आळुची वडी (Alu Vadi - Savory Taro Patties)

Savory Taro Patties


माझ्या आजोळी आळुची झुडुपे खूप होती. त्यामुळे लहानपणापासुन आळुच्या पानाचे बन बघायची सवय. भारतात असताना कधी आळुची पाने विकत आणायची गरजच वाटली नाही. एकदा पाने काढली की मोठ्या पानाच्या वड्या आणि लहान पानांची भाजी लागोपाठ घरी होत असे. परदेशी रहायला आल्यावर घरच्या सगळ्या गोष्टी फार आठवायला लागतात. अशाच एकावेळी मला देसी दुकानात आळुवडीचा टिन मिळाला तो आणुन त्याच्यावर आवश्यक ते सोपस्कार करुन लग्गेच त्याचा फ़डशा पाडला. त्याची चव खुप ग्रेट वगैरे अजिबातच नव्हती पण वेळेला मिळाले. त्यानंतर कधीतरी फ्रोझन आळुवडीचा शोध लागला पण त्यातल्या तेलामुळे त्यापासुन दुरच राहु लागले. दरम्यान कधितरी चायनीज दुकानात गेले तेव्हा आळुची पाने मिळाली मग तेव्हापासुन ते चित्र-विचित्र वास सहन करत आळुची पाने आणि फणसाचे गरे आणण्यासाठी त्या दुकानात जात असे. आजकाल १-२ देसी दुकानात आळुची पाने नेहेमी मिळतात त्यामुळे वडी, भाजी करणे सोपे झाले आहे. अलिकडे केलेल्या वडीचे फोटो खाली पहाआळुची वडी करण्याच्या स्टेप्स


६ मोठी आळुची पाने
९ टेबल्स्पून बेसन
१ टीस्पून लाल मिरची पावडर
१ टीस्पून गोडा मसाला
किंचीत हळद
लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
चवीप्रमाणे मीठ, गूळ
मुठभर कोथिंबीर
१ टीस्पून धणे पावडर
पीठ भिजवण्यासाठी पाणी

वड्या वाफवण्यासाठी पाणी, शॅलोफ्राय साठी तेल.

कृती - आळुच्या पानाचे देठ काढुन मागच्या बाजुने शिरा थोड्या तासुन घ्याव्यात. पाने पाण्याच्या बारीक धारेखाली धरुन धुवावीत आणि फडक्याने कोरडी करावीत. एका बाऊलमधे बेसन, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, मसाला, हळद, कोथिंबीर, धणे पावडर, गूळ एकत्र करुन भजीच्या पिठाइतपत सैल भिजवून घ्यावे.
एका मोठ्या भाड़्यात (ज्यावर चाळण बसु शकेल असे) पाणी तापत ठेवावे. चाळणीला तेलाचे बोट पुसुन घ्यावे.
पोळपाट किंवा कटिंग बोर्ड वर सगळ्यात मोठे पान उलटे (शिरा वरच्या बाजुला दिसतील असे ) ठेवावे. भिजवलेल्या बेसनाचा अगदी पातळ थर सगळीकडुन सारखा बसेल असा त्या पानाला लावावा. तो लावून झाल्यावर त्या पानाएवढे किंवा त्याहुन थोडे लहान पान त्या थरावर ठेवावे. त्याला देखील पीठाचा थर लावावा. असेच तिसरे पान लावून पीठ लावावे. आता पानाचा शेंडा दुमडुन आणुन मुख्य पानावर चिटकवावा. तसेच कडेने पण १-१ इंच पाने आतल्या बाजुने दुमडावीत. पानाची वरची २ टोके ताच प्रमाणे चिटकवावीत. आता पानाचा आकार साधरण आयताकृती दिसू लागेल. त्या आयताची सुरळी करायला घ्यावी हलक्या हाताने दुमडत जाउन सुरळी करावी. उरलेल्या ३ पानाची पण अशीच सुरळी करुन घ्यावी. दोन्ही सुरळ्या चाळणीत ठेवुन त्यवर झाकण ठेवावे. ग.एस मोठा करून १०-१२ मिनीटे वाफ येऊ द्यावी.


Taro Roll (uncooked)

वाफवलेल्या वड्या थोड्या थंड झाल्या की सुरळिच्या अर्धा इंच जाडीच्या चकत्या कराव्यात. एका तव्यावर चकत्या पूर्ण पसरून मंद आचेवर थोडे थोडे तेल घालुन खरपूस भाजुन घ्यावात.
Patties ready for frying

टीप - १. मी एका मोठ्या आळुच्या पानाला दीड चमचा बेसन असे प्रमाण घेते. पानाच्या आकारावरुन बेसन कमी जास्त करावे.
२. अळु घेताना नेहेमी काळ्या दांड्याचा घ्यावा, कमी खाजरा असतो. आळुचा खाजरेपणा कमी करण्यासाठी चिंच घालणे आवश्यक आहे.
३. आळुची पाने साफ़ करताना हाताला आणि कपड्याना काळे डाग (न निघणारे) पडण्याची शक्यता असते. नुकतीच तोडलेली पाने काळजीपूर्वक हाताळावीत.

Comments

 1. Wow! Your stories behind each recipe make me ache with memories of home. आमच्या घरीही मागल्या दारात भरपूर आळू आहे. वड्या तर आई सुरेखच करते, पण आल्या-गेलेल्याला पण आळूची पानं घरी घेऊन जायलासुद्धा मिळताते :)

  तुझा ब्लॉग वाचून आई-आजीची, त्यांच्या हातच्या चवीची आठवण येते, याहून मोठी achievement काय असू शकते, मिनोती? Way to go! I Love your recipes because they are simple, homely and healthy. Congratulations on completing one year. Keep 'em coming! :)

  ReplyDelete
 2. लय भरी! आणि इतके कष्ट करून slide show वगैरे केलायस, आता मला थोडासा आळस झटकून वड्या केल्या पाहीजेत ;)

  ReplyDelete
 3. सुमे - कशाला, कशाला?? आईला सांग की... ;-)

  ReplyDelete
 4. Mast ahe recipe pan aluchee paane konatyaa navane desi stores madhye milatil?

  ReplyDelete
 5. supriya - its called Taro Leaves in english. Its also known as colocasia leaves. you might be able to get these in chinese markets like ranch 99.

  ReplyDelete
 6. I tried... Thanks for this nice recepie

  ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts