उन्हाळ्याची वाळवणे करायची म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का महाराजा! कडकडीत उन्हाळ्यात मस्त गरगर फिरणार्या पंख्याच्या वार्यात गारगार सरबत प्यायचे, आंबे खायचे असले सोडुन असले उद्योग करायचे म्हणजे खाण्याची-करण्याची जबरदस्त आवडच पाहीजे! त्यातुन 'आता काय सगळे विकत मिळते' असल्या जमान्यात तर घरी पापड, कुरवड्या, सांडगे, अमके तमके करणार्याचे खरोखर पायच धरायला हवेत!
लहान गावांमधे अजुनही हे उन्हाळकामांचे उद्योग केले जातात. माझी जाऊ अशीच एक उद्योगी प्राणी आहे. खानदेशातल्या तापत्या उन्हात, लोडशेडींगच्या खेळात, पाण्याच्या बेभरवशाच्या कारभारात ती वर्षाचे बिबडे, साबुदाण्याच्या चकल्या, सांडगे असले उद्योग करते. गेल्यावर्षी तिने केलेल्या बिबड्यांच्या काही फोटो काढले, त्याचे हे फोटोफिचर!
बिबडे म्हणजे खानदेशी पद्धतीचे ज्वारीचे पापड. पण ज्वारी दळून आणली आणि पापड केले असा साधा हिशोब नसतो त्याचा!
५ किलो ज्वारीचे बिबडे करावे लागतील यावर्षी अशा साध्या सोप्या वाक्याने सुरु झालेला हा कार्यक्रम पुढे काय काय वळणे घेतो ते पाहू!
आपण असे करू, एकावेळी दोन-अडीच किलोचेच रवण करू!
रवण म्हणजे काय? मला वरण माहिती फक्त भातावरचे.
आहो रवण म्हणजे पीठ, इडलीचे पीठ म्हणजेच इडलीचे रवण!!
बरं! आता पहिले काय करायचे?
ज्वारी मापून घ्यायची आणि पाण्यातून काढायची.
पाण्यातून काढायची म्हणजे काय?
भांड्यात पाणी घ्यायचे त्यात ज्वारी घालायची. थोडे धुवुन घ्यायचे आणि पाणी ओतून टाकायचे.
केले, आता पुढे काय?
हा ती तिथं साडी ठेवलीय ना? त्यात ही ज्वारी घट्ट बांधायची आणि ठेवायची २ दिवस.
उबदार जागीच ना?
हो हो!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दोन दिवस गेल्यावर आता ते गठूळं सोडायचं आणि न्यायचे चक्कीवर रवाळ दळायला!
हो पण चक्कीवाला कुरकुरत नाही का ओलसर ज्वारी दळायला.
कशाला कुरकुरेल? त्याची वेगळी असते ही चक्की आणि नाही म्हणला तर त्याचा धंदा होईल का? उन्हाळ्यात सगळांच्या घरची असली दळणं येणार त्याच्याकडं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जरा दुपारी बसून त्या दळणातला कोंडा पाखडून ठेवुयात.
मग उद्या पापड का?
उद्या कसे होतील लगेच? अजुन चार दिवस लागणार!
ऑं चार दिवस??!!??
मग काय तर!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता ही भरड एका पातेल्यात भिजत घालायची. आणि अर्धा किलो गहू वेगळे एका पातेल्यात भिजत घालायचे.
गहू पण?
गहू नाही वापरायचे, पण त्याचा चिक काढुन वापरायचा!
बापरे! तो पण उद्योग करावा लागणार का मग?
मग पिठाला चिकटपणा यायला करावे लागते ते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तीन दिवसांनंतर, पहाटे 5 वाजता -
बडीशेप, तिळ, जिरे एका भांड्यात काढून घेतले का?
हो सगळे तयार आहे. मिरची-लसूण वाटून गोळा तयार करायचा. अडीच किलोचे पीठ आहे त्याला साधारण वाटीभर लागेल.
वाटीभर खूप नाही का होणार?
वाळून कमी होते तिखट त्यामुळे नाही होणार जास्त.
गव्हाचा चीक काढून तयार आहे.
ज्वारीचे मिश्रण, गव्हाचा चीक एकत्र करून घ्यायचे. मोठ्या चमच्याने, किंवा हातानेच सगळे मिसळावे लागेल. त्यातच चावीपप्रमाणे मीठ, आणि काढून ठेवलेले बडीशेप वगैरे घालायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पीठ मिसळून होईपर्यंत, पिठाच्या मापाच्या दुप्पट पाणी उकळायला ठेवायचे.
अर्धा तास सगळे एकत्र केल्यानंतर मिश्रण साधारण इडलीच्या पिठासारखे होते.
या पिठाला म्हणतात रवण! तोवर पाण्याला पण उकळी आलेली असते. त्यात हळू हळू रवण ओतायचे एक जण ओतत असताना दुसऱ्याने हलवत राहावे लागते नाहीतर गुठळ्या होतात.
आता शिजायला ठेवायचे का?
हो, हलवत हलवत सगळे शिजवायचे, साधारण 2 तास तरी लागतात सगळे शिजायला.
2 तास?? पण पीठ तयार आहे हे कसे ओळखायचे?
पीठ शिजत येईल तसे घट्ट होते. आपण कापडावर थालीपीठ थापतो ना तसे एखादे थापून पहायचे. हाताला थोडे थोडे पाणी लावायचे. नीट हाताला न चिकटता थापले गेले म्हणजे पीठ तयार आहे.
मग आता सगळा सरंजाम गच्चीवर न्यायाचा का?
हो! काल रात्री पोळपाट, साध्या पंचे सगळे वर नेऊन ठेवलेय ना? आज फक्त आता थंड पाण्याचे तांबे, पळ्या आणि शिजवलेले पीठ घेऊन वर जायचे.
चला मग!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पोळपाटावर एक पंचा ओला करून पसरायचा. त्यावर साधारण 2 पळ्या पीठ घेऊन ओल्या हाताने थालीपीठासारखे थापायचे.
पूर्ण एकसारखे थापून झाले की बाजल्यावर पसरलेल्या साडीवर पंचा उलटा करून सोडवून घ्यायचा. बिबडा साडीवर निट पसरला जाईल हे पहायचे.
असे सगळे पापड करायचे. पीठ गरम गरम असे पर्यंत मस्त बिबडे थापले जातात. एकदा का ते थंड झाले ली मग जाड जाड होतात.
साधारण 9-9.30 पर्यंत सगळे बिबडे घालून होतात. उरलेले पीठ सर्वांना दाणे, तेल घालून खायला द्यायचे. एखाद्या लहान्याला दर तासाने वर पाठवून कावळे वगैरे पापड पळवत नाहीत ना ते पहायला लावायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संध्याकाळी 5 च्या दरम्यान सगळ्या बिबाड्यांवर गार पाणी मारायचे, थोडावेळ भिजू द्यायचे. एक एक बिबडा हाताने साडीपासून अलगद सोडवून घ्यायचा. प्लास्टिक कागदावर पसरायचे. सगळा सरंजाम घरात आणायचा.
सकाळी परत सगळे उन्हात पसरायाचे.
बिबडे खडखडीत वाळायला 3-4 दिवस मस्त उन द्यायचे.
10-12 पापड एकत्र करून दोरीने, कापडाच्या तुकड्यांनी बांधायचे. मोठ्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लागेल तसे विस्तवावर भाजून खायचे!
किती प्रचंड मेहनत आहे बिबडे करायचे म्हणजे! खानदेशस्थ स्त्रीयांना सलाम!
ReplyDeleteमस्त लिहिले आहेस, मिनोती! :-)
Totally agree with you :) Thanks Abhijit.
Deletekharach
Deletebaap re!!hats off to the patience and hard work,kiti nigutini kelay ga kharach.kautuk aahe kharokhar..
ReplyDeleteThanks :)
Deletekiti mehnaticha kaam aahe he. ya bharatvarit aaichi madat gheun karun baghen mhante :) dhanyavaad minoti :)
ReplyDeleteThanks!
DeleteBaap re! me tar palun gele aste, ase karayla lagle aste tar? :P;P
ReplyDeleteAnjali, I actually like work on traditional recipes :) I feel it takes me very close to my grandmas :)
DeleteThis is truly a labor of love! Summer 'vaaLavaN' has already become a lost culture in the cities. Seeing these pictures from the villages gives a sense of nostalgia and a continuity with the past :-) Nice photo feature!
ReplyDeletePriya - very true about lost culture.
DeleteMasta lihila aahes ...ani khandeshi style writing pan jamlay tula... mala athavtay sglya sejar pajarchya gujjar bayka kashya papad bibdya karnyat danga asaychya teh!!!
ReplyDeleteThank you, Akshaya.
DeleteAtishay mehenat lagat asel. Pan end result baghun ti sagli mehenat kami lagli asech vatle.
ReplyDeleteBut really hats off to the ladies .
Do visit my blog too....
http://nayanas-kitchen-kreations.blogspot.in/
Thanks Nayana. You have a great blog. I will visit often now.
Deleteक्या बात है! मी आजपर्यंत बिबड्य़ांच्या रेसिपींसाठी इंटरनेट सर्च करुन फ़ार थकली पण आज ही रेसिपी आपल्या ब्लॉग वर मिळाल्यापासून फ़ार फ़ार आनंद झाला. कृपया आपण खान्देशी बिबड्य़ांबरोबर "पानं", "डाळ गंडोरी", "भेंडके", "धिरडे" कसे करतात ते पण नक्की नक्की पोस्ट करा इथे.
ReplyDeleteAnon, thank you. I do have "डाळ गंडोरी" recipe here - http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/05/blog-post.html
DeleteI am in process of writing other recipes. Do visit to see those!
wow mastach...mazya aatyesasubainkade khalle hote pahilyanda....very tasty....pan swataha karaychi ajibat himmat nahi:-)
ReplyDeleteThank you Khaugiri!
DeleteDhanya! Both you and your sil. Loved your very different style of writing in this post, and the pictures are very evocative.
ReplyDeleteThanks ET!
DeleteAjun pan lahan pana pasun agdi 12-13 years adhi paryant sakali 3-4 la uthun Chulivarchya patelyat Ghata karayala ravan taklele athavte. Ani Sandhyakali ole bibde tel takun khane pan. Nusta Ghata kadhi avadla nahi khayla mala.
ReplyDeleteThanks!
Deleteminoti bibadyanchi recipe mast aahe.aug.maherchya ankatil dips hi chhan aahet!
Deleteडाळ गंडोरी अप्रतिम. मी करुन पण बघितली. अजुन रेसिपिंची वाट बघत आहे.
ReplyDeleteHello Mints, you have a gorgeous blog with absolutely wonderful recipes. Am glad I came across your blog.
ReplyDeleteDo you have an email id I can reach you at? Btw, my name is Sailaja and am a food blogger too.
Hello Mints, you have a great blog and just to show my appreciation I have nominated you for an award
ReplyDeletehttp://www.myhomemantra.com/2012/08/18/liebster-award/
Hope you will like it!
Radhika
Thanks Radhika for wonderful award.
ReplyDeleteHi,
ReplyDeleteThis is a very nice recipe, but it is difficult for someone like me who knows very little Marathi to try it out. Would it be possible to give the recipe in English please.
Anonymous, I understand. But it is very time consuming to post a recipe in both the languages that is equally appealing. I do it often but sometimes it is not possible. Thank you for your support.
DeleteMinoti, I am from Jalgaon and have spent more than 20 years away from Jalgaon, but I look forward to eating "bibade" when I visit Jalgaon. Yes, the recipe is laborious, but worth the end product! I loved this post. Please do keep writing.
ReplyDeleteThank you Pratima. Welcome here.
Deletelay bhari
ReplyDelete