रंजका (Ranjaka)

Here is link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/menshinhindia.k.a.ranjaka


बेळगाव/हुबळीकडे एक 'मेणशिन हिंडी' (मेणशीन - मिरच्यांची हिंडी - चटणी) म्हणुन लाल मिरचीचा प्रकार होतो. यालाच काही भागात 'रंजका' म्हणतात. अप्पे,धिरडी, डोसे यांच्याबरोबर ही चटणी अप्रतीम लागते. ब्रेडला थोडे बटर वगैरे लावुन पण मस्त लागते. पिकलेल्या लाल मिरच्या वाळायच्या आधी ब-याच घरातुन हा प्रकार वार्षीक साठवणीचा प्रकार म्हणुन केला जातो. प्रमाण प्रत्येक घराचे थोडेफार वेगळे असते पण मुळ साहित्य तेच. एखादेवेळी गरज असेल तर लाल मिरच्या लिंबाच्या रसात भीजत ठेवुन पण ही चटणी करता येते. इथे दिलेले प्रमाण अगदी थोड्या प्रमाणात करुन पहाण्याइतकेच आहे.

Ranjaka

(चटणी करताना स्वतःच्या जबाबदारीवर करावी आणि खावी. थाई मिरच्या अतिशय तिखट असल्याने सांभाळून हाताळाव्यात.)

१०-१२ लाल ताज्या मिरच्या (मी साध्या लाल मिरच्या वापरल्या. थाई मिरच्या ४-५ पुरतील)
१ मोठे लिंबु
एका मोठ्या लिंबाएवढा गुळ
चवीपुरते मीठ

कृती - मिरच्या धुवुन कोरड्या कराव्यात. लिंबु धुवुन कोरडे करावे. साधारण अर्धा तास कोरड्या हवेला सुकु द्यावे. लिंबाचा रस एका कोरड्या वाटीत काढुन ठेवावा. मिक्सरच्या भांड्यात देठ काढलेल्या मिरच्या गुळ, मीठ एकत्र वाटावे. वाटत असताना गरजेप्रमाणे लिंबुरस वापरावा. वाटीत/बरणीत काढताना उरलेला लिंबुरस मिसळावा. हे सर्व करताना मिक्सरचे भांडे, मिसळायचा चमचा, वगैरे नीट कोरडे पुसुन घ्यावे. असे केल्याने रंजका बरेच दिवस टिकतो.

(ऐनवेळी करण्यासाठी लाल मिरच्या भाजुन घेउन करावे. पण ही चटणी टिकेल की नाही माहीती नाही.)
ही लाल चटणी सनशाईनमॉम च्या 'Food In Color: Red' साठी!


Comments

 1. बापरे! हाय हाय.....!!!

  पण आम्हा विदर्भातील लोकांना नं गूळ नाही आवडत प्रत्येक गोष्टीत! थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या तर? जास्त 'रंजक' होइल असे वाटते!

  ReplyDelete
 2. Thanks for the spicy chutney!! I am sure this is something my husband is going to love!

  ReplyDelete
 3. Ashwini - ag mI kadhi lasun ghatala nahi. tyamuLe kase lagel sangu shakat nahi. pan yatahi gul kami ghatala tari chan lagate. bagh karun ekada.

  Sunshinemom - Thank you for such a wonderful event. Try and let me know if he likes it ;)

  ReplyDelete
 4. Hi,
  Visit My blog..Magic Lamp is waiting for you !!!

  Click here

  ReplyDelete
 5. Harekrishnaji - :)

  Vaidehi - Thanks!

  ReplyDelete
 6. मला हमुस व पिट्ट्ट ब्रेड ची रेसीपी हवी आहे. कोठेतरी वाचली होती आता आठवत नाहीय. आपण सांगु शकाल काय Please ?

  ReplyDelete
 7. Harekrishnaji - Hummus/Pita bread chI recipe majhya blog var nahi. paN kuthe miLali tar nakki dein.

  ReplyDelete
 8. here is another very tasty recipe for ranjaka. blend together fresh red chillies , sait and lemon juice. and then put tadka with enough oil (a bit more) fenugreek powder, turmeric and hing(asafoeteda). tastes too good.

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts