डाय गंडोरी (डाळ गंडोरी)

अर्थात मिरच्यांची भाजी
(Link to English Recipe)

माझे सासरे त्यांच्या गावातल्या सामाजीक कार्यात बरेच अ‍ॅक्टीव असतात.  एखाद्या घरी लग्न असेल तर समारंभाच्या जेवणाचा अंदाज सांगणे. स्वतः जातीने उभे राहुन सगळे नीट होतेय की नाही ते पहाणे. आचारी मनाप्रमाणे स्वयंपाक करत नाही असे वाटायला लागले तर स्वतः उभे राहुन सगळा स्वयंपाक करणे असे सगळेच त्यात आले. त्यांच्या हातची ही खानदेशी पद्धतीची अंबटचुक्याची भाजी घरात आणि सगळ्या नातेवाईकांच्यात खुपच प्रसिद्ध आहे. भारतात अंबटचुका अगदी सहज उपलब्ध असला तरी आम्हाला इथे अमेरिकेत तो मिळत नाही. त्यावर उपाय म्हणुन आम्ही आंबाडी आणि पालक वापरुन ही भजी करतो. सासर्‍यांच्या हातची अस्सल चव येत नाही पण तरीही भाजी अप्रतीम लागते.

IMG_9687



जिन्नस अ)
१ वाटी तूरडाळ
१ मोठी पेंडी(जुडी) आंबटचुका किंवा अंबाडी
१-२ हिरवे टोमॅटो
१/२ पेंडी (जुडी) पालक
५-६ हिरव्या मिरच्या
३-४ मोठ्या पाकळ्या लसूण 
१ पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा

जिन्नस ब)
५-६ लांब हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
५-६ लसूण पाकळ्या
पेरभर आल्याचा तुकडा
१/२ ते १ वाटी शेंगदाणे
१/२ वाटी खोबर्‍याचे काप
साधारण ४-५ टेबल्स्पून तेल

कृती -
जिन्नस अ) मधल्या पालेभाज्या निवडून घ्यायच्या. अंबाडीची भाजी घेणार असाल तर फक्त पाने वापरायची.
लसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे.
भाज्या धुवुन घ्यायच्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करायचे.
कुकरमधे तूरडाळ धुवुन घ्ययची. त्यात भाज्या, लसूण, आले, मिरच्या असे सगळे एकत्र करुन पुरेसे पाणी घालायचे. आणि नेहेमीप्रमाणे सगळे नीट शिजवून घ्यायचे.
कुकरचे प्रेशर उतरले की हे सगळे शिजलेले जिन्नस बारीक करुन घ्यायचे. हँडब्लेंडर/पुरणयंत्र/मिक्सर कशानेही बारीक करू शकता. हे सगळे खूप घट्ट झाले असेल तर थोडे पाणी घालायचे. साधारण आळूच्या भाजीसारखी कंसिस्टन्सी असली पाहीजे.

जिन्नस ब) मधिल मिरच्यांचे तुकडे करुन घ्यायचे.
आले-लसूण वाटून गोळा करुन घ्यायचा.
एका मोठ्या पातेल्यात तेल तापवायचे. त्यात दाणे आणि खोबर्‍याचे काप घालून थोडे गुलबट रंगावर परतून घ्यायचे.
मिरच्यांचे तुकडे आणि आले-लसणाचा गोळा किंचीत त्यावर टाकून परतून घ्यायचे.
आता शिजवून बारीक केलेली भाजी यावर घालायची.
मीठ घालून भाजी बारीक आचेवर उकळायची. दाणे, मिरच्या आणि खोबरे नीट शिजले पाहिजे.
ही अशी गरम गरम भाजी वाफाळत्या भाताबरोबर मस्त लागते. भाकरी, चपाती कशबरोबरही खाण्यास हरकत नाही.

टीपा -
  1. यात एकुण १०-१२ मिरच्या आहेत तरी डाळ, भाज्या यांच्या प्रमाणामुळे ही भाजी अती तिखट होत नाही. 
  2. भाजी कुकरमधे शिजवताना बारीक तिखट मिरच्या आणि वरती फोडणीत घालताना पोपटी लांब मिरच्यांचे तुकडे असे वापरले तरी हरकत नाही.
  3. याचे नाव मिरच्यांची भाजी असेही असल्याने लाल तिखट घालून ही भाजी करत नाहीत :)

Bookmark and Share

Comments

  1. सहीच! माझ्या सगळ्यात जास्त आवडीच्या भाजी पैकी एक. आई थोड्या वेगळ्या पद्धतीने हि भाजी करते (त्यात दाणे, खोबरे, मिरच्या वाटलेल्या असतात तुकडे नाहीत). गावाकडे हि भाजी कायम भंडाऱ्यात किवा हिवाळ्यात शेतावर खायचो. अमेरिकेत अजिबातच हि भाजी खायला मिळत नाही. पुण्यात ह्या भाजीचे नुसते नाव काढले तरी लोकांच्या डोळ्यात पाणी येते, खाण्याची बात सोडा. अधिक काय सांगू, रेसिपी बद्दल धन्यवाद पण अतिशय सुंदर आठवणी जागवल्याबद्दल जास्त धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. Welcome to my blog Kalandar. I am glad you liked the post.

      Delete
    2. Assal khandeshi type madhe mhanl tar ya bhajimadhe mirchyancha pramn jast aste aani tya dalibarobarach pressure cooker madhe shijawoon ghaywya lagtat+ tayt chhotya wangyache tukade mix karayachet + serve kartana methicha khuda,peru,limbu,kanda yasobat detat.

      Vidarbhamadhe generally dane,khobre aani mirchyancha masala watun thodi sakhar add kartat.

      Anyway Thanks Mints.aatach me mirchaynchi bhaji khalli...assal khandeshi type....i can learn many things from you!

      Delete
  2. Yummy, मला आवडेल अशीच

    ReplyDelete
  3. Ambadichi bhaji Americet kuthe milte? Dusrya kuthlya nawane milte ka hi bhaji? Me tumchi recipe try karayla agdi utsuk ahe...nakkich masta chav asel :)

    ReplyDelete
    Replies
    1. Ashwini, welcome to my blog. Indian stored carry Ambadi bhaji. tyache nav Gongura ase asate.

      Delete
    2. Hey Mints thanks for replying back!!! Me nakki shodhin he bhaji patel brothers madhe :)

      Delete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.