Sunday, July 29, 2012

बिबडे - खानदेशी ज्वारीचे पापड (BibaDe)


उन्हाळ्याची वाळवणे करायची म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का महाराजा! कडकडीत उन्हाळ्यात मस्त गरगर फिरणार्‍या पंख्याच्या वार्‍यात गारगार सरबत प्यायचे, आंबे खायचे असले सोडुन असले उद्योग करायचे म्हणजे खाण्याची-करण्याची जबरदस्त आवडच पाहीजे! त्यातुन 'आता काय सगळे विकत मिळते' असल्या जमान्यात तर घरी पापड, कुरवड्या, सांडगे, अमके तमके करणार्‍याचे खरोखर पायच धरायला हवेत!
लहान गावांमधे अजुनही हे उन्हाळकामांचे उद्योग केले जातात. माझी जाऊ अशीच एक उद्योगी प्राणी आहे. खानदेशातल्या तापत्या उन्हात, लोडशेडींगच्या खेळात, पाण्याच्या बेभरवशाच्या कारभारात ती वर्षाचे बिबडे, साबुदाण्याच्या चकल्या, सांडगे असले उद्योग करते. गेल्यावर्षी तिने केलेल्या बिबड्यांच्या काही फोटो काढले, त्याचे हे फोटोफिचर!

बिबडे म्हणजे खानदेशी पद्धतीचे ज्वारीचे पापड. पण ज्वारी दळून आणली आणि पापड केले असा साधा हिशोब नसतो त्याचा!
५ किलो ज्वारीचे बिबडे करावे लागतील यावर्षी अशा साध्या सोप्या वाक्याने सुरु झालेला हा कार्यक्रम पुढे काय काय वळणे घेतो ते पाहू!
आपण असे करू, एकावेळी दोन-अडीच किलोचेच रवण करू!
रवण म्हणजे काय? मला वरण माहिती फक्त भातावरचे.
आहो रवण म्हणजे पीठ, इडलीचे पीठ म्हणजेच इडलीचे रवण!!
बरं! आता पहिले काय करायचे?
ज्वारी मापून घ्यायची आणि पाण्यातून काढायची.
पाण्यातून काढायची म्हणजे काय?
भांड्यात पाणी घ्यायचे त्यात ज्वारी घालायची. थोडे धुवुन घ्यायचे आणि पाणी ओतून टाकायचे.
केले, आता पुढे काय?
हा ती तिथं साडी ठेवलीय ना? त्यात ही ज्वारी घट्ट बांधायची आणि ठेवायची २ दिवस.
उबदार जागीच ना?
हो हो!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दोन दिवस गेल्यावर आता ते गठूळं सोडायचं आणि न्यायचे चक्कीवर रवाळ दळायला!
हो पण चक्कीवाला कुरकुरत नाही का ओलसर ज्वारी दळायला.
कशाला कुरकुरेल? त्याची वेगळी असते ही चक्की आणि नाही म्हणला तर त्याचा धंदा होईल का? उन्हाळ्यात सगळांच्या घरची असली दळणं येणार त्याच्याकडं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जरा दुपारी बसून त्या दळणातला कोंडा पाखडून ठेवुयात.
मग उद्या पापड का?
उद्या कसे होतील लगेच? अजुन चार दिवस लागणार!
ऑं चार दिवस??!!??
मग काय तर!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता ही भरड एका पातेल्यात भिजत घालायची. आणि अर्धा किलो गहू वेगळे एका पातेल्यात भिजत घालायचे.
गहू पण?
गहू नाही वापरायचे, पण त्याचा चिक काढुन वापरायचा!
बापरे! तो पण उद्योग करावा लागणार का मग?
मग पिठाला चिकटपणा यायला करावे लागते ते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तीन दिवसांनंतर, पहाटे 5 वाजता -
बडीशेप, तिळ, जिरे एका भांड्यात काढून घेतले का?
हो सगळे तयार आहे. मिरची-लसूण वाटून गोळा तयार करायचा. अडीच किलोचे पीठ आहे त्याला साधारण वाटीभर लागेल.
वाटीभर खूप नाही का होणार?
वाळून कमी होते तिखट त्यामुळे नाही होणार जास्त.
गव्हाचा चीक काढून तयार आहे.
ज्वारीचे मिश्रण, गव्हाचा चीक एकत्र करून घ्यायचे. मोठ्या चमच्याने, किंवा हातानेच सगळे मिसळावे लागेल. त्यातच चावीपप्रमाणे मीठ, आणि काढून ठेवलेले बडीशेप वगैरे घालायचे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पीठ मिसळून होईपर्यंत, पिठाच्या मापाच्या दुप्पट पाणी उकळायला ठेवायचे.
अर्धा तास सगळे एकत्र केल्यानंतर मिश्रण साधारण इडलीच्या पिठासारखे होते.
या पिठाला म्हणतात रवण! तोवर पाण्याला पण उकळी आलेली असते. त्यात हळू हळू रवण ओतायचे एक जण ओतत असताना दुसऱ्याने हलवत राहावे लागते नाहीतर गुठळ्या होतात.
आता शिजायला ठेवायचे का?
हो,  हलवत हलवत सगळे शिजवायचे, साधारण 2 तास तरी लागतात सगळे शिजायला.
2 तास?? पण पीठ तयार आहे हे कसे ओळखायचे?


