एक वर्ष पूर्ण होताना ...

आज गुढीपाडवा! गेल्यावर्षी गुढीपाडव्याला ह्या ब्लॉगची सुरुवात केली. सुरुवात करताना माझ्या मैत्रीणींसाठी मी केलेल्या आणि त्यांना आवडणा-या पदार्थांचे एकत्रीकरण एवढाच हेतू होता. पुढे माझ्या लक्षात आले की मी करते त्या पदार्थांमधे तेल, तिखट, कमी प्रमाणात असते. पदार्थ कमी वेळात, आरोग्याच्या दृष्टीने कसा करावा हा हेतू सुरुवातीला नसला तरी साधारण १० एक रेसिपी लिहिल्यावर ते तसे लिहावे असे वाटायला लागले आणि तशा रेसिपीज लिहायला सुरुवात केली. माझ्या स्वयंपाकावर माझी मम्मी, आज्जी, काकू मैत्रीणी, माझा भाऊ अशा ब-याच जणांचे संस्कार आहेत. काही काही रेसिपीज मी स्वत: शोध लावुन केलेल्या आहेत तर काही कोणाच्या रेसिपीज थोडा फर फ़रक करुन मी वापरल्या आहेत. योग्य त्या व्यक्तीला योग्य ते श्रेय मी दिलेले आहेच.

अलीकडे संगीताने Vegan Recipes लिहीशील का किंवा लगेल तसा सल्ला देशील का असे विचारले तेव्हा माझ्या लिहिण्याला अजुन एक दिशा मिळली. दूध आणि दुधापासुन तयार होणा-या पदार्थांमुळे कोणते दुष्परीणाम होतात ते माहीती असल्यामुळे मी मला ते करायला काहीही कठीण वाटले नाही. त्यानंतर मी दूध, दह्यापासुन केलेले पदार्थ लिहिणार नाही असे मुळीच नाही. माझ्या स्वत:च्या रोजच्या आहारात दूध, दही फार वापरत नसल्याने त्या प्रकारच्या पदार्थांचे प्रमाण कमी असेल.

तूप, दही, दूध, चीज वगैरे दुग्धजन्य पदार्थ शरीराला हानीकारक असतात. त्याचप्रमाणे साखर, अती तेलकट, मैद्याच्या पदार्थांमुळेही शरीराची हानी होते. प्रत्येकाने खाण्याच्या बाबतीत थोडीफार खबरदारी घेतल्यास रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासरखे विकार अटोक्यात रहातात. याबाबतीत माझा अभ्यास अतिशय तोकड असल्याने ए तिथेच थांबवते. मी कोणाती पुस्तके, वेब-साईटस वगैरे वापरते ते हवे असेल तर ती माहीती मात्र अवश्य देऊ शकते.

मी मधे ४ वर्षे कोणतेही शिजवलेले अन्न खात नव्हते. त्याकाळात माझे स्वयंपाकाचे प्रयोग खुप बदलले. ते पदर्थ देखील इथे देण्याचा मी प्रयत्न करेन. नवीन पोस्ट मधे जमेल तसे फोटो टाकण्याचे ठरवले आहे. तो निश्चय किती टिकतो ते काळच ठरवेल. मनात बरेच काही करायचे आहे. वेळ कमी आणि सोंगे जास्त अशी माझी स्थिती असल्याने कधीतरी मधे एकही पदार्थ न लिहिण्याची शक्यता आहे.

तुम्हा सर्वाना गुढीपाडव्याच्या असंख शुभेच्छा! नवीन वर्ष तुम्हा सर्वाना आरोग्यवर्धक जावो.

Comments

 1. Mints,
  Happy New Year to you.
  When I was looking for some one who could help me and my readers with Marathi Vegan recipes, I checked all existing Marathi cooking blogs carefully. I found your blog very appealing for exact same reasons you have mentioned in this post.
  Can't wait to see your raw preperations. Also, I think readers would benefit if you can also write a little bit about "Why Raw?"

  ReplyDelete
 2. अभिनंदन मिनोती :)
  अग एवढे दिवस तुझा blog उघडायला प्रचंड वेळ लागत होता. आज मात्र पटकन उघडला.लिहित रहा रेसीपीज आम्ही वाचत आणि प्रयोग करत असतो तु्झ्या इथल्या रेसीपीज वाचुन वाचुन.

  ReplyDelete
 3. Congratulations on your blogiversary! Look forward to many more.

  ReplyDelete
 4. मिनोती, नव्या सालाच्या तुला भरभरून शुभेच्छा! हा ब्लोग दिवसेंदिवस असाच लिहिता ठेव.

  (आता माझ्या काही जबरी शंका :P)
  चीज आणि तूप हे ठीक पण दूध आणि दह्याने काय दुष्परीणाम होतात, हे लिही.
  (लहानपणापासून जबरदस्तीने का होईना पण आपण दूध, दही, तूप खावे यासाठी आईचा किती आटापिटा असतो आपल्याकडे. )

  ReplyDelete
 5. Hi,

  Navavarshachya shubheccha!

  Vaidehi

  ReplyDelete
 6. मिनोती,

  आधीचं टेम्प्लेट फार सुरेख दिसत होतं तुझ्या रेसिपी ब्लॉगसाठी. :-)

  पण असो. नियमित वाचते मी तुझा ब्लॉग. हा आणि रेशमाच्या रेघांनी पण (मला भरतकाम येत नाही, हा भाग अलाहिदा. :-P)

  न शिजवलेले पदार्थ रेसिपीजची वाट बघतेय.

  ReplyDelete
 7. Sangita, I will try to write about 'why raw'.

  Shyamli, I heard similar problem from other friends so changed the template.

  Evolvingtastes - thank you!

  GD - as a initial reading, read 'majha sakshatkari hrudayrog' by Dr. Abhay Bang and also read http://kasakaay.blogspot.com for its environmental consequences.


  Same to You too Vaidehi.

  Shraddha - The other template was taking time to load for lot of people. Thank you for your comment. I will write 'Raw Recipes' soon.

  ReplyDelete
 8. मिनोती संदर्भांबद्दल धन्यवाद. :)

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts