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त पदार्थ कसे खाऊ घालता येतील असा प्लॅन केला जातो. त्यात पुरणपोळी, गुळपोळी, करंज्या, चिरोटे असले गोडाचे पदार्थ तसेच डाळ-बट्ट्या, फुनके/वाफोले-कढी, भरित, कळ्ण्याची भाकरी, गव्हाचा चिक, ज्वारीची दिंडे असे बरेच तिखट पदार्थ लिस्ट मधे असतात. त्याचबरोबर मी कोणासाठी काय काय करून घालायचे याचीही लिस्ट घरी तयार असते.
२-३ वर्षांपासून सासूबाईंना संधिवात झाला आहे त्यामुळे धाकटी जाऊ सगळे करते. पण काही काही पदार्थांमधे मात्र त्यांचाच हात लागतो त्यापैकी महत्वाचा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत. खानदेशी लोकांना त्यांची वांगी, वांग्याची भाजी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचे भरीत अतिशय प्रिय असते. अस्सल खानदेशी माणूस गॅसवर भाजलेल्या वांग्याचे भरीत, तुरकाट्यांवर भाजलेल्या वांग्याचे भरीत आणि गोवर्‍या-लाकडावर भाजलेले भरीत यांच्या वेगवेगळ्या चवी व्यवस्थीत ओळखू शकतो. प्रत्येक घरची करण्याची पद्धत थोडाफार फरक सोडला तर जवळजवळ सारखीच. दुपारच्या…