Skip to main content

Posts

Featured

बदाम कतली

अमेरिकेत बर्याच ग्रोसरी स्टोरमध्ये अलीकडे बदामाचे पीठ खूप सहज मिळते. ते मी एकदा उत्साहाने आणले आणि आता त्याचे काय करू म्हणुन ते फ्रीझरमध्ये २ महिने तसेच राहीले. मग एकदा आईच्या सल्ल्याने ते कणिक भिजवताना थोडे घालून वापरले तर त्या चपात्या मला फार आवडू लागल्या छान खुसखुशीत होतात. ती बदाम पिठाची पिशवी तशीच चपातीच्या कणकेत घालून संपवली. मी पूर्वी घरी काजू/पिस्ते/बदामाची पावडर करून कतली करायचे पण या पिठामुळे काम खूप सोपे झाले. मी नेहेमी घरात बदाम्/पिस्ते/काजूची पावडर करून कतली करायचे पण ती बरेचदा रवाळ लागायची. मग एकदा धाडस करून ह्या पिठाची करून पाहिली आणि चक्क नीट जमली. आज परत केली तर ती पण नीट झाली. गेल्या ८ दिवसात साधारण १०-११ कप पिठाच्या वड्या केल्या म्हणून लिहून ठेवतेय!


१/२ वाटी साखर (अमेरिकेत बारिक रवाळ साखर असते तरी खाली भारतात कशी करावी ते लिहिते)
३-४ टेबलस्पुन पाणी
१ ते १.५ कप बदामाचे पीठ
५-६ केशर काड्या किंवा थोडी वेलची पूड (वगळले तरी चालेल)
किंचीत बदामाचे तेल किंवा तेल

कृती -
सर्वात प्रथम एका जड थाळ्याला (मी कटींग बोर्ड किंवा पोळपाट वापरते) मागच्या बुडाच्या बाजुने तूप लावून घ्या…

Latest Posts

No Knead Bread

Fruit Salad

भाजीचे सांडगे

Spicy Steel Cut Oats

स्टर फ्राय भाज्या