डाळवांगे (Eggplant Daal)


(Link to English Recipe)माझ्या दोनही आज्ज्या अप्रतीम स्वयंपाक करायच्या. हे डाळवांगे हाही प्रकार माझ्या कराडाच्या आजीकडे पहिल्यांदा खाल्ला. आमच्या घरी पप्पा वांगी खात नाहीत त्यामुळे क्वचितच वांग्याचे पदार्थ होत. भरीत, भरले वांगे हेच प्रकार बरेचदा होत. वांगे-बटाटे रस्सा कधीतरी मधेच. डाळवांगे अगदीच नाही कारण मग पप्पांसाठी वेगळे काहीतरी करावे लागायचे आणि तेवढा मम्मीला सकाळी वेळ नसे. कधीतरी आजीकडे गेले की मग डाळवांगे खायला मिळायचे. माझे सगळे मामा एक नंबर वांगे खाऊ त्यामुळे मम्मीला आ़णि आज्जीला त्याचे बरेच प्रकार येत. त्यातलाच हा एक प्रकार. धड भरल्या वांग्याला चालत नाहीत ना धड भरीत करता येत अशी वांगी असतील तर हा प्रकार चांगला होतो.Eggplant Daal३-४ मध्यम आकाराची वांगी

१ वाटी तूरडाळ

१ लहान लिंबाएवढी चिंच

१/२ लहान लिंबाएवढा गूळ

१ टेबलस्पून कांदा लसूण मसाला

१ टीस्पून धने पावडर

१/२ टीस्पून जिरे पावडर

चवीप्रमाणे मीठ

१ टेबलस्पून खोबरे

२ लसूण पाकळया

थोडी चिरलेली कोथिंबीर

पाणी लागेल तसे.फोडणीसाठी -

२ टेबलस्पून तेल

जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ताकृती - वांगी धुवुन चिरुन एका वांग्याच्या ८-१० फोडी होतील अशी चिरुन घ्यावीत. चिरलेली वांगी एका बाऊलमधे पाण्यात घालून ठेवावीत. तूरडाळ धुवुन त्यात २ कप पाणी घालावे. त्यात चिरलेली वांगी पाण्यातुन काढुन निथळून घालावीत. कुकरला ३ शिट्ट्या करुन शिजवुन घ्यावे. खोबरे, लसुण आणि थोडी चिरलेली कोथिंबीर बारीक करुन घ्यावे. चिंच एका बाऊलमधे घालून त्यावर गरम पाणी ओतुन ठेवावे. कुकरचे प्रेशर उतरले की एका पातेल्यात तेल तापायला ठेवावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी.त्यात वाटलेला लसुन खोब-याचा गोळा घालावा. अगदी हलकेच परतावे. लसुण-खोबरे करपता कामा नये. त्यात शिजलेले डाळ-वांगे घालावे. मीठ, कांदा लसुण मसाला, गुळ घालावा. भिजवलेली चिंच कुस्करुन कोळ काढुन तो पण डाळीत घालावा. गरज असेल तर १/२ वाटी पाणी घालावे. नीट उकळी आणुन वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम भाताबरोबर किंवा गरम चपातीबरोबर ही डाळ छान लागते.टीप - १. चिंच आणि गूळ वगळले तरी ही डाळ छान लागते. आजी बरेचदा तशीच करत असे.

२. वांग्याऐवजी दोडक्याची एखाद्या दोडक्याच्या फोडी घातल्या तर त्याला डाळ-दोडका म्हणतात आणि त्याची चवही अप्रतीम लागते.
Comments

 1. वांग्याचा नवीनच प्रकार वाचतोय. नक्कीच झक्कास लागत असणार.

  आमच्या हायकींग ग्रुप मधे नित्सुरे नावाचे एक वय वर्षे ७५ ची ग्रुहस्थ होते. रात्री मुक्कामाला पोचल्यावर ते लाकडे जमवुन चुलीवर स्वयपाक करीत असत. आज ही पोष्ट वाचली आणि त्यांनी वाघाड धरणा कडे मुक्कामाला केलेली काटेरी वांग्याची भाजी व कधीतरी कुसुरला केलेले वांग्याचे भरीत आठवले.

  ReplyDelete
 2. wow...dalvange...majhe khupch fav aahe...maheri gelyavar farmaish aste majhi aaikade nehami...recp madhe thodasa farak aahe ...chna dal vaparto amhi...mala tuza blog khup aavdto vachyla...thanks...

  ReplyDelete
 3. माझ्या लाहान्पणाची आठ्वण झालि माझी आई सुड्दा खुप चांगले डाळ वांग करावयाचि. आजच बायकोला तुमच्या पध्ध्तीप्रमाणे दाळ वांग कराव्यास संग्णार आहे.

  ReplyDelete
 4. माझ्या लाहान्पणाची आठ्वण झालि माझी आई सुड्दा खुप चांगले डाळ वांग करावयाचि. आजच बायकोला तुमच्या पध्ध्तीप्रमाणे दाळ वांग कराव्यास संग्णार आहे.

  ReplyDelete
 5. Sounds good, and looks good!! Lovely eggplants have started to flood our markets, so I have to try this out soon.

  ReplyDelete
 6. Harekrishnaji - tumhi tari nakkich khavun pahile pahije he. aaNi tumachI paN vaaMgyaachI post lik keli ti pahili. mast aahe.

  Sonu - Thank you :)

  Sunil Keskar - :) maajhya paddhatIne kelele vaaMge aavaDale kI naahI te saaMgaa.

  ET - Yes that 'flood' reminded me of lots of the dishes my mom used to make.

  ReplyDelete
 7. सुंदर..सुंदर! गावच्या जेवणाची आठवण झाली! :-)

  ReplyDelete
 8. Lay Bhari mazya aaji chya hatcha Dalvang Athavla mee hi karadkar :)

  ReplyDelete
 9. कालच हि रेसीपी करून पाहीली एकदम मस्त झाली घरी सगळ्यांना आवडली बरेंच दिवसापासून करायचं डोक्यात होत काल जमल.
  ब्लॉग पण खूप आवडला. माझ्यासारख्या नवीन असणाऱ्यानसाठी छान आहेत सोप्या सोप्या रेसिपी.

  स्मिता

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts