Instant Coffee with Nutmeg!

(Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2012/04/coffee-break-instant-coffee-with-touch.html)
माझी मम्मी अतिशय सुंदर कॉफी बनवते. पण तिची पद्धत म्हणजे साधी कॉफी पाणी, दूध, साखर आणि जायफळ घालून उकळून बनवलेली. एकदम मस्त लागते. आम्ही मुख्य गावापासुन दूर रहातो आणि सायकलवरून मामालोकांना घरी यायचे म्हणजे कमीतकमी १० किलोमीटर पेडलींग करावे लागे. मग ते आले की नक्की फर्माईश होणार, 'माई, कॉफी कर की!' त्यामुळे दर मंगळवारी घरी कॉफी होणारच! जायफळ तिच्या हातून कधी जास्त नाही झाले की कधी कमी नाही पडले. साखर, दूध, कॉफी नेहेमी अगदी व्यवस्थीत असे. मी केलेली कॉफी मामालोक लग्गेच ओळखायचे :( तिच्यामुळेच की काय देव जाणे पण मला थोडी स्ट्राँग कॉफी प्यायची सवय झाली. साधारण ७-८ वी मधे असेन मम्मीने माझ्यासाठी नेसकॅफेची बरणी घरी आणली कदाचीत माझ्या हट्टाने पण असेल. त्याआधी ती घरी येतही होती पण माझ्या कधी लक्षातही आले नव्हते. एक कप दूध आणि त्यात अगदी चमचा भरून कॉफी असे मम्मी करुन देत असे रविवारी वगैरे.

कॉफी म्हणले की मला अजुन एक गम्मत आठवते ती म्हणाजे मी मम्मीचा निरोप घेउन एका ओळखीच्या काकुंकडे गेले होते (हा 'प्री टेलीफोन काळ' होता) त्यांच्या 'अतीआग्रहास्तव' मला कॉफी घेणे भाग पडले. काय कॉफी होती म्हणुन सांगु! छोटुसा कप दूध, त्यात १ चमचा (देशात साखरेचा चमचा नावाने एक किल्वर सारखा दिसणारा चमचा मिळतो तो) आणि एखाद्या पदार्थात जितके जायफळ घालू साधारण तेवढी कॉफी! आहाहा काय समिकरण होते! एखाद्याचे कॉफीचे व्यसन सोडवायचे असेल तर हेconcoctionप्यायला द्यावे! तेव्हा मला शोध लागला 'मला स्ट्रॉंग, अगोड कॉफी आवडते.'

साधी कॉफी उकळून करुन नीट प्यायला खूप कंटाळा यायला लागला तेव्हा मम्मीने 'फेटलेली' कॉफी करायला शिकवली. ही अत्ताची रेसिपी मम्मीच्या जायफळ कॉफी आणि फेटलेली कॉफी याचे कॉंबीनेशन -
Coffee+Sugar beaten
१ टेबल्स्पून इंस्टंट कॉफी
१ टीस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त करावी)
३/४ कप दूध (मी १% दूध किंवा सोयामिल्क वापरते)
१/४ कप पाणी
१ चिमुट जायफळ (खिसायचे असेल तर १ वेळा बारीक खिसणीवरून फिरवणे)

कृती - एका लहान पातेल्यात दूध, पाणी एकत्र करुन उकळायला ठेवावे. ते साधरण गरम झाले की त्यात जायफळाची पावडर घालावी. गॅस बारीक करुन दूध उकळायला ठेवावे. त्याचवेळी एका कपमधे कॉफी आणि साखर एकत्र करावी. त्यात साधारण १/२ टीस्पून पाणी घालून स्टीलच्या चमच्याने मस्त फेटायला सुरुवात करायची. पाणी कमी वाटत असेल तर अगदी थेंबभर घालावे. थोड्यावेळाने त्या मिश्रणाचा रंग तयार कॉफी सारखा दिसेल . आत्तापर्यंत दूध पाणी नीट उकळले असेल. ते उकळते दूध अर्धे त्या घोटलेल्या कॉफीमधे घालून नीट ढवळावे. उरलेले दूधही घालून नीट ढवळावे. वरती अगदी पातळ फेसाचा थर येईल.

Coffee is Ready!

टीप - १. एका मैत्रीणीने सांगितलेली टीप म्हणजे दूधात कॉफी घालून दूध उकळायचे नाही.
२. आवडत असेल तर पूर्ण दूधाची कॉफी करायला हरकत नाही.
३. साखर घालायची नसेल तर नुसती कॉफी घोटली तरी चाले पण त्यात १/२ चच्याऐवजी १/४ चमचा पाणी घाला.

This recipe is on its way to Aparna's Think Spice - Nutmeg event

(Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/coffeebreak%21)

Comments

 1. This proportion of 1 tbsp coffee + 1 tsp sugar is just like mine!
  Ghotleli jaiphal coffee....bliss.

  ReplyDelete
 2. कित्ती दिवस झाले ही घोटलेली कॉफी पिऊन! रोज सकाळी घरातून निघायच्या गडबडीत मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेली ती uninspiring कॉफी पिऊन पिऊन कॉफीचा ऑलमोस्ट कंटाळा यायला लागला होता. आजच संध्याकाळी जायफळ घालून घोटलेली कॉफी करणार आहे मी. त्याची सर स्टारबक्सला सुद्धा नाही, खरंच :-)

  ReplyDelete
 3. Thanks for your coffee, Mints.
  Nutmeg in coffee is new to me and sounds quite interesting. Shall definitely try it.

  ReplyDelete
 4. TC - great ppl think alike ;)

  Priya - Keli ki naahI?

  Aparna - Try it out you will like this unusual use of nutmeg :)

  ReplyDelete
 5. hey! phetleli coffee baddal same pinch!! :) pan mi jayphaL nahi ghalat.. somehow ti filter coffee yete dolyasamor.. pan ata instant coffee wid nutmeg nakki try karnar..

  ani priya la sahamt.. microwave madhe coffee agadi bekar lagte..fetleli chi maja nahi tyat! :)

  ReplyDelete
 6. Bhagyashree - :) once in a while when i am not in rush to go anywhere, I treat myself with this one or else same old dip dip tea or instant coffee in microwave :(

  ReplyDelete
 7. i always drunk this type of coffee,,, i love all types of coffees....

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts