मटकीची उसळ (Mataki Usal)

पाचवी सहावीत कधीतरी मम्मीने पावसाळ्यात मटकीची उसळ केलेली आठवते. त्यावर मी मम्मीला विचारलेले प्रश्नही तितकेच आठवतात. पुढे हॉस्टेलमधे असताना मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ जवळजवळ एक दिवसाआड मिळत असे. भरपूर लिंबू पिळुन ती खाणे आणि पोट भरणे हे माझ्यासाठी अगदी नॉर्मल होते त्या काळात. बरेचदा असे वाटे की आता आयुष्यात परत कधी या उसळी खाईन असे वाटले नव्हते. पण माझ्या नशिबाने तसे काही झाले नाही. लहान असताना जितकी आवडायची तितकीच अजुनही आवडते.

Mataki Usal

४ कप मोड आलेली मटकी
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ मोठी लसूण पाकळी
१ टीस्पून चिरलेले आले
मुठभर शेंगदाणे
१ टेबल्स्पून चिंच पाण्यात कोळुन
अगदी छोटा खडा गूळ
१ टीस्पून गरम मसाला
लाल तिखट, मीठ - चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता इत्यादी फोडणीचे साहित्य
मटकी शिजवण्यासाठी लागेल तसे पाणी

कृती - मटकी धुवुन निथळत ठेवावी. एका जाड बुडाचे पातेले मध्यम आचेवर ठेवुन तेलाची फोडणी करुन घ्यावी. त्यावर कापलेला कांदा, आले, लसुण घालुन सोनेरी रंगावर भाजुन घ्यावे. त्यावर शेंगदाणे आणि मटकी घालावी. मंद आचेवर मटकी नीट भाजुन घ्यावी. त्यावर चिंचेचा कोळ, मीठ, गरम मसाला, लाल तिखट, गूळ घालुन नीट मिसळुन घ्यावे. लागेल तसे १/२ कप वगैरे पाणी घालुन झाकण ठेवुन मटकी नीट शिजवुन घ्यावी. पाणि शक्यतो सगळे आटवुन टाकावे.

टीप - १. मटकी भिजत घालुन ६-७ तासाने चाळणीत उपसुन घ्यावी. एका पंच्यात बांधुन ते गाठोडे एखादा उबदार जागेवर साधारण १०-१२ तास ठेवावे. मस्त मोठे मोठे मोड येतात.
२. चिंच आणि गूळ आवडत नसेल तर घातला नाही तरी हरकत नाही.
३. गरम चपातीबरोबर खायला चा.गले लागतेच पण लंचसाठी नुसतीच खायला एकदम झक्कास लागते.

Comments

  1. I get dammned scared the day I see Matki at my home. That means at Breakfast Matakichi Misal, at Lunch Matkichi Usal at Dinner ...

    No doubt we do enjoy it, but still
    sometime it's too much.

    ReplyDelete
  2. mataki chi usal mast mazya aawadichi aahe..me kadhi kadhi urlelya usali madhe shev, kachha kanda, tomato chirun ..misal sarkhe khate

    ReplyDelete
  3. Harekrishnji - :)

    Ruchira - ho mI pan tase karate kadhikadhi.

    ReplyDelete
  4. इथे US मध्ये मटकी इतकी मिळत नाही. मग काय करायचं?

    ReplyDelete
  5. Rutu, Mataki milat nahi ase hot nahi. pan thandit neet mod yet naahit he pan titakech khare. mod aalelya mugachee hisch usal karun paha mast lagate.

    ReplyDelete
  6. धन्स् मिंटस्! अग मला म्हणायचं होतं की मोड न आलेली मटकी कशी ओळखायची हे ही मला माहिती नाहीये :( कशी ओळखायची ते सांगशील का?

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.