Tuesday, March 13, 2012

स्टील कट ओट्सचा पोंगल

English version of recipe.
काही दिवसांपूर्वी माझ्याकडे अचानक २ डबे स्टील कट ओट्स आले. एकदा करून खाल्ल्यावर ते आवडले देखील. मी आता ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून जवसाची चटणी घालून खाते कारण मला गोड सिरिअल्सचा कंटाळा येतो. आता ते मला आवडू लागलेत. परवा एकदा पोंगल करायचा होता पण ब्राऊन तांदूळ संपलेला होता. मग या ओट्सचा करून पाहिला हा पण एकदम आवडून गेला. मी हा पोंगल असा केला होता -


Oats Pongal१/२ कप स्टील कट ओट्स
१/२ कप सालीसहीत मुगडाळ
१०-१२ काजू
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१ टीस्पून जिरे
३-४ मिरे थोडेसे ठेचून किंवा बारीक करून
२ टेबलस्पून तेल
३-४ हिरव्या मिरच्या
१०-१२ पाने कढीपत्ता
चवीप्रमाणे मीठ
लागेल तसे पाणी

कृती - 
ओट्स आणि डाळ एकत्र करून स्वच्च्ह धुवून घ्यावी. थोडे मीठ आणि २ कप पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. साधारण २० मिनिटे लागतील.
कुकर थंड होऊ द्यावा.
जाड बुडाच्या काढीत तेल तापवून जिरे, कढीपत्ता, चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात काजू, एखादी टीस्पून उडीद डाळ घालून गुलाबात रंगावर भाजावेत.
चिरलेले आले, आणि मरे घालून एखादा मिनिट परतावे.
शिजवलेले ओट्स-डाळीचे मिश्रण नीट घोटून फोदानेवर ओतावे. त्यात आवडीप्रमाणे मीठ घालून मिसळावे. गारण असेल तर थोडे पाणी घालावे.
आता झाकण ठेवून ३-४ मिनिटे बारीक आचेवर ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावे.
गरम गरम पोंगल चटणी किंवा लोणच्याबरोबर खावा.

टीपा -

  1. साधे पटकन शिजणारे ओट्स मिळतात ते वापरले तरी चालतील पण मग शिजवण्याचा वेळ कमी जास्त करावा. 
  2. तांदूळ, डाळ आणि ओट्स सामाप्रमाआत घेऊनही हा पोंगल करता येतो. Bookmark and Share

1 comment:

  1. Your pongal looks so cute in the kulhads :) This is a wonderful brunch idea, I made it yesterday. It's very comforting. I always have steel cut oats in my pantry, so I'm going to make this often.

    ReplyDelete

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...