पौष्टीक खिचडी (Healthy Khichadi)

बरेचदा असे होते की स्वयंपाकाचा तुफान कंटाळा येतो आणि तेच तेच इडली, डोसा, छोले नान असले बाहेर जाऊन खायचा तर त्याहुनही कंटाळा येतो. चिनी, थाई वगैरे दुकानात भात, नारळाचे दूध खायची भिती वाटते. अशावेळी दोघांपैकी कोणीतरी वरणफळे किंवा खिचडी कढी बनवतो. मधे केलेल्या पौष्टीक खिचडीची कृती देतेय.

Healthy Khichadi

१ भाग सालीची मूगडाळ
१ भाग ताजे/ फ्रोझन सोयाबीनचे दाणे
२ भाग ब्राऊन भात (हातसडीचा तांदूळ)
३ भाग चिरलेली पालेभाजी (पालक, कोबी, लाल कोबी पैकी कोणतीही एक)
१-२ टीस्पून गोडा मसाला (चवीप्रमाणे कमी जास्त करावा)
२ टेबलस्पून तेल
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे
जिरे मोहरी, हळद, हिंग फोडणीसाठी
६ भाग पाणी

कृती - डाळ, तांदूळ धुवुन ठेवावे. पालेभाजी धुवुन चिरुन घ्यावी. मायक्रोवेव मधे किंवा गॅसवर पाणी तापवत ठेवावे. एका प्रेशरकुकर मधे तेल तापवून त्याला जिरे, मोहरी, हिंग, हळद घालुन फोदणी करावी. त्यात धुतलेले डाळ तांदूळ घालुन ३-४ मिनीटे नीट परतावे. त्यात सोयबीनचे दाणे घालुन एखादा मिनिट परतावे. त्यात चिरलेली पालेभाजी, तिखट, मीठ, गोडा मसाला घालावा. वरुन गरम पाणी ओतून कुकरचे झाकण लावून २-३ शिट्ट्या करुन भात शिजवून घ्यावा.

टिप- १. सोयाबीनचे दाणे मिळत नसतील तर मटार दाणे घालायला हरकत नाही.
२. पांढरे तांदूळ आणि लाल कोबी घेतले तर या खिचडीचा रंग छान येतो. पण अशावेळी हळद घालू नये.
३. प्रेशरकुकरमधे अन्न भांडे न वापरता शिजवायचे नसेल तर भात नुसता पातेल्यात केला तरी चाल्तो पण ब्रऊन राईस शिजायला कमित कमी एक तास लागतो. अशावेळी सरळ भाजलेल्या तांदळाचे मिश्रण कुकरच्या भांड्यात घालुन अंदाजाने पाणी घालुन नेहेमीप्रमाणे कुकर करावा.

Comments

 1. खिचडी म्हटली की साबुदाण्याची खिचडी आठवते. म्ह्टले ती पौष्टीक केव्हा पासुन झाली ?
  पुढे वाचल्या नंतर भ्रमनिरास झाला. खरोखरीची ही पौष्टीकच आहे.

  btw आपल्याला साबुदाणा कसा बनवतात याची माहीती आहे काय ? एका डॉ. ने लेख लिहीला होता, त्यात तिने म्हटले होते की आपल्याला हे कळले तर आपण साबुदाणा खाणार नाही.

  हि पाककृती आपली निर्मीती काय ?

  ReplyDelete
 2. खिचडी तर माझा जीव की प्राण आहे आणि त्यात ही पौष्टीक खिचडी म्हणजे तर फ़ेवरीट डीश असणार आहे.

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts