टोमॅटो सार/सूप (Tomato Soup)

लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ क्रीम वगैरे घालताना पहिले आणि खूप विशेष वाटले होते कारण माझ्यासाठ सूप हा खूप साधा प्रकार होता/आहे. रेस्टॉरंटमधे मिळणारे Cream of Tomato सूप पण मला फार आवडत नाही ते याच कारणाने.

Tomato Soup

२ मोठे पिकलेले टोमॅटो
गरजेप्रमाणे पाणी
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून लाल मिरची पावडर
फोडणीसाठी १ टिस्पून तेल किंवा तूप आणि जिरे

कृती - टोमॅटो धुवुन घ्यावेत. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात टोमॅटो बुडतील एवढे पाणी घालुन ते उकळायला ठेवावे. पाणि उकळले की त्यात टोमॅटो घालुन बरुन झाकण ठेवुन ५ मिनिटे उकळून गॅस बंद करावा. पाणी थंड झाल्यावर फक्त टोमॅटो मिक्सरमधुन बारिक करुन घ्यावे. साले, बिया आवडत नसतील तर केलेली प्युरी गाळण्याने गाळुन घ्यावी. सूप/सार जितके पातळ हवे असेल त्याप्रमाणे टोमॅटो शिजवलेले पाणी घालावे. एका पातेल्यात तेलाची अगर तुपाची फक्त जिरे घालुन फ़ोडणी करावी त्यावर प्युरी केलेले टोमॅटो घालावेत. अवडीप्रमाणे मीठ, आणि तिखट घालावे. आवडत असेल तर थोडी साखर घालण्यास हरकत नाही.


टीप - १. टोमॅटो शिजवलेले उकळलेले पाणी फ़ेकुन न देता आमटी, भात, भाजी शिजण्यास वापरावे.
२. ते सार थोडे घट्टसर केले तर भाताबरोबर किंवा पुलावाबरोबर मस्त लागते.
३. पातळ केले तर चहासारखे कपमधे घेउन एखादा मूव्ही वगैरे बघत प्यायला मस्त वाटते.

Comments

  1. छान कृती. मला तरी हे थोडे अंबटच आवडते. फार गोड नको. राजधानी एक्स्प्रेस मध्ये फार छान असते.(ते कसे बनवितात?)
    आणि मला खूप दिवसांपासून "कोरिअऍंडर लेमन सूप" ची कृती हवी आहे. सांगू शकशील का?

    ReplyDelete
  2. छान कृती. मला तरी हे थोडे अंबटच आवडते. फार गोड नको. राजधानी एक्स्प्रेस मध्ये फार छान असते.(ते कसे बनवितात?)
    आणि मला खूप दिवसांपासून "कोरिअऍंडर लेमन सूप" ची कृती हवी आहे. सांगू शकशील का?

    ReplyDelete
  3. rajdhani express che mala mahiti nahi g Ashwini. Lemon coriander soup - baghate jamatey ka te.

    ReplyDelete
  4. bhaanDa gharee paaDalela kaa? :) BTW, aai paN exactly asach soup karate. tyaa chavichyaa aaThawaNeemuLe (aaNi kadaachit savayeemuLe) malaahee kadhi baahercha tomato soup faarsa ruchala naahi!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.