चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie)

साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची अप्रतीम चव आणि नाविन्य यामुळे कितीहीवेळा गेले तरी काहीतरी नवीन खाल्ल्याचा 'साक्षात्कार' होतो. त्यातलीच एक I Am Lusciously Awake नावाची स्मूदी, माझी अतिशय आवडती. त्यासाठी ४० मैल गाडी चालवायला नको म्हणून करायला शिकलेली :)

Chocolate Smoothie


(प्रमाण एका माणसासाठी आहे)

१ टेबल्स्पून कोको पावडर
१ टीस्पून इन्स्टंट कॉफी
१/२ केळ
२-३ काजु अगर बदाम
२-३ बिया काढलेले खजूर
१/२ कप पाणी
गरजेप्रमाणे बर्फाचे खडे

कृती - खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.

टीप - १. कोको पावडर शक्यतो दूध, साखर न मिसळलेली अशीच वापरावी.
२. साधी कॉफी वापरायची असेल तर पाण्यात कॉफी उकळून, गाळून, थंड करून वापरावी.
३. माझ्याकडे जेव्हा कच्च्या (न भाजलेल्या) चॉकलेटच्या बिया असत तेव्हा त्याच वापरत असे. ती चव अर्थात अप्रतीम येते. कॉफी देखील एका दुकानात कोल्ड प्रेस्ड रॉ कॉफी मिळते ती आणत असे.
शक्यतो यात दूध, साखर वगैरे वापरू नये.

Comments

  1. हे जबरी दिसतेय प्रकरण! आईला सांगते करायला :P

    ReplyDelete
  2. सुमेधा अगदी बरोअब्र म्हणतेयं. माझ्या ही बायकोला सांगतो करायला, तिचा चांगला मुड गाठुन

    ReplyDelete
  3. I was on a business trip to SF last month and I did visit Cafe Gratitude. Yum!!!

    ReplyDelete
  4. Sumedha - aaila kaa? tu kar kI? :P
    Priya - try out!
    HKji - tumhI kara kI. sagale ghaaloon mixer madhun kaadhayachey fakt.! bayakolaa kaa tras :)
    Sangita - Good to hear!

    ReplyDelete
  5. खरच की. आयतोब्यासारखे बसुन गिळण्याची सवय जी लागली आहे, फक्त हुकुम सोडायचे त्यामुळे हे लक्षातच आले नाही.

    ReplyDelete
  6. wow, sahi aahe. ghari try karenach, paN pudhachya trip madhe Cafe Gratitude la pheri nakki :)

    Baki tyanchya online menu madhe hazlenut milk dile aahe. tyachi vishesh garaj nahi na?

    ReplyDelete
  7. Nandan, tithe nakki try kar. pan Hazelnut milk is not necessary - you can just put water instead. with nut milk will make it bit rich in taste.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.