पीठ शिजत येईल तसे घट्ट होते. आपण कापडावर थालीपीठ थापतो ना तसे एखादे थापून पहायचे. हाताला थोडे थोडे पाणी लावायचे. नीट हाताला न चिकटता थापले गेले म्हणजे पीठ तयार आहे.
मग आता सगळा सरंजाम गच्चीवर न्यायाचा का?
हो!  काल रात्री पोळपाट, साध्या पंचे सगळे वर नेऊन ठेवलेय ना? आज फक्त आता थंड पाण्याचे तांबे, पळ्या आणि शिजवलेले पीठ घेऊन वर जायचे.
चला मग!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पोळपाटावर एक पंचा ओला करून पसरायचा. त्यावर साधारण 2 पळ्या पीठ घेऊन ओल्या हाताने थालीपीठासारखे थापायचे.

पूर्ण एकसारखे थापून झाले की बाजल्यावर पसरलेल्या साडीवर पंचा उलटा करून सोडवून घ्यायचा. बिबडा  साडीवर निट पसरला जाईल हे पहायचे.

असे सगळे पापड करायचे. पीठ गरम गरम असे पर्यंत मस्त बिबडे थापले जातात. एकदा का ते थंड झाले ली मग जाड जाड होतात.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~साधारण 9-9.30 पर्यंत सगळे बिबडे घालून होतात. उरलेले पीठ सर्वांना दाणे, तेल घालून खायला द्यायचे. एखाद्या लहान्याला दर तासाने वर पाठवून कावळे वगैरे पापड पळवत नाहीत ना ते पहायला लावायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळी 5 च्या दरम्यान सगळ्या बिबाड्यांवर गार पाणी मारायचे, थोडावेळ भिजू द्यायचे. एक एक बिबडा  हाताने साडीपासून अलगद सोडवून घ्यायचा.  प्लास्टिक कागदावर पसरायचे. सगळा सरंजाम घरात आणायचा.
सकाळी परत सगळे उन्हात पसरायाचे.

बिबडे खडखडीत वाळायला 3-4 दिवस मस्त उन द्यायचे.

10-12 पापड एकत्र करून दोरीने, कापडाच्या तुकड्यांनी बांधायचे. मोठ्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


लागेल तसे विस्तवावर भाजून खायचे!

Bookmark and Share

Monday, July 23, 2012

Fresh Black Eyed Peas Usal

Every year I look forward to summer here as if its my first summer in this country. Farmers markets are one of the most important reason. I just love to see the bounty summer has to offer. In past few years I have shared recipes of simple recipes of various leafy greens and other vegetables like long beanshyacinth beans. Matured long beans yield fresh black eyed peas. As a kid mom used to wash and give these pods to me and bother to eat. We would spend hours peeling these and eating the fresh and tender beans. Here the beans are bigger and much easy to peel than in India.

Mom makes various curries with these but this one is my most favorite. This is very versatile recipe like all her recipes. 


Black Eyed Peas in Pods
Long bean pods flaunting the tender beans. 

Fresh Black Eyed Peas
Fresh back eyed peas, ready to be used.

You will need - 
2 cups of Fresh Black Eyed Peas
1 Medium Sized Onion
2 tsp Red Chili Powder (or per taste)
2 tbsp Fresh Coconut
Small piece of Ginger
2-3 Cloves of Garlic
6-7 Stalks of Cilantro
Salt per taste
2-3 Amsool 
1 tsp Jaggery (optional)
For Tempering - 2 tsp Oil, 1/2 tsp Mustard seeds & Cumin seeds, Pinch of Turmeric & Hing, Few curry leaves
Water as needed

Preparation - 
Finely dice onion. Grind coconut, ginger,  garlic, and cilantro into fine paste.
Heat oil in thick bottom pan. Add mustard seeds, cumin seeds. Add hing and turmeric when the mustard seeds start spluttering. Add curry leaves and sauté just for few seconds. 
Now add chopped onion and sauté until translucent. 
Now add black eyed peas, saute for 3-4 minutes. 
Add 1 cup of water. Cover and let the beans cook partially.*
Add ginger-garlic-cilantro-coconut paste, garam masala and red chili powder and salt. Mix well.
Now let the beans cook completely and then add amsool and jaggery. Boil it for a minute. 
This usal is not dry, it has little bit of watery curry. Enjoy with rice or chapati or bhakari. 

Fresh Black Eyed Peas Usal

Tips - 

  1. *If you are in a hurry, wash and pressure cook the beans for 5-7 minutes with just 2-3 tbsp water. 
  2. Same recipe can be used with fresh lima beans, fresh pigeon peas, fresh garbanzo beans, and fresh hyacinth beans.भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...