अननसाची कोशिंबीर (Pineapple Salad)

गेल्या वर्षी १५ दिवस कामासाठी मेक्सिकोला रहाणाचा योग आला. तिथे असताना रस्त्याच्या बाजुला फळांचे बोटाएवढे तुकडे कपमधे घालुन ठेवलेले असत आणि आपण जेव्हा विकत घेऊ तेव्हा त्यात आवडीप्रमणे तिखटाची पेस्ट, मीठ घालुन देत असत. ते गोड फळांवर तिखट घालुन खाणे कसेतरी वाटले होते. पण त्याची चटक लागली माझी बरीच जेवणे त्यावरच झाली. परत आल्यवर त्यात थोडा बदल करुन तयार झालेली ही कोशिंबीर.

Pineapple Salad

१.५ कप आननसाचे लहान तुकडे
१ टेबलस्पून ओले खोबरे
२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
किंचीत साखर, चवीप्रमाणे मीठ
१/२ टीस्पून लाल तिखट

कृती - वरील सर्व साहित्य एकत्र करुन वाढावे.

टीप - १. अननस शक्यतो ताजा घ्यावा.
२. कॅनमधला अननस त्यात घातलेल्या ज्युसमुळे खूप गोडसर असतो, त्यामुळे तो वापरवा लागलाच तर साखर नाही घातली तरी चालेल.
३. थोडे दाण्याचे कुट घातले तर मधुन मधुन मस्त क्रंची लागते.

Comments

 1. खूप मस्त आणि चविष्ट रेसिपी आहे. मी आपल्या ब्लॉगचा समावेश माझ्या ब्लॉगवर केलेला आहे. आपण एवढ्या सगळ्य़ा रेसिपीज कुठे शिकलात याचे कुतुहल आहे.

  ReplyDelete
 2. सहिये :)
  आता पब्लिक डिमांड, ऑलिव्ह आणि मॅकरोनी सॅलेड

  ReplyDelete
 3. Morpees - Thank you! Curiosity is mother of invention of my cooking :)

  Shyamli- Public demand ghyayala harakat navhati pan majhe eating restrictions khup aahet so khup goshti mi karun pahu shakanar nahi.
  Macroni Salad has mayonnaise and i don't eat it :)

  ReplyDelete
 4. मग त्याचं व्हीगन वर्जन इन्वेंट कर की.... :p असे सोडणार नाही तुला आम्ही! ;-)

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts