बटाट्याच्या काचर्या
(Link to English Recipe)
बटाट्याच्या काचर्या हा अगदी झटपट होणारी भाजी आहे. फक्त बटाटे आणि तिखट मीठ, थोडे तेल येवढेच लागणारे - येवढ्यातच तयार होणारा हा चविष्ट पदार्थ.
३-४ बटाटे
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी - जिरे, मोहरी, हळद, हिंग
चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट
कृती -
बटाट्याच्या साली काढाव्यात.
प्रत्येक बटाट्याचे ४ भाग करुन पातळ कापावेत आणि पाण्यात घालावेत.
जाड बुडाचे पातेले, लोखंडाचे असेल तर उत्तम, तेल घालून तापायला ठेवावे जिरे-मोहरी-हिंग-हळद घालून नेहेमीप्रमाणे फोडणी करावी.
बटाट्याचे काप निथळून तेलावर ३-४ मिनिटे परतावेत. आच मध्यम करून झाकून ठेवावेत. साधारण २-३ मिनिटांनी परत
हलवावे.
बटाटे अर्धवट शिजले असतील तर मीठ आणि तिखट घालावे. व्यवस्थित परतून परत एकदा झाकण लावून बटाटे पूर्ण शिजू द्यावेत.
गरम गरम पोळी आणि लोणच्याबरोबर फस्त करावेत.
टीपा -
- मी यात थोडेसे दाण्याचे कूट घालते.
- कधी कधी तिखटऐवजी थोडा दाबेली मसाला घालून ही भाजी करते. ते अप्रतीम लागते.
- ही भाजी, टोमॅटो, काकडी, हिरवी चटणी घालून sandwiches करते ते मस्त पोटभरीचे होतात.
mast!:-)
ReplyDeletehirvya mirchicha swaad pan mast lagto yaamadhye.
अश्या सोप्या सोप्या गोष्टींची तू आठवण करून देतेस ते फार छान करतेस!
ReplyDelete