चवळी/मुग/लाँग बीन्सची भाजी (Long Beans Bhaji)

(Link to English Recipe)

आम्हाला आजूबाजूचे शेतकरी असल्या शेंगा खूप आणून देत. त्यामुळे हे प्रकार घरी वरचेवर होत असत. इथे आल्यावर लाँग बीन्सचे करून पाहीले आणि आवडले.

चवळी किंवा मुगाच्या शेंगा पाव किलो
(भारताबाहेर असाल तर चायनीज स्टोरमधे लाँग बीन्स म्हणून शेंगा मिळतात त्या शेंगा पाव किलो (१/२ पाऊंड))
१ लहान कांदा (वगळण्यास हरकत नाही)
१ टेबलस्पून कांदा लसूण मसाला
३-४ पाकळ्या ठेचलेला लसूण
मीठ चवीप्रमाणे
२ टेबल्स्पून तेल, नेहेमीचे फोडणीचे साहित्य
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
कोथिंबीर
किंचीत पाणी


Long Beans

१. शेंग्यांचे कडेचे धागे काढून टाकावेत आणि शेंगा स्वच्छ धुवून निथळून घ्याव्यात.
२. शेंगांचे १/२ सेंटीमिटर जाडीचे तुकडे कापावे.
३. कांदा वापरणार असाल तर ते देखील बारीक कापून घ्यावा.
४. तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. त्यात कांदा आणि लसूण नीट परतून घ्यावा.
५. त्यावर कापलेले बीन्स घालून साधारण ३-४ मिनीटे मध्यम गॅसवर परतावे.
६. गॅस बारीक करून अगदी २-३ टेबलस्पून पाणी घालून झाकण ठेवून भाजीला एक वाफ आणावी.
७. त्यावर मीठ, कांदा-लसूण मसाला घालून नीट हलवावे. भाजी शिजली नसली तर १-२ टेबलस्पून पाणी घालून पुन्हा एक वाफ काढावी.
७. भाजी नीट कोरडी करावी. वरुन दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी-चपातीबरोबर गरम गरम खावी.

याचाच एक पातळ भाजीसारखा प्रकार करतात. त्यासाठी थोड्या जून शेंगा सोलून त्यातले दाणे काढायचे. थोड्या चिरलेल्या शेंगा असे घेतात. जास्तीचे साहित्य म्हणजे लसूण-खोबर्‍याचा गोळा, आमसूल आणि गूळ. लसूण फोडणीत न टाकता भाजी उकळताना घालतात. भाजी अर्धवट शिजली की अमसूल-गूळ घालून उकळायचे. हा प्रकार गरम भातावर अप्रतीम लागतो.


टिप्स -

१. शेंगा शक्यतो कोवळ्या पाहून आणाव्यात. एखादी जून असेल तर त्यातले दाणे काढून वापरावेत.
२. भाजी एकदम कोरडी आणि करकरीन असते तरी पूर्ण शिजलेली असते. नीट बारिक गॅसवर परतले की भाजीचा रंग देखील मस्त रहातो.
३. कांदा लसूण मसाला नसेल तर गोडा मसाला आणि लाल तिखट वापरून देखील ही भाजी करता येते.

Comments

  1. Mints,I can always count on you to make me nostalgic-- and hungry. I remember my mom buying these long beans-- they were usually sold with a rubber band around each end of the bunch to hold them together. :) And they tasted divine. Thanks for another lovely recipe.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts