भाताचे थालीपीठ (Rice Thalipeeth)

घरी कोणाला जेवायला बोलावले तर पांढरा भात केला जातो. आणि तो शिल्लक राहीला तर खाणे माझ्या जिवावर येते. परवा अचानक असे झाले तेव्हा मला माझ्या एका दूरच्या मावशीने शिकवलेले भाताचे थालीपीठ आठवले आणि लगेचच करुन पाहीले.

Rice Thalipeeth

उरलेला शिळा भात
हिरव्या मिरच्या
थोडेसे जिरे
तांदळाचे पीठ
मीठ
थोडीशी कोणतीही पालेभाजी चिरुन

कृती - जिरे आणि मिरच्या मिक्सरमधेबारीक करुन घ्याव्यात. शिळा भात थोडे पाणी शिंपडुन मळुन घ्यावा. त्यात वाटलेली मिरची, चिरलेली पालेभाजी मीठ घालुन नीट एकत्र करावे. त्यात लागेल तसे तांदळाचे पीठ घालावे. थोडे थोडे पीठ घालुन थालीपिठाच्या पिठाप्रमाणे गोळ होईल इतकेच पीठ घालावे. गॅसवर तवा तापायला ठेवावा. पोळपाटावर एक पेपर नॅपकीन किंवा स्वच्छ पंचा ठेवुन त्याला पंचाला थोडे पाणी लावुन घ्यावे. त्यावर बनवलेल्या पिठाचा गोळा ठेवून तो किंचीत पाणी लावून थालीपिठाप्रमाणे थापावा. थापून झाल्यावर थालीपिठाला एखादेतरी छिद्र पाडावे. ते थालीपीठ गरम तव्यावर पंच्याने उचलून उलटे टाकावे आणि वरून पंचा हळुहळु सोडवुन घ्यावा. थोडेसे तेल टाकून थालीपीठ मंद आचेवर दोन्हीकडुन नीट भाजुन घ्यावे.
गरम गरम असतानाच केचप किंवा चटणीबरोबर खायला द्यावे.

टीप - १. उरलेला भात शक्यतो फ्रीझमधे न ठेवता थालीपिठासाठी वापरावा.
२. तांदळाचे पीठ नसेल तर बेस, मैदा, गव्हाचे पीठ यापैकी कोणतेही पीठ वापरले तरी हरकत नाही.
३. कोणतीही पालेभाजी नसेल तर कोथिंबीर, शिजवलेली कोरडी पालेभाजी, कसुरी मेथी यापैकी जे असेल ते घातले तरी चालते.

Comments

 1. एक नवीन आगळीवेगळी रेसिपी तुमच्या दूरच्या मावशीने तुम्हाला शिकवली व ती आमच्यापर्यंत तुम्ही पोचवली त्याबद्दल आपले आभार

  ReplyDelete
 2. हे काय भलतेच ? भाजणीचे थालीपीथ ठावुक होते, खाण्यातले होते , फो चा भा आवडीचा, पण ? चक्क भाताचे थालीपिठ ?

  ReplyDelete
 3. This is great minoti..I always use to search reciipe for finishing white rice... was bored with other ones.. this is nice

  ReplyDelete
 4. मुद्दाम भात उरवून करून बघितले. मस्तच!
  कांदापात टाकल्याने "चायनिज" थालीपीठ झाले.

  ReplyDelete
 5. Morpees - thanks.

  Harekrishnaji - karun bagha - nakkI aavaDel.

  Saneeka - try it out - you have eaten it ;)

  Ashwini - aavarjoon karun baghitales ani sangitales. Thank you :)

  ReplyDelete
 6. mints mastch ey recipe...aajach extra bhaat banvate aani friday night cha bet tharala!!

  thanks

  rupsana

  ReplyDelete
 7. भात उरला की फो.भा. दही भात हे प्रकार बऱ्याच वेळा केलेत. हा प्रकार नविन वाटला आणि परवा करुन पाहिला. आम्हाला खुप खुप आवडला. ह्या रेसीपी साठी खुप खुप धन्यवाद !

  आम्ही बनवले तर थालीपिठाचे तुकडे होत होते. एकसंध ठेवण्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागेल का?

  बाकी ह्या ब्लॊग वरील सर्वच पाककृती छानच आहेत.

  ReplyDelete
 8. Anonymous, tandulache peeth kmi paDale asel yevadhe ekach kaaraN disate. pahile thalipeeth karatana jar tuTale tar puDhacya veli thode jasti ghalun baghave.

  ReplyDelete
 9. palebhaji nahi ghatali tar chalate ka??

  ReplyDelete
 10. Mrunalini,
  ho palebhaji nasel tari chalel. kothimbeer vaparali tari chalel. kahihi nahi ghatale tari chalate.

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts