वरणफळ/ डाळ ढोकळी / चकुल्या (Varanphal / Daal Dhokali / Chakulya)

Here is link to English version of this recipe -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/04/varanphal-daal-dhokali-chakulya.html

ही आमटी जरा पातळ करायची. आमटी उकळेपर्यंत चपातीची साधी कणीक किंवा तिखट, मीठ, कोथिंबीर, हळद वगैरे घालुन कणीक भिजवायची. आमटीचा गॅस बारीक करुन कणकेची साधीच चपाती लाटायची (घडी वगैरे न घालता, जाड फुलक्यासारखी) आणि त्याचे सुरीने साधारण १ इंच मापाचे तुकडे कापायचे आणि तुकडे करु तसे ते आमटीत सोडायचे. वरील प्रमाणाच्या आमटीला साधारण ४ चपात्या लागतात.

Varanphal/Chakulya/Dal Dhokli

सगळे तुकडे घालुन झाले की एकदा छान उकळू द्यायचे आणि तुप घालुन त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा.

टीप - हा पदार्थ गरम गरम खाण्यातच मजा आहे. आणि त्यावर तुप एकदम must आहे!!!

Comments

 1. याच पदार्थाची पाककृती लक्ष्मी हिरेमठ यांनी एका अमेरीकन वृत्तपत्रात Indian style Pasta ह्या नावाखाली दिली होती

  ReplyDelete
 2. मस्त आहे पण आमटी कशी करायची

  ReplyDelete
 3. आम्ही आमटी करताना त्यात लसून आणि दालचिनी वापरतो बाकी कोणताही मसाला घालत नाही मस्त चव लागते

  ReplyDelete
 4. आमटी करताना नेहमीची फोडणी करून त्यात फक्त दालचिनी आणि खोबरे कुटून घालावे बाकी कोणताही मसाला घालू नये छान लागते वाटल्यास थोडी गवार
  घातल्यास अप्रतिम चव येते

  ReplyDelete
  Replies
  1. That is a very good idea. I will try that next time.

   Delete
  2. तुमच्या सर्व पदार्थांना माझ्या आईच्या हातचा स्वाद येतो तुम्ही सातारा कडच्या आहात का

   Delete
  3. मी इचलकरंजी चा आहे
   जिल्हा कोल्हापूर

   Delete
 5. मी आता एक पोह्याची पाककृती देतो माझे आजी आजोबा माळकरी होते त्यामुळे ते कांदा खात नसत म्हणून माझी आई पोहे करताना कांदा ऐवजी दाण्याचा कूट घालून पोहे करायची काय मस्त टेस्ट लागते अजूनही मी तसेच पोहे करतो तुम्ही प्रयत्न करून बघा

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts