स्पॅगेटी (Spaghetti)

Here is English Version of this Recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/spaghetti


इटालियन रेस्टॉरंटमधे गेले की बरेचदा एकाच प्रकारचा टोमॅटो सॉस घातलेला पास्ता खाणे चिड आणणारा आहे. कित्येक पुस्तकांमधे इतक्या सुंदर सुंदर शाकाहारी पास्ता रेसिपीज असताना हे चेन रेस्टॉरंटवाले फक्त हे असले सॉस मधे डुंबणारे पास्ता नूडल्सच का विकतात हे मला पडणारे एक कोडे आहे. माझ्यापरीने मी स्वतः बर्याच भाज्या घालुन पास्त्याचे बरेच प्रकार करते. बेसील पेस्तो, सनड्राईड टोमॅटो पेस्तो, रोस्टेड बेलपेपर सॉस असे बरेच काही. त्यातलाच हा एक सोपा प्रकार -

Spaghetti

३ भाग स्पॅगेटी *
४ टोमॅटो
१/२ कप मटारदाणे
१/४ कांदा
१ गाजर (किंवा ५-६ बेबी कॅरट्स)
१ पाकळी लसुण
१/२ टीस्पून इटालियन हर्ब मिक्स **
मीठ, मिरपूड चविप्रमाणे
१ टेवलस्पून तेल
१ टेबल्स्पून पाईन नट्स
५ कप पाणी

कृती - एका मोठ्या पातेल्यात पाणी घेउन एक चिमुट मीठ घालून उकळी येउद्या. त्यात स्पॅगेटी नूडल्स घालून शिजुद्या. नूडल्स शिजलेले पाणी १ कप बाजुला ठेवुन बाकीचे चाळणीतून गाळुन नुडल्स बाजुला ठेवा. दरम्यान ३ टोमॅटो बारिक चिरुन घ्या. एक टोमॅटो उभा चिरुन बाजुला ठेवा. कांदा उभा कापा. लसुण बारिक ठेचुन घ्या. गाजर उभे चिरा. आता एका पॅनमधे तेल तापवा, त्यात लसुण आणि कांदा एकदम घाला कांदा बारिक गॅसवर नीट परतवा. त्यावर गाजराचे तुकडे घाला. नीट परतवा. त्यावर टोमॅटो आणि मीठ घालुन टोमॅटो अर्धवट शिजु द्या. इटालियन स्पाईस मिक्स डाव्या हाताच्या पंजावर घ्या आणि दोन्ही हातानी नीट चुरडुन शिजत आलेल्या टोमॅटो सॉसमधे घालावे तसेच मिरीपूड देखील घालावी. आता टोमॅटो नीट शिजले की त्यावर उभे चिरलेले टोमॅटो आणि मटरदाणे घालावेत. सॉस खूप दाट वाटत असेल तर नूडल्स शिजवलेले पाणी जे बाजुला ठेवलेले आहे ते थोडे थोडे घालावे. सॉस सरसरीत असावा म्हणजे नूडल्सना नीट चिकटतो. त्यावर शिजलेले नूडल्स घालावेत आणि हलक्या हाताने नीट मिसळावे. पाईननट्स मिक्सरमधुन जाडेभरडे वाटावेत. ती पावडर नूडल्समधे घालावी. गरम गरम नूडल्स खाण्यासाठी तय्यार.
टीप -
१. यात आवडीप्रमाणे ब्रोकोली, फ्लॉवरचे तुकडे घालण्यास हरकत नाही.
२. घरी टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो पेस्ट असेल तर ३ टोमॅटो ऐवजी २ टेबल्स्पून टोमॅटो पेस्ट किंवा ६ टेबलस्पून टोमॅटो प्युरी वापरायला हरकत नाही.
३. पाईन नट्समुळे पास्ता अगदी क्रिमी होतो. पाईन नट्स नसतील तर ४-५ काजु किंवा आक्रोड वापरायला हरकत नाही.


* एका माणसाला किती स्पॅघेटी लागेल ते कसे मोजायचे ते तिथे पहा -
http://www.ehow.com/how_2097117_measure-portion-sizes.html
** मी ट्रेडर जोज मधुन इटालियन हर्ब मिक्स आणुन ठेवले आहे जेव्हा मला ताजे हर्ब्स मिळत नाहीत अथवा घाई असते तेव्हा हे वापरते.

हा सोपा पास्ता वैशालीच्या 'Its a Vegan World - Italian!' Event साठी -

Comments

  1. Mints, How could anyone not love that beautiful plate of spaghetti? It looks just gorgeous, and sounds very healthy. Thanks for sending it in to IAVW Italian.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts