भरल्या वांग्याचा मसाले भात (Stuffed Brinjal Pulav)

मायबोलीवर २००५ मधे गणेशोत्सवात पाककला स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या तेव्हा मी सहज गंमत म्हणुन भाग घेतला होता. दिलेल्या यादीमधील जिन्नस घेऊन एक पदार्थ बनवायचा होता. आणि फ़ोडणीचे साहित्य वगैरे वापरले तर चालणार होते. स्पर्धेच्या शेवटी मतदान होऊन मला पहिला पुरस्कार मिळाला असे घोषीत करण्यात आले होते.

माझ्या पप्पांच्या आजोळी असले वेगवेगळे पदार्थ नेहेमी केले जातात ही मूळ रेसीपी पण मामींचीच पण मला दिलेल्या घटक पदार्थानुसार थोडे बदल केलेली!

मसाला -
१/२ वाटी खोबरे भाजुन बारीक करुन
१/२ वाटी तीळ भाजुन बारीक करुन
२ चमचे गरम मसाला
लाल तिखट आणि मीठ चवीप्रमाणे
१/२ चमचा हळद

भाताचे इतर साहीत्य -
४ वांगी भरल्या वांग्याच्या भाजीसाठी कापतो तशी कापुन घ्यावित.
१ कप तांदुळ धुवुन कमीत कमी १/२ तास निथळत ठेवावेत.
मीठ, गरम मसाला, लाल तिखट चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल
१ वेलची, १ काडी दालचीनी, २ मीरे, १-२ पाने तमालपत्र (खडा मसाला)
फ़ोडणीसाठी २ चमचे तेल, हळद, जिरे, मोहरी, हिंग
२ कप गरम पाणी

कृती - मसाल्याचे साहित्य नीट भाजुन एकत्र करुन घ्यावे. ते चिरलेल्या वांग्यात भरता येईल तितका भरावा. राहीलेला मसाला बाजुला ठेवावा. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात खडा मसाला घालुन तो थोडावेळ तडतडु द्यावा. त्यात वांग्यासाठी बनवलेला मसाला उरला असेल तर तोही घालावा. त्यात तांदुळ घालुन ५ मिनीटे मंद आचेवर व्यवस्थीत परतुन घ्यावेत. त्यातच लाल तिखट, गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे घालावे. आता तांदळावर २ कप गरम पाणी घालुन एक उकळी आणावी. भात साधारण ५ मिनीटे झाकण लावुन शिजवुन घ्यावा. तो अर्धवट शिजला की त्यात मसाला भरलेली वांगी देठाकडचा भाग खालील बाजुला ठेवुन भातात खोचावीत. पातेल्यावर परत झाकण ठेवुन भात नीट शिजु द्यावा. शक्यतो चमच्याने ढवळु नये. भात शिजल्यावर गॅस बंद करुन वाफ़ कोंडु द्यावी त्याने वांगी नीट शिजतात. वरुन खोबरे कोथिंबीर घालुन तुपाबरोबर वाढावा.

टीप - मसाल्यात तीळ न घालता सगळे खोबरे वापरले तरी चालेल.

Comments

 1. आपण जर याच्या बरोबर खाण्याचा फोटो टाकलात तर बहार येईल.

  ReplyDelete
 2. Harekrishnaji,
  manya aahe tumache pan aaLashipaNa aahe ho khup majhyat :)

  paN prayatn karen.

  ReplyDelete
 3. yummieeeeee भुक लागलीय!!! छान छान रेसिपिज आहेत. :-)

  ReplyDelete
 4. छे! फारच खास आहे ही रेसिपी. पण आईला करायला सांगायला हवी. माझ्यासाठी जरा ओव्हर डोस होईल :-)

  वांग्यासाठी केलेल्या मसाला सारणा साठी दाण्याचा कूट, लसूण घातला तर? नाशिक साईडला तसे करण्याची पाद्धत आहे.

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts