Mexican Street Food - Corn with Chili lime

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/cornchililime

साधारण २ वर्षापुर्वीची गोष्ट असेल. मला कामानिमित्त १५ दिवस मेक्सिकोला रहावे लागले होते. तिथे माझ्याबरोबर काम करण्यार्‍यांना फार काळजी पडली होती की ही पूर्ण शाकाहारी बाई इथे कशी जगणार अन काय खाणार. चीज नाही, दूध नाही असले काय मिळेल हिला खायला. पण माझे फार कुठे काही आडले नाही. पपई, आंबे, कलिंगड, चिक्कु, पेरू असली फळे, वेगवेगळ्या प्रकारे नटवलेला मका यावर माझे जेवण पूर्ण होत होते. मी आत्ता लिहितेय ती मक्याची रेसिपी माझी त्या वास्तव्यात रोजच्या खाण्यातली होती. मस्त तिखट-आंबट अशा चवीचे मक्याचे दाणे खायला मजा येते. भारतातल्या प्रमाणे मक्याचे कणीस भाजणे माझ्याकडे गॅस नसल्याने मला शक्य होत नाही. अशावेळी हे दाणे वाटीत घेउन खायला मस्त वाटते. असाच प्रकार पुढे मी भारतात गेल्यावर कॉर्न कॉर्नर मधे पण खाल्ला. तो पण चांगला लागला. पण या कॉर्नला जो मस्त लाल रंग येतो ना तो भारतातल्या कॉर्नला नाही!
Corn With Chili Lime


३ कप पाणी
२ कप मक्याचे दाणे
१ लिंबाचा रस (लाईम वापरावे लेमन नको)
१ टेबल्स्पून लाल तिखट
२ टीस्पून मीठ

कृती - एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की मक्याचे दाणे त्यात घालून गॅस बारीक करावा. मिरची पावडर, मीठ, आणि लिंबाचा रस एकत्र करुन पेस्ट बनवावी. साधारण भजीच्या पिठाइतके सरसरीत असावे. वाढताना एका कप अगर ग्लासमधे २ डाव शिजलेले मक्याचे दाणे घालावेत पाणी शक्यतो येऊ देऊ नये. त्यावर १/२ टीस्पून मिरची पेस्ट घालावी वरून अजुन एक लिंबाची लहान फोड द्यावी. खाण्यासाठी एक चमचा द्यावा. मिरची पेस्टचे भांडे समोर ठेवुन आपल्याला हवी त्याप्रमाणात पेस्ट घालून गरमागरम मक्याचा आस्वाद घ्यावा.
टीप -
१. मका खूप शिजवू नये.
२. मी मक्याच्या दाण्याचे फ्रोझन पाकीट आणते.
३. रंगाने लाल आणि तिखटाला कमी असलेले ब्याडगी, काश्मीरी, पापरीका या प्रकारातले कोणातीही मिरची पावडर वापरा.
४. लहान मुलाना आवडणारा प्रकार आहे हा. पण येवढे तिखट लहान मुलाना देणे शक्य नाही. अशावेळी टोमॅटो प्युरी २ चमचे आणि अगदी चवीपुरते लाल तिखट चिमुटभर घातले तर घातले नाहीतर नाही असे करता येते.ही रेसीपी वैशालीच्या It's a Vegan World - Mexican साठी ....


Comments

 1. हे नक्कीच मस्त लागत असणार

  ReplyDelete
 2. Nice colors you got goin' on there :) The corn looks tempting!

  ReplyDelete
 3. Mints, I could guzzle up that beautiful glass of spicy corn right here right now. It looks delicious and mouthwatering. Thanks for sending it in to IAVW Mexican.

  ReplyDelete
 4. Harekrishnji, ho mast lagate ekdam!

  Priya, Thank you!

  Vaishali, Thanks :)

  ReplyDelete
 5. ... I KNOW it tastes delicious :)

  ti 'steam-fresh' chi packets aaNali tar makaa paaNyaat ghaalaaychi vagaire hi garaj naahi. packet microwave madhye Taakaaycha. :)

  ReplyDelete
 6. Parag, are te paaNyatun kaaDhale kI daaNaa thoDaa Taporaa hoto. aaNi kiMchIt paaNI rahaatech tyaa makyaat aaNI mag te khaaNe sope paDate (ase malaa vaaTate)

  bakI kasaa aahes?

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts