सात कप बर्फ़ी (Seven Cup Barfi)

एकदा बेळगावला गेले असताना आज्जीने एक वेगळी बर्फी खायला दिली. चव अप्रतीम होती. तेव्हा अगदी एक दिवसासाठीच गेले असल्याने शिकणे जमले नाही पण आठवणीने रेसीपी मात्र आणलेली होती. एक-दोन महीन्यात मम्मीकडे तिच्या मैत्रीणी येणार असल्याने हा पदार्थ करुन पाहिला. मम्मीला वड्यांचा चांगला सराव असल्याने पहिल्याच फ़टक्यात अप्रतीम झाल्या पण किंचीत गोड झाल्या. खाली आज्जीचे ओरीजिनल प्रमाण देतेय.
7 cup barfi with carrots

१ वाटी बेसन
१ वाटी खोवलेले ओले खोबरे
१ वाटी तुप (हो! एवढे घालावे लागते)
१ वाटी दूध
३ वाट्या साखर
बदाम काप, वेलची पावडर, केषर, जायफळ - हवे असेल तर घालावे

कृती - वरील सर्व पदार्थ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालुन मंद आचेवर शिजायला ठेवावे. सतत हलवत रहावे. मिश्रण पातेल्याच्या कडेने सुटत येईल. तेव्हा तुप लावलेल्या ताटात पसरावे. १०-१५ मिनीटे थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

टीप - १. हे करताना हात दुखुन येतात. पण हलवत राहाण्याशिवाय पर्याय नाही. जरा पसरट कढई घेतली तर मिश्रण लवकर आळते असा अनुभव आहे. वड्या मऊ झाल्यातर परत कढईत घालुन एक चटका देऊन ताटात पसरुन वड्या पाडता येतात.
२. तीन कप साखर जास्त होते (निदान भारतात तरी) तेव्हा १/२ ते १ कप कमी घातली तरी हरकत नाही.
३. तुप १ कप जास्त वाटले तरी तेवढे वापरावे लागते अन्यथा ती वडी खुप पिठुळ लागते.
४. खोबरे चालत नसेल तर १ कप खिसलेले गाजर घालुनही ही वडी अप्रतीम लागते.
५. माझी मैत्रीण क्षिप्रा हिने वरच्या मिश्रणात १ कप आंब्याचा रस घालुन १ वाटी साखर कमी केली होती. अतिशय छान लागले असे सांगत होती.
(Photo Courtesy: Priya)

Comments

  1. मी परवा करून बघितली. कुठल्याही प्रकारची बर्फी/वडी करण्याचा पहिलाच अनुभव. त्यामुळे मिश्रण आळत येणे, म्हणजे नेमके काय माहित नव्हते. साधारण अंदाजानेच ठरवलं. वडी चवीला चांगली झाली, पण जरा ठिसूळ झाली.

    मी पाऊण कपाहून थोडं जास्त, पण एक कपाहून कमी तूप घातलं होतं. मला वडी जरा जास्त तूपकट वाटली. मैसूर पाकासारखी चव आली होती. शिवाय नारळाने अजून तेलकटपणा आला असावा. तेव्हा नारळ वापरायचा असेल, तर तूप थोडं कमी करायला हरकत नसावं. पुढच्या वेळेला गाजर/आंबा घालून करून पाहीन. Let's see if it helps to get rid of the slightly तूपकट smell and taste. Thanks for the nice recipe!

    ReplyDelete
  2. The burfi sounds delicious, Mints.
    I love Belgaum: my dad grew up there and has a home in Belgaum where he heads off every summer. I haven't been there in a decade now, but I remember it being big and bustling yet having an almost rural charm.

    ReplyDelete
  3. sounds great BARFI have asked my wife ot make one for me lets see how it tastes

    ReplyDelete
  4. सही सही!किती वर्षापूर्वी मी करत असे. प्रमाण विसरले होते आताशा! फक्त एक कप साखर कमी करून दही घालत असे. आंबट गोड लागते. आता पुन्हा करून पहाते हं!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.