पालकाची कोशिंबीर (Spinach Salad)

Spinach Salad१ जुडी कोवळा पालक बारीक चिरुन
१/४ लाल कांदा अगदी बारीक चिरुन
साखर, मीठ, लिंबु चवीप्रमाणे
२ चमचे दाण्याचे कुट
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग

कृती - थोड्या तेलाची फोडणी करुन घ्यावी. चिरलेला पालक आणि कांदा एकत्र करावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबु घालावे. त्यावार, दाण्याचे कुट आणि फोडणी घालुन एकत्र करावे.

टीप - कच्चा कांदा आवडत नसेल तर वगळायला हरकत नाही पण ह्या कोशिंबीरीत कच्चा कांदा अतीशय छान लागतो.

Comments

  1. आमच्याकडे फ्रेश पालक नेहमी मिळतोच असं नाही :-( फ्रोझन पालकाची नाही होणार का चांगली?

    ReplyDelete
  2. Priya, frozen palakachi nahI hoNar neet :(

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts