कांदा बटाटा रस्सा (Kanda Batata Rassa)

(Link to English Recipe)


(left to right in the picture) Kanda Lasun Masala, Kaccha Masala, Malwani Masala, Flax Seed Chutney.

महाराष्ट्रात संक्रांतीच्या सणाच्या हळदीकुंकवाला काहीतरी वाण देण्याची पद्धत आहे. यावर्षी मला पण आमंत्रण होते अशाच एका संक्रांतीच्या हळदीकुंकवाचे, द कुकरकडे! तिच्याकडे जाण्यापूर्वी उत्सुकता होती की काय काय खायला मिळणार याचे! एका फूड ब्लॉगरकडे जाण्यात तो एक मोठा आनंदाचा भाग असतो. अपेक्षेप्रमाणे तिने बरेच पदार्थ केले होते फ्रुट पंच, सामोसे, कोकोनट मॅकरून्स आणि बरेच काही. आणि माझ्यासाठी खास केलेला ऑरेंज केक (याची रेसीपी ती देणार आहे असे तिने प्रॉमिस केलेय :) ). खाणे पिणे झाल्यावर पुढची उत्सुकता म्हणजे आता ही वाण काय देणार याची. मला वाटले होते की ती काहीतरी फळ वगैरे देईल किंवा एखादे भांडे असले काहीतरी. पण तिने ४ मसाल्याच्या पॅकेट्सची गिफ्टबॅग दिली. मी एकदम आनंदाने टुण्णकन उडीच मारली. तिने दिलेल्या मसाल्यात कोल्हापुरी कांदा लसुण मसाला, मालवणी मसाला, कच्चा मसाला आणि जवसाची चटणी असे पॅक होते. पण गेला पूर्ण महिनाभर काहीना काही चालू होते त्यामुळे आज्जीबात मसाल्यांना हात लावायला वेळ झाला नाही. आणि जेव्हा वेळ झाला तेव्हा खूप एलॅबोरेट काही करुन पहाण्यापेक्षा साधे काहीतरी केले तर मसाल्याची चव नीट कळेल असे वाटल्याने मी साधा कांदा-बटाटा रस्सा केला, तीच ही रेसीपी. यात मी कोल्हापुरी कांदा लसुण मसाला वापरला आहे. काही वर्षापूर्वी ही रेसीपी मी मायबोलीवर टाकली होती. तिथे बर्‍याच लोकाना आवडली होती म्हणे!




४ मध्यम बटाटे
१ मोठा कांदा
२ मोठे टोमॅटो
१-२ टेबल्स्पून कांदा लसुण मसाला (चवीप्रमाणे कमीजास्त करावा)
मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून आले लसुण पेस्ट
फोडणीसाठी २ टेबल्स्पून तेल, जिरे, मोहरी, हळ्द, हिंग कढीपत्ता
थोडी चिरलेली कोथींबीर

कृती -

कांदे, बटाटे आणि टोमॅटोच्या एकसारख्या फोडी करुन घ्याव्यात. एका पातेल्यात तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी आणि कांदा घालावा. कांदा लालसर रंगावर परतून घ्यावा. त्यात चिरलेला टोमॅटो घालून ३-४ मिनीटे परतावे. त्यावर मीठ, कांदा लसुण मसाला, मीठ, आले-लसूण पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात बटाट्याच्या फोडी घालुन एखादा मिनीट परतून त्यावर एक कप गरम पाणी घालावे आणि गॅस मध्यम करुन भाजी नीट शिजु द्यावी. गरज असेल तर थोडे पाणी घालावे. बारीक गॅसवर जर झाकण न ठेवता भाजी नीट शिजवली तर तेलाचा तवंग येतो अगदी थोडे तेल घातले असले तरी. मोठ्या आचेवर भरभर उकळले तर मात्र तेलाच तवंग येणार नाही पण चवीत फारसा फरक पडत नाही. शेवटी कोथिंबीर घालुन एक उकळी आणावी. गरम गरम रस्सा भात, चपातीबरोबर एकदम मस्त लागतो.

टीप -
१. गरज असेल तर थोडे (१ टेबलस्पून) दाण्याचे कुट घालायला हरकत नाही.
२. या भाजीत साखर किंवा गूळ घालू नये.
३. आले लसूण एकत्र पेस्ट नसेल तर थोडा आल्याचा तुकडा आणि एखादी लसूण पाकळी एकत्र वाटुन घ्यावे.
४. कांदा लसुण मसाला नसेल तर काळा मसाला आणि लाल तिखट वापरायला हरकत नाही. काळा मसालाही नसेल तर गरम मसाला चालेल.

Comments

  1. Kanda Batata Rassa ekdam mast disat aahe Mints.. Tondala pani sutale aahe. Ag tu chukun Sahity don wela lihile aahe

    ReplyDelete
  2. Thanks Trupti for pointing out mistake.

    ReplyDelete
  3. कांदा बटाटा रस्सा मस्त वाटतोय एकदम. मी नेहमीच दाण्याचा कूट घालते. सही... उद्याच करते पुरीबरोबर :)

    ReplyDelete
  4. मजा आहे. काल माझ्या बायकोनीही ही भाजी केली होती. पुरी बरोबर काय टॉप लागली

    ReplyDelete
  5. Khaugiri, Welcome to my blog.

    Harekrishnji, :D

    ReplyDelete
  6. Tuzi recipe wachun kaal hi bhaji keli. Chaan zali hoti. Only ingredient I did not have was - kanda-lasun masala. Will you be able to provide a substitue for that?

    BTW tuza ha food blog aflatoon ahe. Ani ho, I have a little secret to share with you. "I visit this blog very frequently. Almost daily!" ;)

    ReplyDelete
  7. hi Mrinal,
    I would suggest using kaaLaa masaalaa + red chili powder instead of Kanda-lasun-masala. I will add info in the post itself.

    And thank you for compliments!

    ReplyDelete
  8. Welcome to my blog and thanks Gayatri!

    ReplyDelete
  9. As promised here it is:
    http://the-cooker.blogspot.com/2009/03/good-day-sunshine.html
    I knew you'd prefer masale over a 'bhanda' anyday!!

    ReplyDelete
  10. TC, thank you! and yes masale over bhande - anytime :)

    ReplyDelete
  11. पाणि सुटलं तोंडाला फोटो पाहून! खलास रंग आलाय!:-)
    ह्या प्रकारामध्ये मला दाट रस्सा आवडतो. म्हणून मी ३ बटाट्यांच्या फोडी घेतल्या तर एक बटाटा मायक्रोवेव्हमध्ये उकडून तो बारीक चुरून टाकतो. सही दाट होतो. मी चुकत असेन तर सांग हं! मी काही रेग्युलरली कुकिंग करीत नही.

    ReplyDelete
  12. hi...i am so glad i came to this blog, through meera's blog..you have such good maharashtrain recipes..thank you so much ... i also have a request.. please can you post kanda lasun masala .. i reside in Canada.. but i do have all the ingredients.. thanks

    ReplyDelete
  13. मजा आहे. काल माझ्या बायकोनीही ही भाजी केली होती. पुरी बरोबर काय टॉप लागली

    ReplyDelete
  14. Thank you for the recipe ... I am 22 year old guy studying engineering ... Satat mes ch khaun kantala alela ... aaj hi bhaji banavali ... Aaichi athavan jhali ... Thank you so much ... Atapasun mi jevan banvaych tharvalay ... Wish me luck

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.