कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhaji - Onion Fritters)

(Link to English Recipe)

Enjoy

१ मोठा लाल कांदा
तिखट, मीठ - चवीप्रमाणे
बेसन अंदाजे लागेल तितके
तेल तळण्यासाठी लागेल तितके
किMचीत हळद
असेल तर चिमुटभर ओवा
मुठभर कोथींबीर

कृती -
कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० मिनीटे बाजुला ठेवावे. १० मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.

टीप - १. ह्या भजीला खेकडा भजी असेही म्हणतात.
२. पीठ भिजवताना पाणी अजिबात वापरु नये.
३. शक्यतोवर लाल कांदा वापरावा. निदान पांढरा कांदा वापरु नये.
४. ही भजी कुरकुरीत होण्यासाठी सोडा घालायची गरज नाही. सोड्याने भजी तेलकट होतात.

Comments

  1. एक महत्वाचा आयटम राहीलाच की; ही सुंदर भजी तयार झाली की गॅलरीत बसून background ला अप्रतिम गाणी लावून पाऊस बघत बघत गट्ट करायची...

    ReplyDelete
  2. आई गं! वाचूनच तोंडाला पाणी सुटलं... :) पुढच्या आठवड्यात पाहुण्यांसाठी अपेटायझर म्हणून नक्की करणार!

    ReplyDelete
  3. Do you know hoe to prepare "Panagi"? If yes, pl drop the receipe...

    ReplyDelete
  4. Samved:
    तांदळाचं पीठ दुधात भिजवायचं. साधारण सैलसर. थालीपिठाएवढे घट्ट नाही आणि धिरड्याएवढे पातळ नाही. थोडी चवीपुरती साखर आणि दाणाभर मीठ. मग केळीच्या पानावर डावेनं वा चमच्याने नीट पीठ पसरून घ्यायचं. त्याच्या जाडीचा अंदाज तुला असेलच. मग त्या पिठावर दुसरं केळीचं पान थापायचं / झाकायचं. आणि तापलेल्या तव्यावर टाकायचं ते सगळं प्रकरण अलगद. केळीचं पान साधारण करपलं की तसंच उलटायचं आणि दुसऱ्या बाजूनं तसंच भाजून घ्यायचं. मग पानं काढून एकदा तव्यावर शेकून घ्यायची पानगी दोन्ही बाजूंनी. आणि खायची! फोडणीच्या मिरचीसोबत!!! एक केळीचं पान दोनदातरी वापरता येतं.

    ReplyDelete
  5. संवेद - :D

    प्रिया, मला नैवेद्य दाखव!!!

    मेघना, thank you!!!

    ReplyDelete
  6. काय गती असते काही काही लोकांना सगळ्या विषयात..मेघना मॅडम..hats off!!
    मिंट्स- माझ्या डोळ्यासमोर कुणीतरी खरंच नैवेद्य दाखवत असल्याच चित्र आलं. नारळ मात्र आम्ही नेमधरुन पायावरच फोडतो बरं का:)

    ReplyDelete
  7. varil kanda bhaji kartana sadharan davbhar tandulache peeth tyaat ghatale,ter bhaji adhik kurkyrit hotaat :)

    ReplyDelete
  8. anagha - agadi barobar. mummy pan ghalate.

    ReplyDelete
  9. कहर छळ पोस्ट आहे ही! आता उद्या हाणलीच पाहिजे ही भजी! :-)
    माझा अगदी प्राणप्रिय पदार्थ आहे हा! धन्यवाद, मिनोती!

    ReplyDelete
  10. i like it ...it is very testy ...

    ReplyDelete
  11. मस्त एकदम.... पण तळताना मध्यम, कमी कि जास्त आच ठेवायची?

    ReplyDelete
  12. I make kanda bhaajis just the same way.... have not made in ages though... i dropped in your blog while I was looking for Kairachi Daal ... pan bahi pahun jast maja aali :) keep posting

    ReplyDelete
  13. Namaskar tumache likhan mahitipurn aani vachaniy mhanun aavadte.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.