पडवळाची भाजी (Snakegourd Bhaji)

पडवळाची भाजी मम्मी श्रावणातल्या शुक्रवारी करत असे. पुरणाच्या दिवे, पुरणपोळी, भात, वरण, टोमॅटोची कोशिंबीर आणि पडवळाची भाजी असा दर शुक्रवारचा मेनु असे. पुरणाचे दिवे लावुन मम्मी मला आणि सुबोधला ओवाळत असे. ते दिवे रात्री खायला मिळत. तो तुपाचा, पुरणचा जळका वास मला अत्यंत आवडायचा. गेले कित्येक वर्षे घेतला नाही तरीही अजुनही जाणवणारा. तर त्या नैवेद्यातली ही पडवळाची भाजी. मम्मीची अगदी मस्त होते. साधी पण अगदी चविष्ट ...


Snakegourd bhaji


१ पडवळ (साधारण पाव किलो)
१/४ कप हरबरा डाळ
१ टेबलस्पून काळा/गोडा मसाला
मीठ, लाल तिखट गुळ चविप्रमाणे
२ टेबलस्पून तेल
फोडणीचे सामान - जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, हिंग
१-२ चमचे दाण्याचे कुट

कृती-
डाळ तासभर तरी कोमट पाण्यात भिजत घालावी. पडवळ मधोमध उभे चिरावे बिया जुन असतील तर काढुन टाकाव्यात आणि चकत्या कराव्यात. अर्धचंद्राकृती चकत्या होतील. कढईत तेल तापवून नेहमीप्रमाणे फोडणी करावी. डाळीतले पाणी काढुन टाकावे. पडवळाचे तुकडे, डाळ घालून तेलावर नीट परतावे. गरज असेल तर किंचीत पाणी शिंपडावे आणि झाकण ठेवुन अर्धवट शिजवून घ्यावी. त्यावर काळा मसाला, तिखट, मीठ, गूळ, दाण्याचे कूट घालून पूर्ण शिजवावे. वरुन चिरलेली कोथिंबीर घालून वाढावी.


Comments

 1. Mints,
  That is so simple but sounds so delicious. My mom makes something similar but I have never made it. Will try it next time I find snake gourd. :)
  Tuzi marathi keeti chaan aahe. Agadi pustakaan madhe lihitat tashi.

  ReplyDelete
 2. खरं म्हणजे मला पडवळाची भाजी आवडत नाही, पण ही खुप छान वाटती आहे. मलाही पुरणाचे दिवे खायला खुप अवडतात.

  ReplyDelete
 3. Jaya, do try. And thank you for compliments.

  Vaidehi, Khaugiri - Thanks!

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts