दाणे लावून हिरव्या टोमॅटोची भाजी (Green Tomato Curry with Peanuts)

(Link to English recipe)

मला आणि माझ्या मैत्रीणीला माझ्या (त्यावेळच्या) होणा-या नवा-याने जेवायला बोलावले होते. त्याच्या स्वयंपाक कौशल्याबद्दल मला फार शंका नव्हती पण तिला होती. त्यामुळे घरून जाताना ती नीट चिवडा लाडू वगैरे खाउन निघाली. त्याने आमच्यासाठी दहीभात, ही भाजी, विकतच्या पोळ्या, पापडाचा खुळा, आणि बरेच काय काय केले होते. तिला बघुनच धक्का बसला! अशी झाली माझी आणि या भाजीची ओळख. पुढे लग्न झाल्यावर सासरी गेले तेव्हा सासुबाईनी आम्हाला ही भाजी करून घातली. सढळ हाताने तेल, दाणे घालून केलेली भाजी अप्रतीम लागत होती. आई लोकानी केलेल्या सगळ्याच गोष्टीना एक खास चव असते असे माझे प्रामाणीक मत आहे. आपण कितिही प्रयत्न केला तरी अगदी तशीच चव येत नाही. मी नंतर नव-्याकडून ही भाजी करायला शिकले. आता जरा बरी जमते (असे नवराच म्हणतो, मी नाही!).

Green Tomato BhajI




2-3 मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो
1/3 कप तुरीची डाळ
3-4 हिरव्या मिरच्या
2-3 लसूण पाकळ्या
1 टीस्पून धणे पावडर
1 टेबलस्पून गरम मसाला
1/2 कप कोथिंबीर
3-4 टेबलस्पून शेंगदाणे
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी 2 टीस्पून तेल, जिरे, मोहरी आणि हळद
२-३ कप (किंवाभाजी सरसरीत होण्यासाठी लागेल इतके) पाणी.

कृती - डाळ धुवून घ्यावी. टोमॅटोच्या फोडी करून धुतलेल्या डाळीत घालाव्यात. 1 कप पाणी घालून डाळ आणि टोमॅटो कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. शेंगदाणे एका कढईत घालून भाजायला ठेवावेत. ते नीट भाजले गेले की काढून मिरच्या भाजून घ्याव्यात. मिरच्या, शेंगदाणे, लसुण, गरम मसाला, धणेपावडर आणि अर्धी कोथिंबीर मिकसरमधून बारीक वाटून घ्यावे. वाटण करताना अगदी थोडे पाणी घालावे. आता एका जाड बुडच्या पातेल्यात तेल तापायला ठेवावे. तेल तापले की जिरे, मोहरी , हळद घालून नीट फोडणी करावी. त्यात वाटलेला मसाला घालून परतायला घ्यावा. मंद आचेवर साधारण 4-5 मिनीटे मसाला हलवत राहावा. नीट परतला गेला की कुकरमधे शिजलेले डाळ-टोमॅटो त्यात घालावे. साधारण एक कप पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण ढवळावे. एक उकळी आणावी. थोडे सरसरीत हवे असेल तर उकळण्यापुर्वीच लागेल इतके पाणी घालावे. वरुन कोथिंबीर घालून भात, भाकरी, पोळी बरोबर गरम गरम वाढावे.

टीप - 1. टोमॅटो घेताना नीट मोठे रसदार बघून घ्यावेत.
2. ही भाजी थोडी तिखट केली तरच छान लागते.
3. यात गुळ, साखर वगैरे अजीबत घालू नये.
4. ही भाजी रसभाजीसारखी सरसरीत असावी खूप दाट किंवा आमटीसारखी पातळही नसावी.

Comments

  1. अरे वा! तूही टोमॅटो सप्ताह साजरा करतीयेस की काय! :)

    आणि पापडाचा खुळा म्हणजे ते पापड चुरून चटणी-टाईप तोंडीलावणं करतात तेच का? जरा elaborate असेल तर रेसिपी येऊंद्यात की :D

    नसल्यास इथे सांगितलंस तरी चालेल. Me is just curious :)

    ReplyDelete
  2. I cannot believe the co-incidence!! I just posted a green tomato bhaji too.

    ReplyDelete
  3. OMG! Such a co-incidence. Your bhaaji reminded me my mom's preparation :)

    ReplyDelete
  4. मिनोती, काल एकदाची केली गं भाजी! एकदम मस्त!!! डोळे मिटून तेल आणि मिरच्या घेतल्यामुळे मंडळी एकदम खुष :D दोनच टोमॅटोची केली मोठे होते म्हणून पण अजुन एखादा घेतला असता तरी खपली असती एवढी आवडली. धन्यवाद म्हटलं तर मार पडेल म्हणूनच केवळ म्हणत नाही ;) पण तुझ्या (झालेल्या) नवऱ्याला सांग त्यांची पेशल भाजी आवडली म्हणून...

    ReplyDelete
  5. whocares, Thank you for promptly writing the comment :)

    ReplyDelete
  6. I would like to try this bhaji, will surely let you know after I make it :)

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.