मुळ्याच्या पानांची भाजी

पांढर्‍या मुळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी अप्रतीम लागते. आणि करायला एकदम सोपी आहे. इथे फार्मर्स मार्केट मध्ये खूप लोक मुळा घेतात पण पाने नको म्हणुन भाजिवाल्याकडेच टाकून जातात. ते शेतकरी मग माझ्यासारखीने विचारले कि लगेच ढिग पिशवीत घालून देऊन टाकतात. ही भाजी बरीच चोरटी होते म्हणजे भाजीचा ढीग दिसला तरी शिजवून  भाजी अगदी एवढीशीच होते.


मुळ्याचा पाला १ पेंडी (साधारण ४-५ मुळ्यांचा कोवळा पाला)
१/४ कप हरभरा डाळ
१ लहान लाल कांदा
३-४ लहान लसूण पाकळ्या
कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
२-३ टेबलस्पून तेल
नेहेमीचे फोडणीचे साहित्य - जिरे, मोहोरी, हिंग, हळद

कृती -
हरबरा डाळ साधारण १ तासभर भिजत घालावी. पटकन करायची असेल तर थोडी शिजवून घ्यावी.
पांढर्‍या मुळ्याचा पाला निवडून त्याचा कोवळा कोवळा पाला फक्त घ्यावा. मधला दांडा काढुन फेका, फक्त हिरवी पाने पाने घ्या.
स्वच्छ धुवुन पाला चिरुन घ्यावा.
कांदा मोठा चिरुन ठेवावा. लसूण मोठा ठेचून घ्यावा.
कढईत तेल तापवून त्याची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. फोडणीत ठेचलेला लसूण आणि कांदा घालून सोनेरी रंगावर परतावे.
त्यात भिजवलेली डाळ पाणी काढून टाकून घालावी. पाण्याचा हबका मारत ती अर्धी कच्ची शिजवून घ्यावी.
आता त्यावर वाफवलेली भाजी घालून कांदा लसूण मसाला, मीठ घालून नीट परतावे.
झाकण ठेवून एक वाफ काढावी.
शेवटी दाण्याचे कूट मिसळावे. गरम गरम भाकरीबरोबर खावे.

टिपा -
१. भाजी भरपूर असेल तर डाळ वगळण्यास हरकत नाही. कांदा मात्र घालावाच. भरपूर घालण्यास हरकत नाही.
२. या भाजीला तेल जरा जास्तीचे लागते.
३. करडईची भाजी, बीटची पाने, टर्नीपची पाने यांची अशीच भाजी करता येते. 

Comments

  1. Before I forget, allow me to note this recipe which our common friend suggested: "बंगाल्यांमध्ये मुळ्याच्या पानांची जिरे-लाल मिरच्यांची मोहरीच्या तेलात फोडणी देऊन, परतून-वाफ देऊन, शेवटी ओलं खोबरं आणि किंचित साखर-मीठ घालून मस्त साधी भाजी करतात." That way I will have both as a reference. Hope you don't mind.

    ReplyDelete
  2. Had a bunch of small red radishes with plenty of greens, and made this today using those. Turned out nice and khamang! I was wondering if kale can be prepared this way, or if you have any other ideas for kale.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts